रामायण. - कादंबरी
MB (Official)
द्वारा
मराठी आध्यात्मिक कथा
बालकाण्ड
अध्याय - 1
॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥
जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा
कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् ।
प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिं
बध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥
श्रीगणेश वंदन
ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।
वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥
तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।
तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥
यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी ।
तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥
ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश ।
आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी घांस निजभक्तां ॥ ४ ॥
ऐसें ऐकोन स्तवन । संतोषला गजानन ।
माझें वसवूनियां वदन । वक्ता वचन स्वयें झाला ॥ ५ ॥
ऐसा जाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न ।
उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवीं वेगीं ॥ ६ ॥
बालकाण्ड अध्याय - 1 ॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥ जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वाकृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् ।प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिंबध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥ श्रीगणेश वंदन ...अजून वाचानमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी ।तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश ।आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी
अध्याय 2 ॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥ यज्ञपुरुषाने दिलेल्या प्रसादाचे विभाग राजा पाहे राष्ट्र सकळ । तंव फिटले द्वंद्वदुःखदुष्काळ ।पाहिला सर्वत्र सुकाळ । अफळ ते सफळ वृक्ष झाले ॥ १ ॥प्रजा स्वानंदे निर्भर । गोगोधनां आनंद थोर ।अग्निहोत्रें घरोघर ...अजून वाचायाग द्विजवर यजिती सुखें ॥ २ ॥पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण । कोणा नाहीं दुःख दैन्य ।घरोघरीं वेदाध्ययन । हरिकीर्तन हरिभक्ती ॥ ३ ॥भूतळा येईल राघव । यालागीं वैकुंठींचें वैभव ।पुढे धाडिले जी सर्व । तेणें शोभा अपूर्व अयोध्येसीं ॥ ४ ॥ अयोध्येत इंद्राच्या अप्सरांचे आगमन राजा शोभे सिंहासनीं । अति आल्हाद राजभुवनीं ।आनंद न माये त्रिभुवनीं । तंव स्वर्गाहूनि आल्या देवांगना
अध्याय 3 ॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण : कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी ।तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥एकोदरा सख्या बहिणी । दो दुस्सर पाटणी ...अजून वाचासख्या ॥२॥दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।दोघीं नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥दोघी नाही नित्य संबंध । दोघीं नाही नित्य संवाद ।दोघीं नाहीं नित्य बोध । तो सख्यसंबंध अति मिथ्या ॥४॥दोघीं नाहीं एक सुख । त्या सख्या मानिती मूर्ख ।तूं एक करिसी व्यर्थ दुःख । आम्हां निजसुख एकत्वें ॥५॥आम्हां तुम्हां एक आहेवपण । आम्हां
