होल्ड अप - प्रकरण 6

  • 6.6k
  • 4.3k

प्रकरण ६त्याच रात्री पावणे दहा च्या सुमारास पाणिनी, कनक च्या ऑफिसात गेला.“ कनक आहे आत?” त्याने रिसेप्शनिस्ट ला विचारलं.“ हो, आहेत सर आत. ते तुम्हालाच संपर्क करायच्या प्रयत्नात होते.”“ मी त्याला म्हणालो होतो की मीच येऊन जाईन इथे म्हणून.” पाणिनी म्हणाला.“ बरोबर आहे पण त्यांना वाटत होत की तुम्ही येण्यापूर्वीच तुम्हाला काही माहिती दयावी.” रिसेप्शनिस्ट म्हणाली.“ मी येतो त्याला भेटून.” पाणिनी तिला म्हणाला आणि आत जायला निघाला.“ पाणिनी पटवर्धन आत यायला निघालेत तुमच्याकडे.” रिसेप्शनिस्ट ने कनक ला फोन वरून घाई घाईत सांगितलं.कनक रिसेप्शनिस्ट चा फोन खाली ठेवे पर्यंत,पाणिनी त्याच्या केबिन मधे पोचला होता.“ अरे तू कधी भेटतोयस असं झालं होत