होल्ड अप - प्रकरण 13

  • 4.4k
  • 2.7k

होल्ड अप प्रकरण १३ “ कनक, या प्रकरणात काहीतरी जबरदस्त लोचा आहे.” पाणिनी पटवर्धन कनक च्या केबिन मधे आत शिरता शिरता म्हणाला.“ तू बोलतोयस हे पाणिनी ! ”—कनक“ ती सिया माथूर नक्कीच दुहेरी आयुष्य जगत असली पाहिजे. तिचे इथेही घर आहे आणि विलासपूर मधे पण, आणि नोकरी मरुशिका क्लब-३ मधे.”कनक ओजस ने मान हलवून संमती दिली.“ ती तसे का करत असावी? आणि कसे जमवले असावे हे तिने?” पाणिनी स्वतःशीच बोलला“ अँम्ब्युलन्स आली तेव्हा तू तिथे समोरच्या हॉटेलात होतास पाणिनी?” –कनकपाणिनी मानेने हो म्हणाला.“ माझा दुसरा माणूस अँम्ब्युलन्स च्या मागावर निघाला लगेच पण एवढया ट्राफिक मधून अँम्ब्युलन्स ला जसं पोलीस सहज