मॅनेजरशीप - भाग १० Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग १०

 

मॅनेजरशीप भाग  १०

भाग ९  वरून पुढे वाचा.....

 

“ठीक तर मग. अजून एक गोष्ट आपण विक्रमसिंग ला काढून टाकलं आहे त्यांची पण जागा भरणं आवश्यक झालं आहे. मी आधीच इंटरव्ह्यु घेऊन दोन नाव फिक्स केलीच आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्या पगाराचं पण बघाव लागणार आहे.” – मधुकर.

“हो साहेब, आपण उद्याच मीटिंग मध्ये सर्व फायनल करून टाकू.” स्वामी म्हणाला आणि मग  मीटिंग संपली.

नंतर संध्याकाळ पर्यन्त मधुकर जे काही बदल त्याला अपेक्षित होते त्या बद्दल टिपणं काढत बसला होता. डोक्यात खूप विचार होते. खूप काही सुधारणा करायच्या मनात होतं. पण उद्या स्वामी आणि फिरके काय सांगतात त्यावर सगळं अवलंबून होतं.

शेवटी त्यांनी सगळं बंद करून घरी  जायला निघाला.

जेवण झाल्यावर बाल्कनीत बसून नेहमी प्रमाणे कॉफी पीत, पीत दिवस भरातल्या  घडामोडींवर विचार करत असतांना मोबाइल वाजला. जिजाजी होते फोन वर.

“हां बोला जिजाजी,”

“अरे थोडा मोकळा आहेस ना ? का बिझी आहेस ?” – जिजाजी.

“जेवण करून कॉफी पीत आरामात बसलो आहे. तुम्ही बोला.” – मधुकर.

“अरे एक बिल्डर आहे तो आपला वाडा redeveloping ला घ्यायचं म्हणतो आहे. तोच सर्व भाडेकरूंबरोबर बोलणी करायला तयार आहे. आपल्याला काहीच करायचं नाहीये. मी त्यांना एवढंच सांगितलं की सर्वांना समाधान होईल असाच तोडगा काढा. या बद्दल तुला काय वाटत ?” – जिजाजी.

“माझं इंदूरला येणं बहुधा निवृत्ती नंतरच होईल असं दिसतंय. त्यामुळे तुम्ही जो काही विचार केला असेल तो रास्तच असेल. एखादा फ्लॅट आपल्याला मिळतो का ते बघा म्हणजे जर निवृत्ती नंतर तिथे येण्याचा मी विचार केलाच तर तो हातात असावा एवढंच. बाकी तुम्हीच बघा.” – मधुकर.

“ठीक तर मग, सगळं फायनल झाल्यावर तुला इथे agreement वर सही करायला यावं लागेल, तेंव्हा त्या वेळेला यावं लागेल.” – जिजाजी.

“येईन. जरा दोन तीन दिवस अगोदर सांगाल.” – मधुकर. 

“सांगीन पण एक गोष्ट विचारू का ?” – जिजाजी

“काय ?” – मधुकर.

“निवृत्ती नंतर एकटाच येणार आहेस की बायको, मुलांना घेऊन, ते सांग.” – जिजाजी.

“काय जिजाजी, नेहमी ताई त्रास देते हा प्रश्न विचारून आता तुम्ही पण ?”

“बरं. चल ठीक आहे. ठेवतो.” – जिजाजी.

दुसऱ्या दिवशी स्वामी ने मीटिंग मध्ये सांगितलं की “कंपनी चा प्रॉफिट कमी झालेला आहे, पण अजूनही चिंता करण्यासारखी स्थिति नाहीये. हां प्रॉफिट कसा  वाढेल आणि कंपनी पूर्वीपेक्षा जास्त प्रगती कशी करेल ह्याचा विचार आणि कृती करणं जरूरी आहे. जर जास्तीची माणसं घेऊन परिस्थिति सुधारणार असेल तर we are ready for it. We can go ahead with new employments.”

 

“वा वा स्वामी, तुम्ही आमच्या डोक्यांवरचं ओझं उतरवलं. आता बघाच तुम्ही.” नंतर बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी discuss होऊन मीटिंग संपली. वेणुगोपाल नी उद्याच मुंबईला जाऊन जुन्या क्लायंट ना भेटायच हे पण ठरलं. सगळ्यांनी वेणु ला बेस्ट लक दिलं. त्यांच्या भेटीवर पुढचे प्लॅन्स अवलंबून होते.