अध्याय 4 ॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : ऐकोनियां कथाश्रवण । ज्ञाते म्हणती अप्रमाण ।नव्हे हें मूळीचें निरूपण । तिहीं शिवरामायण पहावें ॥ १ ॥स्कंड पुसे अगस्तीप्रती । शिवभवानी राम जपती ।राम कोण तो त्रिजगतीं । यथास्थिती ...अजून वाचासांगा ॥ २ ॥तो म्हणे श्रीराममहिमान । सांगावया मी अति दीन ।जेथें वेदां पडे मौन । तें वदावया वदन मज नाहीं ॥ ३ ॥तुझ्याचिं ऐसा प्रश्न । सदाशिवाप्रति जाण ।पार्वती पुसे आपण । श्रीराम कवण मज सांगा ॥ ४ ॥श्रीरामाची कोण स्थिती । कोण श्रीरामाची कीर्ती ।समूळ सांगा मजप्रती । पुसे अति प्रीती जगदंबा ॥ ५ ॥कोण श्रीरामाची ख्याती ।
अध्याय 5 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : पूर्वकथेचे अनुसंधान । कौसल्यें उघडिले नयन ।डोहाळे पुसावसा जाण । राजा सावधान स्वयें जाला ॥ १ ॥कौसल्या रामगर्भें स्वरूपस्थिती । राजा प्रवृत्तिधर्में पुत्रार्थी ।दोहींच्या संवादाची प्रीती । डोहळे निश्चिती अवधारा ...अजून वाचा२ ॥राजा म्हणे स्वमुखें कांते । काय आवडीं आहे तूतें ।वेगीं सांग डोहळ्यांतें । सांडी परतें भ्रमासी ॥ ३ ॥येरी म्हणे मी अवघा राम । मजमाजी तंव कैंचा भ्रम ।अवतरलों पुरुषोत्तम । देवांचे श्रम फेडावया ॥ ४ ॥ऐकोनि शंकिजे रायें । म्हणे इसी जाहलें तरी काये ।आप आपणियातें पाहें । सावधान होय प्रिये तूं ॥ ५ ॥येरी म्हणे मी नव्हे
अध्याय 6 श्रीरामजन्मप्रसंग ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामाचा जन्मकाळ : श्रीरामाचा जन्मप्रभाव । अजन्मा जन्मेल रामराव ।पाहूं आला सुरनरसमुदाव । तो नवलाव पाहूं आले ॥ १ ॥प्रसूतिसमय कौसल्येसी । तंव अयोध्येच्या चौपासीं ।विमानें दाटलीं आकाशीं । विबुध वेगेंसी पैं ...अजून वाचा॥ २ ॥सूर्यवंशा येईल रघुनाथ । यालागीं मध्यान्हीं आला आदित्य ।लग्नीं साधिला अभिजित । जन्ममुहूर्त राघवा ॥ ३ ॥वक्री अतिचर होऊन । वेगीं चालोनि आपण ।केंद्री आणि उच्चस्थान । तेथे ग्रहगण स्वयें आले ॥ ४ ॥शुद्धसुमनीं वसंत ऋतु । मधुमास अति विख्यातु ।शुक्ल पक्ष नवमी आंतु । जन्म रघुनाथ पावला ॥ ५ ॥ सुखरूप प्रसूती व श्रीरामांचे प्रकटन : श्रीराम
अध्याय 7 श्रीरामांची तीर्थयात्रा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ धन्य रामायण सृष्टीं । धन्य वाल्मीकाचे वाग्वृष्टी ।अक्षरीं अक्षरपरिपाटी । दोष कोट्यनुकोटी नासती ॥ १ ॥नासती महापातकें । नासती द्वंद्वेदुःखे ।रामकथा ऐकतां हरिखें । सुख महासुखें थोरावे ॥ २ ॥येथोनि श्रीरामचरित्र ...अजून वाचाअपवित्रा करी अति पवित्र ।कथाकौतुक अति विचित्र । श्रोतीं सादर परिसावें ॥ ३ ॥ श्रीरामजन्माने लंकेत घडलेल्या अशुभसूचक घटना : श्रीराम जन्मला अयोध्यापुरीं । तंव वीज पडे लंकेवरी ।भूस्फोटन नगरद्वारीं । भूकंप नगरीं त्रिकेटेंसीं ॥ ४ ॥रावण जंव भद्रीं चढे । तंव मुकुट पायरीवरी पडे ।वायुघातें छत्र मोडे । सभेचे हुडे खचोनि पडती ॥ ५ ॥कुंभकर्णाच्या घरावरी । दिवाभीत घूं
