हरि - पाठ ९

  • 4.9k
  • 1.4k

हरिपाठ ९ २३ सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४॥ २४ जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २॥ जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्‍त ॥ ३॥ ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४॥