रिमझिम धून - १३

  • 5.1k
  • 2.8k

'ऑपरेशन उरकून जुईने बॅग भरली. आजचे पेशन्ट्स संपले होते. संध्याकाळ झाली होती. त्यामुळे सिस्टरला बाय करून ती घरी जाण्यासाठी निघाली. घरी आईची विचारपूस करण्यासाठी तिने फोन लावायला हातात घेतला, तोच अर्जुनाचा तिला फोन आला होता. तिने उचलला.'''हॅलो अर्जुन, गुड इव्हनिंग.'' जुई '''गुड इव्हिनिंग जु. ऐक ना, आय नीड युअर हेल्प.'' वेळ कमी होता. अर्जुन पटकन तिला बोलून गेला. ''काय झालं? आर यु ओके?'' जुई ''आय एम फाईन. एका मित्राचा अपघात झालाय. तो मुंबईला नाही येऊ शकत. तुला कर्जतमध्ये यावं लागेल. अर्थात तुझी यायची सोय मी करतो.'' अर्जुन ''कर्जत? एवढ्या लांब. अरे दुसरा जवळचा डॉक्टर बघ ना. मी बघू का?'' जुई ''नको,