अध्याय 8 विश्वामित्रांचे आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम सच्चिदानंदघन । तोही वैराग्यलक्षण ।लोकलक्षणार्थ दावी आपण । दीन जन तारावया ॥१॥सकळ वैराग्याचे फळ । स्वयें श्रीराम केवळ ।तोही वैराग्याचें शीळ । दावी प्रबळ लोकोपकारा ॥२॥ श्रीरामांची अनासक्ती : तीर्थाहूनि ...अजून वाचारघुनाथ । नावडे राज्य राज्यार्थ ।नावडे लोक लोकार्थ । विषयस्वार्थ नावडे ॥३॥नावडे इंद्रियांचा संग । नावडे इंद्रियांचा भोग ।नावडे देहादि देहधर्म ।नावडे विलाससंभ्रम । वैराग्य परम अनुतापी ॥५॥नावडे स्त्रियांची भेटी । नावडे स्त्रियांसीं गोष्टी ।नावडे स्त्रियां पाहों दृष्टी । वैराग्य पोटीं विषयांचें ॥६॥नावडे शाब्दिक चावट । नावडे चातुर्य वटवट ।नावडे अतिवाद खटपट । मौननिष्ठ अनुतापी ॥७॥नावडे कळा कौतुक चांग ।
अध्याय 9 श्रीरामांचे वैराग्यनिरुपण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सन्मुख देखोनि श्रीराम । विश्वामित्राचा मनोधर्म ।सुखावोनि सप्रेम । आनंदे परम बोलत ॥१॥आजी माझें सार्थक कर्म । आजी माझा सफळ धर्म ।आजी माझें पूर्ण काम । रायें श्रीराम यज्ञार्थ दिधला ॥२॥ऋषि ...अजून वाचाश्रीरामासी । चाल जाऊं माझ्या आश्रमासी ।सिद्धि पाववीं स्वधर्मासी । तूं सर्व कामासी निजमोक्ष ॥३॥राम म्हणे ऋषि समर्था । कांही पुसेन मनोगता ।कृपा करावी कृपावंता । मी तत्वता वचनार्थी ॥४॥ देहदोषांविषयी श्रीरामांचा विश्वामित्रांस प्रश्न : देह तंव अत्यंत अशक्त । देहकर्म तेंही नाशवंत ।कर्मफळ ते क्षयभूत । सुख कोण येथ देहसंगे ॥५॥देहलोभे आर्तभूत । जो विषय सेवीत ।तो तत्काळ विष्ठा
अध्याय 10 राजा जनक व शुकाचार्य यांचा संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ विश्वामित्र उवाच –न राघव तवास्त्यन्यज्ञेयवतां वर ॥स्वयैव सूक्ष्मया बुद्ध्या सर्वं विज्ञातवानसि ॥१॥ विश्वामित्र म्हणे रघुनाथा । तूं सूक्ष्मबुद्धि अति तीक्ष्णता ।ज्ञान ज्ञेय परमार्था स्वभावता परिपूर्ण ॥१॥ज्ञात्यांमाजी ज्ञानवरिष्ठ ...अजून वाचात्यांचा अनुभव जो चोखट ।तो तुजमाजी दिसे प्रकट । वैराग्य उद्भट ज्ञानगर्भा ॥२॥वैराग्य जें ज्ञानसगर्भ । तोचि ज्ञानाचा समारंभ ।वैराग्येंवीण ज्ञान दुर्लभ । तें तुज सुलभ स्वभावता ॥३॥ भगवद्व्यासपुत्रस्य शुकस्येव मतिस्तव ।विश्रांतिमात्रमेवैतज्ज्ञाता ज्ञेयमपेक्षते ॥२॥ जैसा शुक व्याससुत । जन्मापासोनि स्वभावमुक्त ।तैसाचि तूं रघुनाथ । प्राप्त परमार्थ स्वन्हावें ॥४॥त्या शुकाचा ज्ञानार्थ । विकल्पें पावला घात ।तोचि गुरुवाक्यें निश्चित । निजपरमार्थ पावला
अध्याय 11 श्रीवसिष्ठरामसंवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ विश्वामित्र उवाच –तस्य व्यासतनूजस्य मलमूत्रापमार्जन् ।यथापयुक्तं तद् राम तावदेवोपयुज्यते ॥१॥ श्रीव्यासाच विरक्त पुत्र । सांगितले शुकाचे चरित्र ।जनकें त्याचा विकल्पमात्र । केला निरहंकार द्वारपाळद्वारें ॥१॥सज्ञानाचें कृपावचन । द्वारपाळाद्वारें जाण ।करोनि विकल्पाचें दहन ...अजून वाचापूर्ण समाधान श्रीशुकासी ॥२॥जैसी विरक्ती शुकासी । तैसी विरक्ती श्रीरामासी ।राज्यवैभव नावडे त्यासी ।त्वांही करावा शिगुरू साचार । विश्रांतीचें घर विवेकापासीं ॥४॥ वासनासंक्षयो नाम मोक्ष इत्युच्यते बुधैः ।पदार्थवासनासक्तिर्बंध इत्याभिधीयते ॥२॥ सकळ वासनेची शांती । या नांव मुख्य मुक्ती ।विषयवासनाउत्पती । बद्धता निश्चितीं या नांव ॥५॥देही असोनि विदेहस्थिती । ज्यासीं नाहीं विषयासक्ती ।त्यासी बोलिजे जीवन्मुक्ती । जाण निश्चितीं रघुनाथा ॥६॥ विश्वामित्र
