मॅनेजरशीप - भाग १३ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग १३

मॅनेजरशीप  भाग  १३  

भाग १२ वरून पुढे वाचा.....

 

“म्हणूनच एवढे रुक्ष झाला आहात. कायम आपला गंभीर चेहरा. एखादी गोष्ट आवडली की नाही हे ही समोरच्याला कळत नाही.” आणि मग चित्रात जसं दाखवतात की परमेश्वर भक्ताला हात समोर करून भक्ताला वर देतात त्या प्रमाणे पोज घेऊन म्हणाली की “मॅनेजर साहेब, हसत रहा, जीवन सुखाचं होईल.” आणि पुन्हा हसायला लागली. अर्थात मधुकर ला पण हसू आवरलं नाही. थोड्या वेळाने मेघना भानावर आली आणि म्हणाली

“अरे आपण हसत काय बसलो आहोत, मी ज्या कामासाठी आली, ते राहूनच गेलं. तुमचं जेवण व्हायचं आहे. चला तुमचं पान घेते.” आणि ती किचन मध्ये ताट  आणायला गेली.

“अरे ! अहो, डॉक्टर मेघना, काय करता आहात तुम्ही ? ताट वगैरे राहू द्या. मी डब्यातच जेवतो. मला त्याची सवय आहे. अहो तुम्ही हे काय करता आहात ? अरे भयी हमे शरमिंदा मत कीजिये.” आणि असं म्हणत तो पण किचन मध्ये गेला.

“मी इथे डॉक्टर म्हणून आलेली नाहीये. किती वेळा सांगू तुम्हाला मॅनेजर साहेब ? मी तुम्हाला जेवायला घालायला आलेली आहे.” – मेघना. 

“अहो पण तुम्हाला हाक मारायची तर डॉक्टर मेघना असच म्हणावं लागेल ना. तुमचं दुसरं काही टोपण नाव आहे का ?” मधुकरची विचारणा.

“चांगलं मेघना नाव आहे. टोपण नाव कशाला हवं ?” – मेघना.

“मग काय नुसतं मेघना म्हणू ?” – मधुकर.

“करेक्ट.” – मेघना. 

“अहो मेघना ताई, छे, असं म्हणायला कसं तरीच वाटतं.” – मधुकर. 

“मग ए मेघना म्हणा.” – मेघना. 

“चालेल तुम्हाला ?” – मधुकर. 

“मॅनेजर साहेब, चालेल न, त्यात काय ? तसेही तुम्ही माझ्या पेक्षा मोठे आहात.” असं मेघना म्हणाली आणि मधुकरच्या मनात आनंदाच कारंज. आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर मेघनाला वाचता आला.

“म्हणजे मी वयाने मोठा आहे म्हणून अरे  तुरे करू तुला ?” – मधुकर.

“अं SS , तसंच काही नाही. पण ते जाऊ द्या हो. जेवायला चला, मला उशीर होतो आहे.” – मेघनानी विषय आटोपता घेतला. 

“मग ते मॅनेजर साहेब, वगैरे आहे, ते काय ?” – मधुकर.

“मग काय म्हणू ?” – मेघना.

“मधुकर म्हण की. तुझ्याच शब्दांत सांगायचं तर फिटटं फाट.” – मधुकर. 

मेघना च्या चेहऱ्यावरचा आनंद तिने मुळीच लपवला नाही. एक झकास स्माइल दिलं मधुकर कडे  बघून, मधुकर घायाळ.

“ओके माय डियर मधू जेवायला चल. का भरवू तुला ? एक घास काउचा करून ?” मेघनानी चिडवलं.

“मेघना you are marvellous. माझी हरकत नाहीये. तुला हवं असेल तर तसं कर.” – मधुकर.

“बघ हं, चालेल तुला ?” – मेघना 

“I will enjoy it. एकच काय, 10 डबे संपवायला तयार आहे मी.” – मधुकर.

