रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 3

  • 6.7k
  • 2.6k

अध्याय 3 ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण : कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी ।तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥एकोदरा सख्या बहिणी । दो दुस्सर पाटणी नांदती सख्या ॥२॥दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।दोघीं नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥दोघी नाही नित्य संबंध । दोघीं नाही नित्य संवाद ।दोघीं नाहीं नित्य बोध । तो सख्यसंबंध अति मिथ्या ॥४॥दोघीं नाहीं एक सुख । त्या सख्या मानिती मूर्ख ।तूं एक करिसी व्यर्थ दुःख । आम्हां निजसुख एकत्वें ॥५॥आम्हां तुम्हां एक आहेवपण । आम्हां