“साहेब,” मीटिंग संपल्यावर जेंव्हा सगळे पांगले  तेंव्हा वेणुगोपाल मधुकरला म्हणाला की “मागे जेंव्हा मटेरियल खराब जात होतं, तेंव्हा दोन्ही कंपन्यांच्या  GM साहेबांनी आपल्याला पूर्वीच्या संबंधांमुळे बराच वेळ दिला सुधारणा करायला. पण आपण जास्तीत जास्त घोटाळे केलेत. शेवटी ते दोघंही खूप संतापले, शेवटी त्यांच्याही कंपनीच्या reputation चा सवाल होता. पुन्हा आयुष्यात कधी भेटायला सुद्धा येऊ नका अस म्हणालेत. I don’t know, whether I will be welcomed or not.”

 

“वेणु, अरे संबंध असे तुटत नसतात. तुला भेटतील ते लोक. काळजी करू नको. हां पहिल्याच भेटीत ते काही ऑर्डर देणार नाहीत. पण आपणच पुढाकार घेतला नाही तर पुढे ऑर्डर मिळणार कशी. तू जा मला खात्री आहे की काही तरी outcome निघेलच.” मधुकरनी त्याला धीर दिला.

गोष्टी सरळ  व्हायला लागल्या की एकामागून एक चांगल्या घटना घडत जातात.

त्याच रात्री मधुकरला त्यांच्या एका मित्राचा फोन आला.

“अरे  तुला प्रॉडक्शन मध्ये माणूस हवा होता ना ?”

“हो.” – मधुकर. 

“कोणच्या लेवल ला हवाय. ? प्रॉडक्शन मॅनेजरची पोस्ट असेल तर माझ्याकडे एक

छान माणूस आहे. बोल ?” – मित्र.

“मला दोन जण हवी आहेत. मेल्टर आणि मॅनेजर.” – मधुकर. 

“तुला कशी टीम लागते ते मला माहीत आहे. ही दोन माणसे एकदम फिट बसतील.” मधुकरच्या मित्रांनी सांगितलं. 

“ठीक आहे इंटरव्ह्यु साठी पाठवून दे. जाण्याचा आणि येण्याचा खर्च देऊ.” – मधुकर म्हणाला.

“ओके. मी त्यांना विचारून कॉल करतो. बाकी सर्व ठीक ?” – मित्र.

“हो ठीकच आहे.” – मधुकर. 

 

हळू हळू कंपनीची गाडी पूर्वपदावर येत होती. नवीन प्रॉडक्शन मॅनेजर ज्या तडफेने  काम सांभाळत होता, ते बघून मधुकर एकदम समाधानी होता. आता रिजेक्शन जवळ जवळ नव्हतच. सातपुते साहेबांच्या काटेकोर तपासणी नंतर ते सुद्धा आनंद व्यक्त करत होते. नवीन मेल्टर अनुभवी होता आणि चांगलं काम करत होता. स्टोअर मध्ये चव्हाण नावाचे गृहस्थ मॅनेजर म्हणून आले होते. त्यांना 20 वर्षांचा अनुभव होता त्यामुळे परचेस आणि स्टोर सुरळीत चाललं होतं.

 

जवळ जवळ वर्ष संपत आलं होतं आणि जूने  क्लायन्ट पण मालाची क्वालिटी बघून वापस आले होते. किरीट आणि जयंत साहेब खुश होते.

वर्षभर मधुकरने अथक काम केलं होतं. ना दिवस पाहिला ना रात्र, याचा प्रकृतीवर परिणाम झाला नसता तरच नवल. तसा तो झालाच. तरी मधुकरने तापातच आठ दिवस खेचलेच.

 

त्या दिवशी मधुकरला जरा अधिकच बर वाटत नव्हतं. पण तरी तो फॅक्टरीत

आला होता. साडे बारा वाजता नेहमी प्रमाणे सर्व मिटिंगला जमले तेंव्हा सर्वांच्याच

लक्षात आलं की मधुकर ला ताप आला आहे. अंग चांगलच तापलं होतं. सर्वांनी मधुकरला तो नको नको म्हणत असतांना जबरदस्तीने घरी पाठवलं.

