होल्ड अप - प्रकरण 21

  • 5.6k
  • 3.2k

प्रकरण २१ “ मी जसा विचार करतोय तसं मला जाणवतंय की माझी चूक झाली सांगताना.मी तिला सिगारेट ऑफर केलीच नाही. आधीच्या संध्याकाळी हा प्रसंग घडला होता, त्यावेळी मी तिला सिगारेट देऊ केली होती.त्याही वेळी तिने माझा ब्रँड नाकारला होता. ती नेहेमी तिचा स्वतःचा ब्रँडच पिते. ” “ पण तुम्ही तिला सिगारेट ऑफर केल्यावर दरवेळी तिची सिगारेट तुमच्याच लायटर ने पेटवता?” पाणिनी ने विचारलं. “ नाही.तिच्या सिगारेट केस ला लायटर जोडलेला आहे.त्यामुळे ती त्यानेच पेटवते.” “ तू ती केस बघितली आहेस की कोणाकडून ऐकलं आहेस फक्त?” “ बघितली आहे अनेकदा. त्या संध्याकाळी पण आणि या पूर्वी ही अनेकदा. पण तेव्हा मला