अध्याय 12 ताटिका वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हे रामायणी निजकथा । जैं आदरें ऐके श्रोता ।तैं पापपुण्यांच्या करी घाता । स्वभावता नित्यमुक्त ॥१॥कथाश्रवणें नित्यमुक्त । हाही नवलाव नव्हे येथ ।अक्षरीं अक्षर अक्षरार्थ। श्रीरघुनाथकथार्थें ॥२॥पढतां रघुनाथचरित्र । श्रोते वक्ते ...अजून वाचापवित्र ।धन्य ऎकती त्यांचे श्रोत्र । धन्य वक्त्र वदत्याचें ॥३॥धन्य धन्य वाल्मीकि मुनी । श्रीरामकथा वदली वाणी ।कथा त्रैलोक्यपवनी । भवमोचनी चरितार्थ ॥४॥रामनाम दों अक्षरीं । कुंटिणी वंदिजे सुरवरीं ।ऐशी कथेची अगाध थोरी । ते कोणें वॆखरीं वानावी ॥५॥हें असो पूर्वकथासंबंधीं। श्रीरामासी लागे समाधी ।ते स्वयें वसिष्ठ उद्बोधी । ते कथाविधी अवधारा ॥६॥श्रीराम जाला सावधान । प्रपंचपरमार्थस्थितीं समान ।हे वसिष्ठांचे
अध्याय 13 सुबाहुनिर्दलनं ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ एह्येहि रजनीं वसाम शुभदर्शन ।अयं सिद्धाश्रमो नाम त्वत्प्रादाद्भविष्यति ॥१॥ सिद्धाश्रमात मुक्काम : विश्वामित्र म्हणे रामासी । सिद्धाश्रम नाम यासी ।येळे राहावें आजिचे निशीं । सिद्धाश्रमासी निजसिद्धी ॥१॥आम्ही तुम्ही केलिया वस्ती । या ...अजून वाचासिद्ध ख्याती ।विस्तारेल त्रिजगतीं । मम आश्रमाप्रति प्रभाते गमन ॥२॥ अस्त्र विद्याग्रहण : येथे सुखें निशा क्रमून । प्रभाते स्नानसंध्या करून ।विश्वामित्र म्हणे आपण । अस्त्रग्रहण करीं रामा ॥३॥वसिष्ठाज्ञेचा निर्धारू । अनुविद्येसी तूं सद्गुरूं ।तदर्थीं आल्हाद थोरू । श्रद्धासादरू रघुनाथ ॥४॥वंदोनि सद्गुरूचरण । कृतांजलि रामलक्ष्मण ।त्यासीं विश्वामित्र आपण । अस्त्रप्रदान प्रारंभी ॥५॥तो म्हणे हें अस्त्रभिग्रहण । त्रिशुद्धी व्हावें सावधान ।सबीजमंत्राचें
अध्याय 14 अहल्योद्धार ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ एवमुक्ते तयोर्वाक्य सर्व एव महर्षय: ।विश्वामित्रं पुरस्कृत्य राघवं वाक्यमब्रुवन् ॥१॥मैथिलस्य नरश्रेष्ठ जनकस्य भविष्यति ।यज्ञः परमधर्मिष्ठो यास्यामस्तत्र वै वयम् ॥२॥त्वं चापि नरशार्दूल सहास्माभिर्गामिष्यासि ।अद्भुतं च धनूरत्नं तत्र त्वं द्रष्टुमर्हसि ॥३॥ जनकराजाकडून स्वयंवराचे आमंत्रण ...अजून वाचाऋषिसभे प्रसन्नोन्मुख । बैसले वर्णिती रघुकुळ टिळक ।तंव जनकाचे दोघे सेवक । पत्र कुंकुमांकित घेवोनि आले ॥१॥विश्वामित्रें निजगायार्थ । ऋषी मेळविले समस्त ।स्वामीनें त्यांसमवेत । यावें यथार्थ स्वयंवरा ॥२॥तंव रामलक्ष्मणांलागुनी । कौशिक बोलावी सन्मानोनी ।दोघीं साष्टांग नमूनी । कर जोडोनी बोलत ॥३॥आम्ही तुझे नित्यांकित । निजसेवक निश्चित ।सिद्धी पावला यज्ञार्थ्स् । पुढील कार्यार्थ सांगावा ॥४॥स्वामी जे तूं आज्ञा देसी ।