आणि मेघना नी खरंच चार घास त्याला भरवले. तिच्या नाजुक मुलायम बोटांचा स्पर्श त्याला स्वर्ग सुख देऊन गेला. तो जमिनीवर नव्हताच. हवेतच विहार करत होता.

 जेवण झाल्यावर ती म्हणाली की बराच उशीर झाला आहे आणि तिला आता निघायला हवं.

 दोघांसाठीही आता ते अवघड होतं पण इलाज नव्हता. उद्या सकाळी अकरा वाजता येते असं सांगून मेघना निघाली. आता अकरा वाजे पर्यन्त वाट पहाणं आलं. मधुकरला त्या रात्री झोप आली नाही. घरीच  असल्याने झोपेच औषध पण नव्हतं. सारी रात्र तो कल्पनेच्या राज्यात रमला. मेघनाशी मनातल्या मनात गप्पा मारत होता. केंव्हा तरी पहाटे डोळा लागला.

 सकाळी डोंअर बेल वाजली तेंव्हा जाग आली. घड्याळात पाहिलं तर अकरा वाजले होते. अरे बापरे, मेघना आली असेल असा विचार करून घाई घाईने दरवाजा उघडला. दारात मेघना उभी होती. प्रसन्न मुद्रेने त्याच्याकडे बघत होती. त्याचं स्वत: कडे लक्ष् गेलं सगळाच गबाळा अवतार होता. त्याला एकदम ओशाळल्यासारख झालं. तो झटक्यात बाजूला झाला आणि म्हणाला की पटकन फ्रेश होऊन येतो आणि बाथरूम मध्ये जवळ जवळ पळालाच.

 मेघनाच्या लक्षात आलच की तो रात्रभर जागा असणार म्हणून. तिला बरंच वाटलं. तिलाही, आज पर्यन्त म्हणजे मधुकर भेटे पर्यन्त, अभ्यासा पलीकडे पहावस वाटलंच  नव्हतं. तसं तिला चार पांच जणांनी प्रपोज केलं होतं, पण तिने त्याकडे फारसं लक्षच दिलं नव्हतं, पण आता अचानक सर्वच बदललं होतं. आता मधुकरनी तिच्या मनातली सगळीच जागा व्यापली होती. दुसऱ्या कुठल्याही विचारांना तिथे थारा नव्हता.

 अर्ध्या तासांनी मधुकर दाढी, आंघोळ वगैरे आटपून बाहेर आला. एकदम फ्रेश. थोडा पर्फ्यूम चा स्प्रे मारून, अर्थात केंव्हा तरी मित्रांनी दिलेला आणि आजपर्यन्त न वापरलेला. इतके दिवस जेंव्हा कोणी पर्फ्यूम लावलेला भेटायचं, तेंव्हा हा नाक मुरडायचा. पण आज, आजचा दिवस वेगळा होता. तो बाहेर आला तेंव्हा मेघना किचन मध्ये त्याचं जेवण गरम करत होती.

 “अरे हे  काय करते आहेस ? मला गरमाचं वेड नाहीये. राहू दे.” – मधुकर.

“पण तू गरम गरम खावस अशी माझी इच्छा आहे.” – मेघना.

“ओके. आता तुझी इच्छाच आहे म्हंटल्यांवर मी काय बोलणार ? ओके बॉस.”

मेघना वळली आणि त्यांच्या कडे पाहून म्हणाली,

“मी म्हणते आहे म्हणून तू ओके म्हणतो आहेस ?”

“मग ? आपकी  हर बात सर आँखों पर. जो तुम कहोगी वही हम करेंगे.  फाइनल.” मधुकर म्हणाला. मेघना सुखावली.  छानशी हसली. आणि मधुकर तिच्या गालावरच्या खळीतच  अडकला. आणि मग ध्यानी मनी नसतांना नकळतच, दोन्ही हात पसरून त्यानी मेघना ला मिठीत घेतलं. मेघनाला हे अचानकच होतं, पण  तिच्या नकळतच ती त्याच्याकडे ओढली गेली आणि मग तिची ती राहिलीच नाही.

