होल्ड अप - प्रकरण 12

  • 5.6k
  • 3.5k

“ तुमचा माणूस बाहेर पडतोय पटवर्धन.आणि त्याच वेळी मृद्गंधा दारावरची बेल वाजवत्ये.” ( प्रकरण ११ समाप्त)........पुढे चालू.... प्रकरण १२ “ ती जर दहा मिनिटाच्या आत सिया च्या घरातून बाहेर आली तर त्याचा अर्थ तिची भेट फेल गेली.पण जर अर्धा तास ती आत राहिली तर मला वाटत की तिच्या हाताला काहीतरी लागतंय असं समजायला हरकत नाही.” पाणिनी म्हणाला. “ खूप आत्मविश्वास दिसतोय. त्या मुलीच्या चालण्यातूनच जाणवतोय.” सर्वेश उद्गारला. “ खरंच आहे तुझं निरीक्षण.” “ तुम्हाला कोर्टाने नेमलंय ना पटवर्धन, या खटल्यात?” “ हो.” पाणिनी म्हणाला. “ तुम्हाला यात पैसे दिले जातात?” “ अजिबात नाही, तुम्हाला तुमचा स्वतच्या खर्चाने आणि वेळ खर्च