अध्याय 15 सीतेचा पूर्वजन्मवृत्तान्त : ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पदकमलरजोभिः मुक्तपाषाणदेहाद्वियमभवदहल्या गौतमे धर्मपत्नी ।त्वयि चरति विशीर्ण ग्रावविंध्याद्रिपादेकति कति भवितारस्तापसा दारवण्त ॥ १ ॥ श्रीरामचरण स्पर्शाचा परिणाम : लागतां श्रीरामपादरजःकण । जावोनियां पाषाणपण ।जाहले अह्ल्योद्धरण । तें दारग्रहण गौतमें केलें ...अजून वाचा१ ॥चरणरजांचा प्रताप । अहल्या जाहली निष्पाप ।हरून गौतमाचा विकल्प । स्त्री अनुरूप पतिव्रता ॥ २ ॥अगाध पदमहिमा देखोन । विस्मित जाले ऋषिजन ।स्वर्गी सुरवर करिती स्तवन । नाम पावन तिहीं लोकीं ॥ ३ ॥पुढें विंध्याद्रीचे ठायीं । जे पाषाण लागती रामपायीं ।ते निःशेष विरोनि पाहीं । उठतील स्त्रीदेहीं सुंदरत्वें ॥ ४ ॥तयां स्त्रियांचे देखोन । बहुसाल तपस्विजन ।ब्रह्मचर्य विरर्जून
अध्याय 16 परशुरामांचा प्रताप : ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता स्वयंवरासी जाण । शिवचापासी लावला गुण ।जा जनकें करावया पण । काय कारण तें ऐका ॥ १ ॥ शिवधनुष्याचा पण करण्याचे कारण : पूर्वी परशुराम कैलासीं । धनुर्विद्या शिवापाशीं ...अजून वाचागणेशापाशीं । लघुलाघवेंशीं शिकला ॥ २ ॥परशुराम कैलासीं । राहिला असे शिवसेवेसी ।तत्परता अहर्निशीं । श्रद्धा गणेशीं समसाम्य ॥ ३ ॥तंव आक्रंदे आत्यंतिक । ऐकिली रेणुकेची महाहाक ।परशुरामें एकाएक । ऐकोनि साशंक तो झाला ॥ ४ ॥येवोनि सांगे शिवापाशीं । रेणुका बोभात आक्रंदेशीं ।आज्ञा पुसतों स्वामींसी । मज मातेपासीं जावया ॥ ५ ॥ रेणुकेची कथा : ऐका रेणुकापुराण । जें
अध्याय 17 सहस्रार्जुनाचा वध व शिवधनुष्याची पूर्वकथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ राजा व राजपुत्र यांच्याशी युद्ध व त्यांचा निःपात – परशुराम पाहे दुरून । निर्नायकी दिसे सैन्य ।राजा नाहीं आला आपण । राजपुत्र पूर्ण देखिले ॥ १ ॥रायाचे राजसुत ...अजून वाचाशोधोनि मारावे समस्त ।हे मातेची आज्ञा समर्थ । तो मी कार्यार्थ साधीन ॥ २ ॥केला त्र्यंबकाचा टणत्कार । नादें मूर्छित झाले सुर ।दुमदुमले गिरिकंदर । राजकुमार धाकिन्नले ॥ ३ ॥धाकें दचकला प्रधान । उभा ठेला धैर्य धरून ।सैन्यें उभ्या उभ्या सांडीती प्राण । टणत्कारें पूर्ण नभ कोंदलें ॥ ४ ॥बाण सोडिला सिंहमुख । तेणें गज मारिलें निःशेष ।रथांचे छेदोनि आंख
अध्याय 18 शिवधनुष्याचा प्रताप व सीतास्वयंवरात रावणाची फजिती ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ स्वयंवरास आलेले निमंत्रित राजे-महाराजे : स्वयंवरसभेची स्थिती । स्वर्गीं देव विमानीं पाहती ।शहाण्णव कुळींचे भूपती । दाटलें क्षितीं सन्मानें ॥ १ ॥आले तपस्वी ऋषीवर । आले यक्ष ...अजून वाचाकिन्नर ।स्वयंवरा आले निशाचर । दैत्य महावीर तेही आले ॥ २ ॥धैर्य वीर्य महाशौर्य । रूपगुणी गुणगांभीर्य ।धर्माधर्म अति औदार्य । ऐसे नृपवर्य येते झाले ॥ ३ ॥जे गोब्राह्मणां साह्यार्थीं । ज्यांची यशकीर्ती महाख्याती ।ज्यांचे पवाडे स्वर्गीं गाती । स्वयंवरार्थीं येते जाले ॥ ४ ॥जे दान देती सर्वस्व । ज्यांची वैकुंठीं वर्णिती वाढिव ।ज्यांचें त्रैलोक्यीं प्रसिद्ध गौरव । तेही राजे
