नमस्कार मंडळी माणसाचं जीवन हे त्याच्य श्वासाबरोबरच , घडय़ाळाच्या काटय़ावर जास्त चालत असतं असं म्हणतात. बघाना , प्रत्येकाची काम ही त्या त्या वेळेनुसार ठरलेली आणि आखलेली असतात. लांब कशाला स्वतःच्या अनुभवावरून सांगतो , 7:00 वाजता उठणे , 8:00 वाजता रेडी होऊन ऑफिसला , मग नऊ ते सहा जॉब झाल्यावर पुन्हा संध्याकाळी 7:30 च्या आत घरात , 8:00 वाजता फ्रेश होऊन दिवसभराच्या घडामोडींचा आढावा ,मग टीव्ही पाहत 9:00 वाजता जेवण , 10:00 वाजता शतपावली , थोडस वाचण् , आणि मग 11:00 वाजता बिछाना. , दुसऱ्या दिवशी पासून सेम रूटीन. हा….त्यातल्या त्यात शनिवार, रविवार किंवा सुट्टीचा आणखी कोणता दिवस असेल तर अडकलेली