रिमझिम धून - ४

  • 5.7k
  • 1
  • 3.3k

''नाष्टा करून घ्या मॅडम. गुंड मागे लागले तर पाळण्याची ताकद हवी ना?'' तो तरुण अधिकारी पुन्हा म्हणाला. आणि उठून जुई खायला बसली. गुंड शब्द उच्चारल्या बरोबर तिची भीतीने थरथर झालेली त्याने पहिले. पण साहजिक होत. एक मुलगी, त सुद्धा एकटी रात्रीचा प्रवास करणार, आणि त्यात अचानक ओढवलेला प्रसंग यामुळे घाबरली होती. हे त्याच्या लक्षात आल. मंगेश काही कामानिमित्त बाहेर गेला. ते पोलीस अधीकारी बेड्वर डोळे मिटून पडलेले होते. नाश्टा उरकून जुई पुन्हा सोफ्यावर बसली. तिचे कुठेही मन लागेना. एकाकी पानाची भावना मनाला पोखरत होती. कुठे फसलो आपण? आणि घरचे लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील? आपण फसवलं सगळ्यांना. या विचारात