होल्ड अप - प्रकरण 29 - अंतिम भाग

  • 6.6k
  • 3.1k

होल्ड अप प्रकरण २९ ( शेवटचे प्रकरण. ) “ काणेकर, तुम्हाला काय विचारायचं आहे?” –एरंडे. “ मला या संपूर्ण साक्षीवरच हरकत नोंदवायची आहे. मूळच्या होल्ड अप च्या गुन्ह्याशी काहीही सबंध नसलेली ही साक्ष आहे.पटवर्धन यांनी पूर्ण पढवून तयार केलेली ही साक्षीदार आहे.बचाव पक्षाला हवयं ते बोलणारी आणि सरकार पक्षाच्या साक्षीदारांना वेगळ्याच प्रकरणात गोवू पाहणारी.” काणेकर म्हणाला. “ तुम्हाला काय म्हणायचंय, पाणिनी पटवर्धन यांच्या ताब्यात ही साक्षीदार होती? ” एरंडे म्हणाले. “ नक्कीच युअर ऑनर.केवळ पटवर्धन म्हणतात की ती त्यांच्या ऑफिस मधून पळून गेली.कशावरून पटवर्धन यांनीच तिला लपवून ठेवलं नसेल? ” –काणेकर. “ मिस्टर काणेकर, मी स्वतः तुमच्या आणि पटवर्धन यांच्या