मॅनेजरशीप - भाग १४ - अंतिम भाग Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग १४ - अंतिम भाग

मॅनेजरशीप भाग  १४   

भाग १३  वरून पुढे वाचा.....

 

“ताईचं सोड, तू मला तरी विचारलं का?” – मेघना.

“आत्ताच तर विचारलं, आणि तू संमती पण दिलीस.” – मधुकर. 

“औँ, हे कधी झालं ? आणि मला कसं माहीत नाही ते? मी कधी संमती दिली?” आता आश्चर्य करण्याची पाळी मेघनाची होती.

“आठव.” – मधुकर. 

“छे, असं काही बोलणं झालच नाही.” – मेघना.

“नाहीच झालं बोलणं.” – मधुकर. 

“मग ?” – मेघना.

“तरी पण झालं. जरा दिमाग पर जोर दो मैडम सब पता चल जाएगा.” – मधुकर.  

“No, you are cheating.” – मेघना.

“No, not at all. हे बघ भाजी करपली. बरोबर ?” - मधुकर.

“हो.” – मेघना. 

“का?” – मधुकर.

“का म्हणजे? तूच गोंधळ घातला म्हणून.” – मेघना. 

“मान्य आहे. पण त्या गोंधळात तू पण सामील झाली होतीसच की.” – मधुकर विजयी मुद्रेने म्हणाला. 

“अच्छा म्हणजे त्याला तू संमती धरून चालला आहेस तर.” – मेघना.

“मग? याला मुक संमती म्हणतात. हवं असेल तर, चल आता शिक्का मोर्तब करूनच टाकू.” मधुकर आता अॅक्शन मोड मधे आला होता.

आणि त्यांनी तिला पुन्हा मिठीत घेतलं. आता मात्र तिचा खोटा विरोध पूर्ण मावळून गेला. पण आता यावेळेस मेघना लवकरच सावरली. कारण मधुकर पुढची स्टेप घेऊन शिक्का मोर्तब करायच्या प्रयत्नात होता. मेघना दूर झाली आणि म्हणाली की आता बास. मला माहीत आहे शिक्का मोर्तब म्हणजे काय करायचं आहे तुझ्या मनात ते. पण आत्ता नाही. धिरज रक्खो

आणि एक मस्त खिजवणार स्माइल दिलं. आता पर्यन्त तिला कळलं होतं की तिच्या स्माइल वर मधुकरची बोलती बंद होते म्हणून. मग म्हणाली

“पुन्हा भाजी करपेल आणि जेवणाचा प्रॉब्लेम होऊन बसेल.” – मेघना. 

“अरे भाजी को मारो गोली. हमारा तो पेट भर गया. बस ऐसेही तुम पास रहो. अरे, तुझ्या सारखी परी शेजारी असतांना जेवणाची काय मातब्बरी. किती अरसिक आहेस. सारखं, सारखं जेवण काय काढतेस. कालच्या सारखं तुझ्या साईच्या बोटांनी भरव न . थोडा तो रुमानी हो जाओ यार.” आता मधुकरला थांबवणं शक्य नव्हतं.

मेघना मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत होती.

“हे काय नवीनच ! कमालच आहे. अस कधी कोणी करतं का ?” – मेघना.

“मग स्वर्ग सुख म्हणतात ते अनुभवलं काल मी. सारखं डोळ्यासमोर तेच. अब कया बताएं आपको! रात भर सपनेमेभी वोही प्रोग्राम चल रहा था.” – मधुकर. 

“पूरे आता. चल बस, तुम भी क्या याद करोगे, आपकी मंशा सर आखों पर.” आणि तिने मधुकरचा जरा जोरातच गालगुच्चा घेतला आणि पुन्हा खळखळून हसली. मधुकरची इच्छा पूर्ण झाली. मधुकर सातवे आसमान पर.

“केवढ्या जोरात माझा गाल पिळवटलास. आता आग शांत कर.” – मधुकर.

ओके, असं म्हणून मेघनानी गालावरून हलका हात फिरवला.

“अरे यार मला वाटलं की तू ओठ टेकवशील.” – मधुकर. 

“मिस्टर, भानावर या. सगळं एकाच दिवशी ? सब्र का फल मीठा होता हैं.” मेघनानी त्याला वास्तवाची जाणीव करून दिली.

 

जेवण झाल्यावर मेघना म्हणाली की “मी गेल्यावर निवांत पणे ताईशी जरा बोलून घे. त्यांना आवडेल की नाही ते माहीत नाही. मग मी आई बाबांशी बोलीन.”

 

“ताईला नक्की आवडशील तू. मला खात्री आहे. एवढी सुंदर, स्मार्ट, डॉक्टर मुलगी कोणाला आवडणार नाही ? आणि परत तिने तुला पाहिलं आहे आणि तुमचं बरंच बोलणं पण झालं आहे मग काळजी कशाला करतेस ?” – मधुकर म्हणाला.

