मॅनेजरशीप - भाग १४ - अंतिम भाग

  • 5k
  • 2.6k

मॅनेजरशीप भाग  १४    भाग १३  वरून पुढे वाचा.....   “ताईचं सोड, तू मला तरी विचारलं का?” – मेघना. “आत्ताच तर विचारलं, आणि तू संमती पण दिलीस.” – मधुकर.  “औँ, हे कधी झालं ? आणि मला कसं माहीत नाही ते? मी कधी संमती दिली?” आता आश्चर्य करण्याची पाळी मेघनाची होती. “आठव.” – मधुकर.  “छे, असं काही बोलणं झालच नाही.” – मेघना. “नाहीच झालं बोलणं.” – मधुकर.  “मग ?” – मेघना. “तरी पण झालं. जरा दिमाग पर जोर दो मैडम सब पता चल जाएगा.” – मधुकर.   “No, you are cheating.” – मेघना. “No, not at all. हे बघ भाजी करपली.