रिमझिम धून - ९

  • 4.3k
  • 2.4k

'लॉक उघडून जुई घरात शिरली. तिने आपली खांद्याची पर्स काढून टेबलवर ठेवली. थकली होती ती. थोडस पाणी पिऊन ती सरळ सोफ्यावर आडवी झाली नाही तोच एक हलकासा पर्फ्यूचा वास तिच्या नाकाशी रेंगाळत होता. हा ओळखीचा वाटणारा परफ्युम वासावरुन तिने ओळखला होता. पण हा वास इथे आपल्या जवळपास येणे निव्वळ अशक्य होते. आपण स्वप्नात तर नाही ना? असे तिला वाटले. आणि तिने चटकन डोळे उघडले. आपल्या घरी आपल्याशिवाय अजून कोण आहे का? हे पाहण्यासाठी ती आधी बेडरूममध्ये गेली, नंतर तिने किचन आणि हॉल चेक केला पण आजूबाजूला कोणीही नव्हते. हॉलच्या बाल्कनीतून तिला कसलातरी आवाज आला. आणि बाजुला करून ठेवलेल्या खिडकीच्या पडद्याकडे