होल्ड अप - प्रकरण 25

  • 5.2k
  • 2.9k

होल्ड अप प्रकरण २५ “ तुम्ही हरकत घेताय?” एरंडेनी विचारलं. “ होय.” काणेकर म्हणाला. “ ओव्हररुल्ड.” “ आणि मरुशिका, तुम्ही या मजकुराचा उपयोग आजच्या तुमच्या सकाळच्या सत्रातील साक्षीसाठी आणि उलट तपासणीसाठी केलात?” पाणिनी ने विचारलं. “ मला सारखं सारखं ऑब्जेक्शन घ्यायला नको वाटतंय,युअर ऑनर पण या प्रश्नांसाठी काहीही आधार नाही. पुराव्यात नसलेल्या बाबींवर प्रश्न विचारले जात आहेत. मिस्टर कामोद यांनी काहीतरी खरडून एखादआ कागद मरुशिका यांचेकडे दिलं म्हणून त्या त्यांची साक्ष त्यातील मजकुराच्या आधारावर देत आहेत आणि स्वतःच्या स्मरण शक्तीच्या आधारावर देत नाहीयेत असं समजणे योग्य नाही. उदाहरणार्थ, त्याने समजा त्या कागदावर लिहिलं असतं की, आरोपी महाजन यानेच मला बंदूक