अघोरी सूड - भाग २

  • 9.8k
  • 4.7k

थॉमस फार घाबरला होता. त्याने ठरवले कि आता प्रत्येक वेळी शेतावर जाताना आपली शॉटगन बरोबर ठेवायची आणि एखाद्या नोकराला बरोबर घेऊन जायचं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो शॉटगन आणि एका कोडझो नावाच्या नोकराला बरोबर घेऊन शेताची पाहणी करायला गेला. त्या दिवशी सुद्धा त्याला ते डुक्कर दिसले. त्याने लगेच त्याची शॉटगन काढून एक गोळी त्या डुकरावर मारली. थॉमस चा निशाणा अचूक होता तरीपण त्या डुकराला काही झाले नाही. थॉमस ने पटकन गन लोड करून आणखीन एक गोळी झाडली. तरीपण डुकराला काही झाले नाही. बरोबर आलेला नोकर तर पुरता भांबावला होता. थॉमस भयभीत होऊन त्याच्याकडे पाहू लागला. थॉमस ने नोकराला विचारले "कोडझो, तुला