 

दुसऱ्या दिवशी सातपुते साहेबांनी मधुकरला फोन लावला. फोन स्विच ऑफ येत होता. त्यांना काळजी वाटली. त्यांनी बाकीच्या तिघांना ही गोष्ट सांगितली. सगळ्यांनी एकेकदा प्रयत्न करून पाहिला. मग सर्वच गंभीर झालेत. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार सातपुते माधुकरच्या घरी जायला निघाले.

 

खूप वेळा बेल वाजवूनही दार उघडत नाही हे बघून सातपूत्यांनी फॅक्टरीत फोन

लावला. .आणि लगेच दूसरा फोन जयंत साहेबांना लावला. त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. पंधराच मिनिटांत किरीट आणि जयंत येऊन पोचले. त्यांनी पण बेल वाजाऊन पाहिली. मग मात्र किरीट साहेबांनी फायर ऑफिस ला फोन लावला.

ती मंडळी आली आणि त्यांनी दार तोडलं. आतमध्ये बेडवर मधुकर जवळ जवळ बेशुद्ध होता. शरीर तप्त लोखंडा सारखं तापलं होतं. जयंतचे सासरे डॉक्टर होते आणि त्यांच हॉस्पिटल होतं. जयंतनी त्यांना फोन लावला आणि अॅम्ब्युलेन्स बोलावली.

मधुकरला तातडीने अॅडमिट करून घेतल्या गेलं आणि आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार चालू झालेत. सर्वच लोकांचे चेहरे गंभीर होते. इतका दणकट माणूस असा आजारी पडेल यांची कोणी कल्पनाच केली नव्हती. ICU मधून डॉक्टर मोघे म्हणजे जयंताचे सासरे, बाहेर आले. लगेच सर्व त्यांच्या भोवती गोळा  झाले. आता डॉक्टर काय सांगतात असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता.

“जयंतराव पेशंट ला हाय फीवर आहे आम्हाला टायफॉइड ची शंका आहे ब्लड टेस्टिंग ला लॅब मध्ये पाठवलं आहे. रीपोर्ट आल्यावरच नक्की कळेल.” – डॉक्टर.

“शुद्धीवर आलेत का ?” जयंता ने विचारलं.

“ते शुद्धिवरच आहेत. परंतु अनिवार थकवा आहे त्यामुळे ग्लानीत आहेत म्हणून तुम्हाला ते बेशुद्ध आहेत असं  वाटलं. टायफॉइड ची शंका त्यामुळेच आली आहे. यांनी किमान एक ते दीड आठवडा तरी ताप अंगावर काढला असावा. आधीच काळजी घेतली असती तर ताप एवढा वाढला नसता. पण आता ते इथे आहेत, आणि आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेउच. बरं यांच्या घरी कोण कोण असतं ? त्यांच्या पैकी कोणाला तरी  बोलावून घ्या. म्हणजे त्यांना अपडेट देता येईल आणि जर काही लागलं तर त्यांना सांगता येईल.” डॉक्टरांनी डीटेल मधे सांगितलं.

 

“ते इथे एकटेच राहतात. त्यांची बहीण इंदूरला असते. तिला कळवल आहे ते लोक उद्या पर्यन्त पोचतील.” – जयंत.

‘ठीक आहे, ICU मध्ये असल्याने तशी कोणी थांबण्याची जरूर नाहीये. तेंव्हा तुम्ही चला आता. काही वाटलं तर जयंतराव तुम्हाला कळवुच.” डॉक्टरांनी सांगितलं.  सगळे घरी जायला निघाले पण मागे सचिन थांबला. तो तरुण होता आणि धाव पळ करू शकत होता म्हणून तोच थांबला.

दुसऱ्या दिवशी मधुकरची बहीण अनीता आणि तिचा नवरा राजेश आले. त्यावेळेला जयंतची मेहुणी, डॉक्टर मेघना तिथे राऊंड वर होती.

“डॉक्टर, आता कशी आहे मधुकरची तब्येत ? आम्ही बघू शकतो का ?” – अनीता

 

क्रमश:.........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com