होल्ड अप - प्रकरण 11

  • 6.3k
  • 3.7k

होल्ड अप प्रकरण ११ पाणिनी ऑफिसात आला तेव्हा कनक त्याचीच वाट बघत होता. “ काय झालं सिया माथूर चं?” पाणिनी ने विचारलं. “ ती कुठे राहत्ये ते शोधलंय आम्ही. तुझी कालची भेट कशी झाली तिच्या बरोबरची?” पाणिनी ने त्याला सर्व सविस्तर हकीगत कथन केली. “ कनक, मरुशिका मतकरी चे तीन क्लब आहेत. ज्याला ती व्हिला म्हणते. तिन्ही क्लब हे छोट्याशा उपनगरात आहेत. तिन्ही ठिकाणची जागेची निवड मरुशिका ने फारच काळजी पूर्वक केल्ये.” कनक ने मान डोलावली. “तुझा जो माणूस माझ्यावर लक्ष ठेऊन होता, मी क्लब मधे गेल्या पासून, त्याने आम्ही बाहेर पडल्यावर आमचा पाठलाग केला असेल ना? ” पाणिनी ने