होल्ड अप - प्रकरण 26

  • 4.9k
  • 2.7k

होल्ड अप प्रकरण २६ “तुम्हाला फेर तपासणी घ्यायची आहे?” आरुष ला एरंडे यांनी विचारलं. “ हो.” आरुष म्हणाला.आणि साक्षीदाराकडे वळला. “ मला समजल्यानुसार अत्ता तरी तुम्हाला माहिती नाहीये की तुम्ही मारुशिका व्हिला ला फोन लावलात की नाही.सहाजिकच आहे कारण हे घडून बरेच दिवस झालेत.म्हणूनच तुम्ही अशी भूमिका घेतल्ये की तुम्हाला आठवत नाहीये, बरोबर आहे की नाही?” “ अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते.”-कामोद म्हणाला. “ दॅट्स ऑल युअर ऑनर.” आरुष काणेकर खुष होवून म्हणाला. “ एक मिनिट, कामोद.” पाणिनी म्हणाला “ त्या वेळी घडलेले अन्य सर्व प्रसंग तुम्हाला लख्ख आठवताहेत, बरोबर ना?” पाणिनी ने विचारलं. “ होय.”—कामोद “ म्हणजे कोणत्या