अध्याय 19 श्रीरामस्वरूप वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामाविषयी सीतेची उत्कंठा : सीतेसी सांगती सखीजन । टळलें रावणाचें विघ्न ।तूं भाग्याची सभाग्य पूर्ण । आवडे तो आपण नृप लक्षीं ॥ १ ॥दळें बळें अति संपत्ती । धैर्य वीर्य यश ...अजून वाचा।सखिया दाविती भूपती । सीता ते नृपती मानीना ॥ २ ॥श्यामसुंदर निजमूर्ति । पती तो एक रघुपती ।सीतेनें निश्चय केला चित्तीं । वरकड निश्चितीं मानीना ॥ ३ ॥सभेसी बैसला रावण । धनुष्या न चढवेचि गुण ।राम करूं न शके वरण । जनकें पण केला कथिण ॥ ४ ॥ धनुर्भंगाच्या पणाबद्दल राजांना आवाहन : जो धनुष्यीं वाहील गुण । त्याचें म्यां
अध्याय 20 श्रीराम-सीता विवाह ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामाविषयी सीतेची उत्कंठा : श्रीरामाचे पूर्णपण । रूपरेखागुणलावण्य ।देखोनि सीतेचें वेधलें मन । सर्वथा आन नावडे ॥ १ ॥सांडोनियां चम्द्रामृत । चकोर अन्य न सेवित ।तेंवी सांडूनि रघुनाथ । सीतेचें चित्त ...अजून वाचान मानी ॥ २ ॥जनकें देखोनियां रघुनाथ । चित्तीं आल्हाद अत्यंत ।जानकी द्यावी निश्चितार्थ । साशंकित धनुष्यार्थीं ॥ ३ ॥ श्रीरामांना पाहून सभाजनांची अनेकविध अवस्था : सभास्थियांचे नयन । रामरूपीं अति निमग्न ।रावनासी पडलें मोहन । तटस्थ जन श्रीरामें ॥ ४ ॥श्रीराम देखोनि ऋषिपंक्तीं । अवघे आश्चर्य मानिती ।सीता द्यावी रघुपतिप्रती । मानलें चित्तीं सर्वांसी ॥ ५ ॥पुढील कार्य अति
अध्याय 21 दशरथाचे मिथिलेस आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामसीतेचे पाणिग्रहण : सीतेचें रामासीं लग्न । वचन ऐकोनि रावण ।न दाखवीच काळें वदन । गेला निघोन अधोमुखें ॥ १ ॥देखोनि श्रीरामप्रताप । राजे जाले सकंप ।तिहीं सांडोनियां दर्प । ...अजून वाचानृप निजनगरा ॥ २ ॥यापरी राजे राक्शस अनेक । समप्रतापें केले विमुख ।तेणें जनकासी अत्यंत सुख । परम हरिख लग्नाचा ॥ ३ ॥राजा म्हणे विश्वामित्रासी । शीघ्र आणावया दशरथासी ।मी धाडितों प्रधानासी । परी तो त्यासी मानीना ॥ ४ ॥ जनक उवाच –भवतोऽनुमतेर्ब्रह्मन् शीघ्रं गच्छंतु मंत्रिणं ।मम कौशिक भद्रं ते त्वयोध्यां त्वरिता रथैः ॥ १ ॥जनकेन समादिष्टा दूतास्ते शीघ्रवाहनाः ।त्रिरात्रमुषिता
अध्याय 22 सूर्यवंशवर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ दशरथ राजा मिथिलेला येतो : जीवशिवांचे समाधान । ते हे कथा रामायण ।पवित्र परिकर पावन । जगदुद्धरन जडजीवां ॥ १ ॥श्रीरामीं संलग्नता । सर्वांगें समरसें सीता ।यादि नांव सुलग्नता । ते लग्नकथा ...अजून वाचा॥ २ ॥मार्गीं वसोनि चारी वस्ती । राजा दशरथ शीघ्रगतीं ।आला विदेहपुराप्रतीं । जेथें रघुपति निजविजयी ॥ ३ ॥विदेहपुरा वस्ती आले । ते त्रिभुवनीं विजयी जाले ।विश्वामित्रें मित्रत्व केलें । गुरुत्व दिधलें वसिष्ठें ॥ ४ ॥श्रीवसिष्ठें विश्वामित्रु । केला श्रीरामीं धनुर्विद्यागुरु ।आपण ब्रह्मविद्यासद्गुरु । विजयी रामचम्द्र याचेनि ॥ ५ ॥वसिष्ठनिष्ठानिजनिर्धारीं । दशरथ पावला विदेहपुरी ।रत्न्कळसांचिया हारी । तेजें अंबरीं रवि