 

“अरे तसं नाही पण तू निवांत पणे बोलून घे म्हणजे झालं. आपल्याला सगळी माणसं आपल्या बरोबर हवीत.” – मेघना.

“ठीक आहे तू म्हणतेस तर तसं.” मधुकरनी मान तुकावली.

मग दुपारी चार वाजता त्यानी ताईला फोन करून सर्व सांगितलं. तिला तर खूपच आनंद झालेला दिसला. एक म्हणजे मधुकर लग्नाला तयार झाला. आणि दुसरं म्हणजे मेघना सारखी लाखात एक अशी मुलगी मिळवली. ती राजेशला म्हणाली सुद्धा मेघनानेच मधुकरला पटवलं असाव, मधू कसला मान वर करून बोलायची मारामार. तो आणि त्यांची फॅक्टरी या पलीकडे काही असतं हेच त्याच्या गावी पण नसतं. राजेश ने पण मान डोलावली. त्यालाही तसंच वाटत होतं. तो म्हणाला आज रात्री मेघना ला फोन कर. म्हणजे कळून येईल. खरं काय ते.

रात्रीचे आठ वाजत आले आणि मधुकर डोळ्यात प्राण आणून मेघनाची  वाट पहात होता. पण मेघना आलीच नाही. तिच्या ऐवजी एक माणूस येऊन डबा देऊन गेला.

 

“काय रे डॉक्टर मेघना नाही आल्यात ?” – मधुकर.

“हॉस्पिटल मध्ये emergency आली म्हणून त्या तिकडे busy आहेत.” – माणसांनी अपडेट दिलं. 

आता डॉक्टर म्हंटल्यांवर असं होणारच. मधुकरनी चडफडत स्वत:च समाधान करून घेतलं. आता त्याला अश्या आयुष्याची सवय करून घ्यावी लागणार होती.

रात्री उशिरा मेघनाचा फोन आला. त्याला राग आला होता त्याने फोन घेतलाच नाही. पांच मिनिटांनी पुन्हा आला या वेळी घेतला. तिच्याशी बोलल्यावर त्याचा राग  शांत झाला. मग त्याला झोप पण लागली.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता मधुकर मेघनाची वाट पहाट होता. मनातल्या मनात म्हणत होता की आज कुठलीच emergency नको येऊ दे . दारावरची बेल वाजली आणि मेघना आली असं समजून दार उघडलं तर अनीता आणि राजेश दोघेही समोर हजर.

“अरे, तुम्ही दोघेही असे अचानक कसे ?” – मधुकर.

“अरे सहजच तुझी तब्येत पाहायला आलो. बरं पण आता आधी फ्रेश होतो आणि मग बोलू आपण. अनीता तू आधी अटप म्हणजे काही पेट पूजेचं करता येईल.” राजेश म्हणाला. राजेश आणि मधुकर मग इकडच तिकडचं बोलत बसले. मग अनीता आल्यावर राजेश गेला.

 

“ताई, अग नक्की काय झालाय ? एकदम न कळवता असं अचानक कसे आलात ? काही कळेल का मला. ?” – मधुकर.

 

“डॉक्टरांचा काल फोन आला होता, त्यांनी भेटायला बोलावलं आहे. जमलं तर उद्याच या असं म्हणाले. म्हणून आम्ही काल रात्रीच निघालो.” – अनीता.

“माझी तब्येत तर उत्तम आहे. मग डॉक्टर असं का म्हणाले ? आणि मला काहीच बोलले नाही. मेघनाही बोलली नाही.” – मधुकर.

“नाही आम्हालाही काही कल्पना नाही. आता राजेश आला की आपण लगेच निघू.”

तेवढ्यात राजेश तयार होऊन आलाच. मधुकरला काहीच समजेना. त्यांनी मेघनाला फोन लावला पण नुसतीच रिंग जात होती. मधुकर जाम वैतागला.

 

हॉस्पिटलच्या समोर गाडी उभी राहिली. सगळे उतरले पण राजेश हॉस्पिटलच्या ऐवजी डॉक्टरांच्या घराकडे वळला. मधुकर पहातच राहिला. फाटका मद्धे डॉक्टर, त्यांची बायको, जयंत साहेब आणि त्यांची बायको उभे होते. स्वागता साठी.

आता माधुकरच्या डोक्यात प्रकाश पडला.

 

अगदी हसत खेळत सगळ्यांच्या ओळखी झाल्या. सगळ्यांनी संबंधांवर शिक्का मोर्तब केलं. लगेच तिथल्या तिथेच साखरपुडा पण झाला. आणि लग्नाची तारीख पण ठरली. मधुकरला हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. पण तो खुश होता. डॉक्टर साहेबांनी त्यांच्या जवळ असलेले 20 टक्के शेअर मधुकरला द्यायच डिक्लेर केलं. त्याला मधुकर नी विनयानी  पण ठामपणे नकार दिला. असो ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागलं. आणि, आणि काय ? आशीर्वाद द्या. नांदा सौख्य भरे !

**** समाप्त****

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com