Hold Up book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Hold Up is also popular in गुप्तचर कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
होल्ड अप - कादंबरी
Abhay Bapat
द्वारा
मराठी गुप्तचर कथा
गेली पंधरा मिनिटे, हे सर्वांच्याच लक्षात येत होतं की सरकारी वकील आरुष काणेकर सतत कोर्टातल्या घड्याळाकडे बघत , मनात अत्यंत काटेकोर पणे वेळेची नोंद करत साक्षीदाराला प्रश्न विचारत होता.वेळकाढू पणा करण्यासाठी अधून मधून उगाचच आपल्या नोट्स चाळत होता, तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता.
अचानक तो ताठ उभा राहिला आणि म्हणाला, “ दॅट्स ऑल युवर ऑनर.”
नंतर पाणिनी कडे वळला आणि म्हणाला, “ यू मे क्रॉस. पटवर्धन, तुम्हाला काही विचारायचं आहे?”
पाणिनी उठून उभा राहिला. आरुष काणेकर ने आपल्या पुढे टाकलेला सापळा त्याने ओळखला.
“ युअर ऑनर, कोर्टाचं कामकाज संपायला फक्त वीस मिनिटं बाकी आहेत.” पाणिनी म्हणाला.
“ मग? त्याचा काय संबंध? ” न्यायाधीश एरंडे त्रासिक स्वरात म्हणाले.
पाणिनी हसला, “ मला एवढंच म्हणायचं होतं, की माझ्या उलट तपासणीत कोर्टाचे कामकाज वेळ संपल्यामुळे थांबवलेले तुम्हाला आवडणार नाही.माझी उलट तपासणी ही जरा विस्ताराने घेणारे मी.आपण जर ती सोमवारी सकाळ पासून चालू केली तर सलग घेता येईल.”
होल्ड अप प्रकरण १ गेली पंधरा मिनिटे, हे सर्वांच्याच लक्षात येत होतं की सरकारी वकील आरुष काणेकर सतत कोर्टातल्या घड्याळाकडे बघत , मनात अत्यंत काटेकोर पणे वेळेची नोंद करत साक्षीदाराला प्रश्न विचारत होता.वेळकाढू पणा करण्यासाठी अधून मधून उगाचच आपल्या ...अजून वाचाचाळत होता, तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता. अचानक तो ताठ उभा राहिला आणि म्हणाला, “ दॅट्स ऑल युवर ऑनर.” नंतर पाणिनी कडे वळला आणि म्हणाला, “ यू मे क्रॉस. पटवर्धन, तुम्हाला काही विचारायचं आहे?” पाणिनी उठून उभा राहिला. आरुष काणेकर ने आपल्या पुढे टाकलेला सापळा त्याने ओळखला. “ युअर ऑनर, कोर्टाचं कामकाज संपायला फक्त वीस मिनिटं बाकी आहेत.”
होल्ड अपप्रकरण २“ तुम्ही आरोपीला खूप कमी कालावधी पाहिलंत?” आपल्या आवाजात सहजपणा आणत पाणिनी ने विचारलं.“ कमी कालावधी कशाला म्हणायचं हे व्यक्ती नुसार बदलतं पटवर्धन. ” ती उर्मट पणे म्हणाली.“ म्हणजे कदाचित एक मिनिटा पेक्षा कमी?” पाणिनी ने विचारलं.“ ...अजून वाचामरुशिका म्हणाली“ अर्ध्या मिनिटापेक्षा ही कमी? ”“ असेल.कदाचित.”-मरुशिका“ तुम्ही सिया माथूर बरोबर गाडीने व्हिला नंबर दोन मधे आलात.?”“ हो.”“ किती अंतर होतं ? होल्ड अप झाल्याच्या ठिकाण पासून ते व्हिला नंबर दोन ?” पाणिनी ने विचारलं.“ अर्धा किमी पण नसेल.”-मरुशिका“ किती वेळ लागला जायला?”- पाणिनी ने विचारलं.“ काही मिनिटंच लागली.”-मरुशिका“ होल्ड अप चं नाट्य घडायला जेवढा वेळ लागला, त्याच्या चौपट
होल्ड अप प्रकरण ३ “ प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, उत्तरादाखल तुम्ही मला प्रति प्रश्न नका विचारू.” पाणिनी कडाडला. “ हो.” साक्षीदार म्हणाली. “ आणि तुम्हाला हे माहीत होतं की ओळख परेड च्या रांगेत, जे वेगवेगळे लोक असतील त्यात आरोपी ...अजून वाचा“ हो.”-मरुशिका “ आणि आरोपीला तुम्ही फोटो वरून आधीच ओळखलं होतं?” “ होय.” “ ज्यावेळी मिस्टर कामोद यांनी तुम्हाला आरोपीचा फोटो दिला, त्यावेळी त्यांनी तुम्हाला आरोपी शिवाय इतरही काही माणसांचे फोटो दिले का? आणि असं विचारलं का, की या पैकी कोणत्या माणसाने होल्ड अप केला असं वाटतंय? ”-- पाणिनी म्हणाला. “ नाही, असं नाही केलं त्याने. तो म्हणाला, मरुशिका, आपला
होल्ड अप प्रकरण चार प्रकरण ४ गर्दीतून वाट काढत कनक ओजस पाणिनी च्या दिशेने आला. “ काय झालं?” पाणिनी नं विचारलं. “ ती पळून गेली.” –कनक “ तू तिला नीट सांभाळून ठेवायला हवं होतंस.” पाणिनी नाराज होऊन म्हणाला. “ ...अजून वाचाती पळून जाणाऱ्यातली नव्हती.तिलाच साक्ष द्यायची इच्छा होती मी हे शपथेवर सांगायला तयार आहे. अरे तिने मला शपथ पूर्वक सांगितलं की तिने मरुशिका ला गाडीतून नेलं पण ते होल्ड अप च्या ठिकाणाहून नाही तर त्याच्या आधी दुपारी शॉपिंग ला जाताना.” “ तर मग कनक, डाका पडला तेव्हा रात्री सिया कुठे होती?” “ ते तिला आठवत नाहीये.तिला वाटतं ती व्हिला नंबर
होल्ड अप प्रकरण ५ कनक बरोबर पाणिनी आपल्या ऑफिसला आला तेव्हा सौम्या टपाल आणि मेल चाळत होती. “ सिया माथूर ने कशी साथ दिली?” तिने पाणिनी ला आल्या आल्या विचारलं. “ खास नाही.” पाणिनी म्हणाला. “ असं कसं?” –सौम्या ...अजून वाचाती पळाली.” “ काय ! ” सौम्या उद्गारली. “ खरचं” “ मला जरा सविस्तर सांगा ना.”-सौम्या “ मला वाटत काहीतरी कारस्थान होत यात.” पाणिनी म्हणाला. “ मला समजत नाहीसं झालंय.प्रवासात माझ्या बरोबरच होती ती.चांगली तयारीची आणि बिनधास्त वाटत होती.” कनक म्हणाला. “ सर,तुम्ही तिच्याशी बोलला होतात का?”-सौम्या “ नाही. तशी संधीच नाही मिळाली.कोर्ट चालू होई पर्यंत ती आली नव्हती.कनक ला