होल्ड अप - प्रकरण 8

  • 6.5k
  • 3.8k

प्रकरण ८“ चला आत ” तो माणूस म्हणाला.“ पाणिनी पटवर्धन ! ” मिष्टी उद्गारली. “ मला लक्षात यायला हवं होतं ,जेव्हा तुम्ही तुमचं नाव पाणिनी सांगितलं तेव्हाच.”“ मी जिंकलो किंवा हरलो तरी तुला पैसे मिळतील याची मी काळजी घेईन.” पाणिनी म्हणाला.“ मिस्टर पटवर्धन, इथल्या खोल्या आणि फर्निचर अगदी साधंच आहे.म्हणजे तुमच्या जीवन चर्येला साजेसं नाही. पण त्याला नाईलाज आहे.पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी आम्हाला हा सेट अप वरचेवर हलवायला लागतो.म्हणजे खेळायची मशीन्स हीच असतात पण त्यांची जागा बदलावी लागते.” तो माणूस म्हणाला.“ अशा वेळी जागा बदलली की तुम्ही बार बाला ना कळवता?” पाणिनी ने विचारलं.“ त्यांना नाही, संबंधित ड्रायव्हर ना कळवतो.”“ बऱ्यापैकी