मॅनेजरशीप - भाग ११ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग ११

मॅनेजरशीप भाग ११

भाग १०  वरून पुढे वाचा.....

 

“ते इथे एकटेच राहतात. त्यांची बहीण इंदूरला असते. तिला कळवलं आहे ते लोक उद्या पर्यन्त पोचतील.” – जयंत.

‘ठीक आहे, ICU मध्ये असल्याने तशी कोणी थांबण्याची जरूर नाहीये. तेंव्हा तुम्ही चला आता. काही वाटलं तर जयंतराव तुम्हाला कळवूच.” डॉक्टरांनी सांगितलं.  सगळे घरी जायला निघाले पण मागे सचिन थांबला. तो तरुण होता आणि धाव पळ करू शकत होता म्हणून तोच थांबला.

दुसऱ्या दिवशी मधुकरची बहीण अनिता आणि तिचा नवरा राजेश आले. त्यावेळेला जयंतची मेहुणी, डॉक्टर मेघना तिथे राऊंड वर होती.

“डॉक्टर, आता कशी आहे मधुकरची तब्येत ? आम्ही बघू शकतो का ?” – अनिता

“अजून ग्लानीतच आहेत. कारण अशक्त पणा खूप आहे. तापही आहेच. पण काळजी

करू नका. योग्य ती ट्रीटमेंट चालू आहे.” – डॉक्टर मेघना.

“ICU मध्ये किती दिवस रहाव लागेल ?” – अनिता.

 

“आम्ही आज त्यांना रूम मध्ये शिफ्ट करतो आहोत. ICU मध्ये काल ठेवण्याचं इतकंच कारण होतं की पेशंट 24 तास आमच्या नजरे समोर राहील. पण आता आम्ही रूम मध्येच 24 तास attendance राहील अशी व्यवस्था करतो आहोत. एक नर्स त्यांच्याच रूम मध्ये राहील आणि ती सर्व गोष्टी मॉनिटर करेल. म्हणजे  व्यवस्था सगळी आयसीयू ची पण रूम मध्ये. म्हणजे तुम्हाला पण तिथे राहता येईल. आयसीयू मध्ये कोणाला प्रवेश नसतो. आणि यांची प्रकृती तशी फार गंभीर नाही आहे.” - डॉक्टर मेघना.

“डॉक्टर काही संदर्भ लागत नाहीये. एकीकडे म्हणता की प्रकृती गंभीर नाहीये आणि दुसरीकडे 24 तास नर्स असणार आहे म्हणता. मला कळलं नाही.” – अनीता. 

 

“अहो तुमचा पेशंट ठीकच आहे. त्यांची ट्रीटमेंट चालूच आहे. पण माझे जिजाजी, म्हणजे जयंत देसाई, कंपनी चे मालक, त्यांचं म्हणण असं आहे की कुठलीही कसर राहता कामा नये. श्रीयुत मधुकर सरनाईक हे त्यांच्यासाठी आणि कंपनी साठी अत्यंत महत्वाचे आहेत. अमोल आहेत. आता तुम्हीच सांगा माझे वडील म्हणजे त्यांचे सासरे जावयाचा शब्द खाली पडू देतील का? काळजीच खरंच काही कारण नाही. टायफॉइड आहे थोडा वेळ लागेल पण नो worries. आणि म्हणूनच मी स्वत: यात पूर्ण लक्ष घालते आहे.” डॉक्टर मेघना.

 

अनितांचं समाधान झालं आणि बरही वाटलं.

आठवडा झाला. माधुकरची तब्येत आता झपाट्याने सुधारू लागली होती. अशक्तपणा होता पण आता बरीच सुधारणा झाली होती. मेघना म्हणाल्या प्रमाणे ती खरंच रात्रंदिवस चकरा मारायची. एकदा अनिता ने विचारलं  देखील की “एवढ्या रात्रिबेरात्री कशा काय  येता ?” तर म्हणाली की “शेजारच्याच बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो. आणि हॉस्पिटल आणि घर यांच्यामध्ये एक फाटक आहे.”

 

अनिताचे सासू, सासरे तसे वयस्कर होते आणि अनीता त्यांच्या जवळ मुलांना

सोपवून ती इथे आली होती. तिला आता जास्ती दिवस राहणं शक्य नव्हतं. मधुकरची तब्येत आता सुधारली होती आणि त्याची काळजी पण खूप चांगल्या रीतीने घेतल्या जात होती. म्हणून मधुकर आणि मेघना ला विचारून ती इंदूरला जायला निघाली. मेघना म्हणाली की आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ. तुम्ही निश्चिंत पणे जा. रोजच्या रोज तुम्हाला फोन वरून अपडेट देत जाऊ. अनीता मग जरा जड अंत:करणानेच निघाली.

 

दोन तीन दिवस असेच गेलेत. आता मधुकरची तब्येत बरीच सुधारली होती. रूम मध्येच तो हिंडा फिरायला लागला होता. अशक्तपणा होताच पण बराच कमी होता. मेघना अजूनही पूर्णपणे मधुकरच्याच तैनातीत होती. मधुकरशी ती मुद्दाम इकडच्या तिकडच्या गप्पा मारायची. त्याला आनंदी ठेवण्यासाठी तिचे आटोकाट प्रयत्न चालले होते. एक दिवस मधुकरने तिला विचारले की

“अजून किती दिवस इथे राहायचे आहे ? आता मला बरं वाटतंय. स्वत:ची काळजी स्वत: घेऊ शकेन.  किती दिवस फॅक्टरीत गेलो नाहीये, तिथे पण जायला पाहिजे.”

