अशीही जमते जोडी

  • 12.5k
  • 4.5k

अशीही जमते जोडी   हॉल चांगलाच गजबजला होता. हॉल मधे बरेच तरुण तरुणी एकत्र आले होते. आपसात जोडीने जोडीने गप्पा चालल्या होत्या. जोड्या बदलल्या जात होत्या, एका वधू - वर सूचक संस्थेने आयोजित केलेला वधू - वर मेळावा होता तो. वातावरण तसं भारलेलं होतं. थोडी उत्सुकता, थोडा संकोच आणि ओळख, गप्पा, चर्चा चालू होत्या, खूप सारा उत्साह, अश्या संमिश्र वातावरणात आयुष्याचा जोडीदार कसा असावा यांच्या चर्चा रंगल्या होत्या. काही जण टेबल वर बसले होते तर काही जण उभ्यानेच  बोलत होते. एका बाजूला खिडकी पाशी मंगेश एकटाच कॉफी पित बसला होता. थोडा वेळ तसाच गेला. कावेरी कॉफी पित पित हिंडत होती,