होल्ड अप - प्रकरण 14

  • 7k
  • 3.3k

प्रकरण १४तुरुंगात पाणिनी पटवर्धन ने आरोपी सुषेम इनामदार ची भेट घेतली.“ कसा आहेस?” पाणिनी ने विचारलं.“ ठीक.”“ आज तुझ्याशी कोणी बोललं?” पाणिनी ने विचारलं.“ खूप जण बोलले. पटवर्धन साहेब माझी पुतणी देवगिरी वरून तुम्हाला भेटायला आल्ये ना !” सुषेम इनामदार म्हणाला.“ हो माहित्ये. आमची भेट झाल्ये.” पाणिनी म्हणाला.“ तिच्याकडे पैसे आहेत.मी जर न्यायाधीशांना सांगितलं असतं की माझ्या पुतणी कडून मला पैसे घेण्यासाठी व्यवस्था करा तर त्यांनी केली असती पण मग मला दुसराच वकील बघावा लागला असता. तुम्ही मिळाला नसतात. मी तसे काहीच सांगितलं नाही त्यामुळे न्यायाधीशांनी तुम्हाला नेमले. माझे नशीब आहे. ”“ असू दे.असू दे.” पाणिनी हसून म्हणाला. “ आणि