 किती तरी वेळ तसाच गेला. एकमेकांच्या मिठीत दोघांनाही वेळेचं भान राहिलं नाही.

आणि मग दोघांनाही जाणवलं की काही तरी जळल्याचा वास येतो आहे. मेघना  माझी भाजीss असं किंचाळून दूर झाली आणि वळली. गॅस वर भाजी गरम करायला ठेवली होती ती पार करपून गेली होती. तिने पटकन गॅस बंद केला. वरण उकळत होतं पण निदान शाबूत होतं. पण भाजी मात्र गेली.

 आता मेघना मधल्या प्रेयसी ची जागा गृहिणी ने घेतली.

“अरे देवा ! भाजी तर गेली आता काय करायचं ? तुझी ब्रम्हचाऱ्यांची कोठी, तुझ्याकडे घरात तर काहीच नसेल न ?” मेघना म्हणाली. 

“काय असायला हव आहे ?” – मधुकर.

“एखादी भाजी केली असती पटकन. म्हणून विचारलं.” मग तिनेच शोधाशोध सुरू केली.

“कसली भाजी होती डब्यात ?” – मधुकर.

“दोडक्यांची.” – मेघना. 

“अरे वा म्हंटलच आहे न की जो होता हैं, अच्छे के लिए होता हैं.” – मधुकर.

“म्हणजे ? तुला दोडक्यांची भाजी आवडत नाही ?” मेघनानी विचारलं.

“फूटी आँख से नहीं भाति.” – मधुकर.  

“अरे आरोग्यासाठी चांगली असते.” बोलता बोलता तिने बटाटे शोधून काढले आणि भाजी करायला घेतली. तिच्या स्विफ्ट हालचालींकडे मधुकर चकित नजरेने बघतच राहिला. पण त्यांनी आपला मुद्दा रेटलाच.

“आता डॉक्टरच घरात आहे म्हंटल्यांवर मी कशाला काळजी करू.” – मधुकर. 

“अहो महाशय अजून काहीच ठरलं नाहीये.” – मेघना. 

“आता आणखी काय ठरायचं बाकी आहे ?” – मधुकर.

“तुझ्या ताईला विचारलं का ? जिजाजी काय म्हणतात ते बघितलं का ?” – मेघना.

“एवढंच ना? आता लावतो फोन.” – मधुकर. 

“ताईचं सोड, तू मला तरी विचारलस का ?” – मेघना.

“आत्ताच तर विचारलं, आणि तू संमती पण दिलीस.” – मधुकर. 

“औँ, हे कधी झालं ? आणि मला कसं माहीत नाही ते ? मी कधी संमती दिली ?” आता आश्चर्य करण्याची पाळी मेघनाची होती.

“आठव.” – मधुकर. 

“छे, असं काही बोलणं झालच नाही.” – मेघना.

“नाहीच झालं बोलणं.” – मधुकर. 

“मग ?” – मेघना.

“तरी पण झालं. जरा दिमाग पर जोर दो मैडम सब पता चल जाएगा.” – मधुकर.  

“No, you are cheating.” – मेघना.

“No, not at all. हे बघ भाजी करपली. बरोबर ?” - मधुकर.

“हो.” – मेघना. 

“का ?” – मधुकर.

“का म्हणजे ? तूच गोंधळ घातला म्हणून.” – मेघना. 

“मान्य आहे. पण त्या गोंधळात तू पण सामील झाली होतीसच की.” – मधुकर विजयी मुद्रेने म्हणाला. 

“अच्छा म्हणजे त्याला तू संमती धरून चालला आहेस तर.” – मेघना.

“मग ? याला मुक संमती म्हणतात. हवं असेल तर, चल आता शिक्का मोर्तब करूनच टाकू.” मधुकर आता अॅक्शन मोड मधे आला होता.

क्रमश:-............

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com