अध्याय 23 सीमान्तपूजन रुखवत व भोजन समारंभ ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीमान्तपूजन – भोजनसमारंभ सूर्यवंशींचे भूपती । असंख्य आणि अगाधकीर्ती ।तेर् म्यां सांगितले संकळिती । क्षमा श्रोती करावी ॥ १ ॥ एवमुक्तोऽथ जनकः तमुवाच कृतांजलेः ।श्रोतुमर्हसि धर्मज्ञ मत्कुलं शृण्वतां ...अजून वाचा॥ १ ॥प्रधानेश्वर वक्तव्यं कुलं निरवशेषतः ।वक्तव्यं कुलजातेन तन्निबोध नरेश्वर ॥ २ ॥ वसिष्ठें सूर्यवंशावळी । वर्णिली अति प्रांजळी ।जनक उठोन तये वेळीं । कृतांजळी विनवीत ॥ २ ॥ जनकाचें कुलवर्णन : माझिये कुळींचे भूपाळ । खातिवंत अति प्रबळ ।राउळें परिसावे सकळ । सकळकुळपर्यावो ॥ ३ ॥कन्यादानीं सकळ कुळ । सांगावें लागे स्वयें समूळ ।पहिले कुळीं निमी भूपाळ । त्याची
अध्याय 24 श्रीराममंडपागमनं ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचे लग्नमंडपात आगमन – श्रीरामप्रसाद सेवितां । समाधिसुख फिकें आतां ।ऐसी उल्लासली सीता । श्रीरघुनाथाचेनि शेषें ॥ १ ॥सद्गुारूपरात्पर उपरी । सर्वातें सावधान करी ।घटिका प्रतिष्ठिली अंतरीं । जीवनावरी संख्येची ॥ २ ...अजून वाचाअक्षर पळेंपळ । घडी भरता न लगे वेळ ।लोकव्यापारें विकळ । काळ गेला नेणती ॥ ३ ॥घडी झेंगटातें हाणित । काळ जावो न द्यावा व्यर्थ ।तेणें काळें काळ अंत आणित । मुद्दल तेथें बुडालें ॥ ४ ॥नवल लोकांची नवाई । काळें गिळिलें न पडे ठायीं ।दुमाही चौमाही गणिता वही । तेणें पाही नागवले ॥ ५ ॥सद्गुीरू सांगे भरली घडी ।
अध्याय 25 जानकीचे पाणिग्रहण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीचे पाणिग्रहण – श्रीराममंडपाआंत । आला चहूं वरांसमवेत ।जनकासी आल्हाद बहुत । आला दशरथ ऋषियुक्त ॥ १ ॥जनकें दिधला सन्मान । गाद्या पडगद्या वरासन ।मृदुलिया लोटांगण । ऋषिससंपन्न सभेसीं ॥ २ ...अजून वाचामधुपर्क : मधुपराचें विधिविधान । चारी पुरुषार्थ चवाई पूर्ण ।त्यावरी समाधि सुखासन । वरासन चौघांसी ॥ ३ ॥सदोदिता आवाहन । अधिष्ठानासी आसन ।कर्मरहितासी आचमन । चरणक्षाळण अचरणा ॥ ४ ॥श्रीराम भूषणां भूषण । त्यासी अलंकार आभरण ।निरावरनासी प्रावरण । सर्वगता आगमना वाहनादिक ॥ ५ ॥सहजासी पाठीपोट । अखंडासी वस्तिपीठ ।निःशब्दा शब्द स्पष्ट । निरंतरा अंतःपट लग्नार्थ धरिती ॥ ६ ॥श्रीराम
अध्याय 26 श्रीरामपरशुरामएकात्मबोध निरूपणं ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लग्नाचे वर्हाड अयोध्येकडे निघाले : चौधी बहिणींसहित जाण । जालें जानकीपाणिग्रहण ।जनकें केली बोळवण । सुख संपूर्ण दशरथासी ॥ १ ॥चौघे पुत्र चौघी सुना । कीर्ति न समाये त्रिभुवना ।येव्हढे आल्हादें ...अजून वाचा। अयोध्याभुवना निघाला ॥ २ ॥संनद्ध केलिया दळभार । महामदें गर्जती कुंजर ।घंटाकिंकिणीं सालंकार । पताकीं अंबर शोभत ॥ ३ ॥घोदे नाचविती वीर । जी जी मा मा थीर थीर ।तीपायीं असिवार । अति अरुवार नाचती ॥ ४ ॥अढाऊ झेली साबळधर । कोयतेतकार धनुर्धर ।चालती पायांचे मोगर । अलगाइत बाणाइत ॥ ५ ॥वोढणिये थैकार देत । जेठिये तळपत चमकत ।ऐसें