 

“अजून तुमचा अशक्तपणा पूर्ण गेला नाहीये. तो भरून येई पर्यन्त तरी इथेच रहाव लागेल. आणि  का हो ? इथे काही त्रास होतो आहे का ? का मी सारखी येते आणि बडबड करते म्हणून ते आवडत नाहीये. मी नको येऊ का ?” –डॉक्टर मेघना                                         

“अहो, नाही नाही, तुम्ही आहात म्हणून तर जरा सुसह्य होतेय. नाही तर आढ्या  कडे पहात वेळ घालवावा लागला असता. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका. खरं तर तुम्ही डॉक्टर आहात आणि हे तुमचंच हॉस्पिटल आहे. मी असा प्रश्नच विचारायला नको होता. किती कष्ट घेता तुम्ही माझ्यासाठी, रात्री बेरात्री सुद्धा माझी तब्येत पहाण्यासाठी येता. सॉरी.” मधुकर घाई घाईने म्हणाला.

“बापरे, तुमच्या सारखा कणखर इंजीनियर, ज्याने सर्व वाईट लोकांचे मनसुबे उधळून लावले, इतका emotional होतो !  आश्चर्यच  आहे.” – डॉक्टर मेघना.

 

“तुम्हाला कोणी सांगितलं की कणखर माणसांना भावना नसतात म्हणून ? बरं ते जाऊ दे, एक विचारू का ?” – मधुकर.

“काय ?” – मेघना.

“काल जयंत साहेब आले होते. त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी पण होत्या. त्या तुम्हाला ताई म्हणत होत्या आणि तुम्ही जयंत साहेबांना जिजाजी म्हणालात. तुमचं काही नातं आहे का ?” – मधुकर.

“हो. जयंत साहेबांची बायको माझी सक्खी बहीण.” – मेघना. 

“अरे. पण ती तर तुमच्याहून लहान वाटते.” – मधुकरनी आश्चर्यानी विचारलं. 

“आहेच ती लहान. त्यांचं लव मॅरेज आहे. मला MD करायचं होतं म्हणून मीच

म्हंटलं की माझ्यासाठी थांबण्याची गरज नाही, मग बाबांनी तिचं लग्न लाऊन दिलं.” मेघना म्हणाली.

 

“अस आहे होय ! कशात केलं MD तुम्ही ? म्हणजे मला त्यातलं काहीच कळत नाही. या बाबतीत आम्ही अंगठा छाप आहोत. जस्ट जनरल माहिती असावी म्हणून विचारलं.” – मधुकरला आता तिच्याशी बोलावसं वाटत होतं.

 

“मेडिसीन मध्ये केलं PG. आणि तुम्ही म्हणता तसं अंगठा छाप वगैरे काही नसतं. मला कुठे कळतेय metallurgy मध्ये काय असतं ते. प्रत्येकाचं आपापलं क्षेत्र असतं.

लोखंड आणि स्टील हे वेगवेगळ असतं आणि पोलाद म्हणजेच स्टील आणि स्टेनलेस स्टील वेगळं हे जिजाजीनी सांगितल्यावर कळलं. म्हणजे आपण दोघेही एकमेकांच्या क्षेत्रात अंगठा छाप आहोत. फिटटं फाट.” असं म्हणून ती खळखळून हसली.

 

लोभस दिसत होती की तो तिच्या कडे एक टक बघतच राहिला. इतके दिवस त्याच तिच्याकडे लक्षच मधुकर तिच्याच कडे बघत होता. बोलतांना ती इतकी नव्हतं. इतर डॉक्टरांसारखीच एक अशीच त्याची नजर होती. पण आता त्याला जाणवलं की ती खूप आकर्षक आहे आणि तिचं हसणं तर.. आणि हसतांना पडणारी खळी... तो वेडावूनच गेला.  त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं, मेघना त्याला एकदम आवडली आणि हा साक्षात्कार त्याला आयुष्यात प्रथमच झाला. आज पर्यन्त कामापलीकडे काही जग असतं हेच त्याला माहीत नव्हतं. कधी मनात विचार पण आला नव्हता. त्याची नजर मंत्रमुग्ध होऊन तिच्यावरच खिळली.

 

मेघना त्याच्याच कडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे फेरफार तिला कळले आणि ती अवघडून गेली. सुखावली पण. तसंही माधुकरच्या सान्निध्यात जास्तीत जास्त कसं राहता येईल याच साठी तिचे प्रयत्न असायचे. सुरवातीला तिच्या बाबांनी तिला मधुकरला attend करायला सांगितलं तेंव्हा तिला जरा रागच  आला होता. ती म्हणाली सुद्धा तिच्या बाबांना की मला तर तुम्ही नर्सच बनवून टाकल आहे. पण हळू हळू परिस्थिति वळण घेत होती आणि तिला ते वळण हवं हवस वाटत होतं. पण मधुकरकडून काहीच प्रतिसाद नव्हता. आता जेंव्हा मधुकरची अवस्था तिने पाहिली तेंव्हा ती एकदम सुखावून गेली. पण तेंव्हाच तिला कळलं की आता निघायची वेळ झाली आहे.

 

क्रमश:...........

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com