अध्याय 27 श्रीरामजानकी अयोध्याप्रवेश ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांनी विष्णुचाप वरुणास दिले : परशुराम गेला स्वस्थाना । स्वस्थता दशरथाचे मना ।आनंद वाढला चौगुना । रघुनाथ जाणा निजविजयी ॥ १ ॥सांडोनि वैष्णवचापासी । भार्गव गेला स्वाश्रमासी ।धनुष्य दिधलें श्रीरामासी । ...अजून वाचावरुणासी तेंदिधलें ॥ २ ॥मी आपुलिया निजात्मशक्तीं । रणीं जिंकोनि राक्षसपंक्ती ।वैष्णवचाप हें असतां हातीं । लोक म्हणती धनुष्यबळ ॥ ३ ॥माझ्या यशाची निजपुष्टीं । अवघी जाईल धनुष्यासाठीं ।यालागीं तें उठाउठीं । राम जगजेठी स्वयें त्यागी ॥ ४ ॥स्वसामर्थ्य नाहीं ज्यासी । धनुष्य यश केंवी होईल त्यासी ।यालागीं श्रीराम नव्हें अभिलाषी । म्हणोनि वरुणासी दिधलें ॥ ५ ॥ अयोध्येत प्रवेश,
अयोध्याकाण्ड अध्याय 1 श्रीरामलक्ष्मणांच्या शस्त्रास्त्र विद्यानैपुण्याचे प्रदर्शन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ गजाननाय महते प्रत्युहतिमिरच्छिदे ।अपारकरुणामूर्त्यै सर्वज्ञाशे नमः ॥ १ ॥चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥ रामायणाचे रूपक : श्रीरामकथेची नव्हाळी । शेष वंदी पाताळी ।शिव वंदी ...अजून वाचा। कथाभूतळी जगद्वंद्य ॥१॥तरी ते शतकोटी रामायण । आळवूं शकेल कोण ।तेथे मी अपुरते दीन । परी तो जनार्दन स्वयें वदवी ॥२॥तरी श्रीरामस्वरूप चिद्रूपता । चैतन्यशोभांकित सीता ।तरी देवक्तांच्या क्रूतकार्यार्था । मानुष्यजाड्यता अवतारू ॥३॥अर्धनारीनटेश्वरी । जो पुरूष तोचि नारी ।तेंवी ते सीता निर्धारी। एकात्मतेवरी स्त्रीपुरुष ॥४॥जैसीं बहुरूपी रावराणी । परी स्त्रीपुरुषभाव नाहीं मनी।तरी तेचि संपादणी। लोकसंरक्षणी सत्यत्वे दावी॥५॥’एकाकी न रमते’
अध्याय 2 श्रीरामराज्याभिषेक प्रारंभ ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामराज्यभिषेकाची तयारी, प्रजाजन व राजे यांची सभा : राज्याभिषेक श्रीरामासी । करावया उल्लास दशरथासी ।बोलावोनि ज्येष्ठां श्रेष्ठासी । गुह्य त्यांपासीं सांगतु ॥१॥उदार वसिष्ठादि महाॠषींसी । पृथ्वीपाळ नृपवरांसी ।सेनापती समग्रांसी । गुह्य ...अजून वाचासांगत ॥२॥अष्टादश निजप्रजांसी । बोलोवोनि अति प्रीतीसीं ।बसवोनि सन्मानेंसीं । त्यांपासीं काय मग बोले ॥३॥ परिश्रान्तोऽस्मि लोकस्य गुर्वीं धर्मधुरं वहन् ।सोऽहं विश्राममिच्छामि पुत्रं कृत्वा प्रजाहिते ॥१॥भवभ्दिरपि तत्सर्वमनुवर्तध्वमद्य वै ।अनुजातो हि मां सर्वैर्गुणैः श्रेष्ठा ममात्मजः ॥२॥पुरंदरसमो वीर्ये रामः परपुरंजयः ।तं चंद्रमिव पुष्येण युक्तं धर्मभृतां वरम् ॥३॥यौवराज्ये नियोक्तास्मि प्रातः पुरुषपुंगवम् ।अनुरुपः स वो नाथो लक्ष्मीवाल्लक्ष्मणाग्रजः ॥४॥त्रैलोक्यमपि नाथेन येन स्यान्नाथवत्तरम् ।अनेन श्रेयसा सद्यः
अध्याय 3 दुष्ट मंथरेचा कैकेयीवर प्रभाव ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामराज्याभिषेक निश्चितीमुळे इंद्रादिकास चिंता, त्या देवांची ब्रह्मदेवाला विनंती : श्रीरामराज्यभिषिंचन । तेणें इंद्रादिकां चिंता गहन ।समस्त देवीं मिळॊनि जाण । चतुरानन विनविला ॥१॥देव म्हणती ब्रह्मयासी । तुझें आश्वासन आम्हांसी ...अजून वाचाअवतरला सूर्यवंशी । तो रावणासी वधील ॥२॥सपुत्र सबंधु सप्रधान । राम करील राक्षसकंदन ।तेणें देवांस बंधमोचन । ते मिथ्या वचन होऊ पाहे ॥३॥सत्य करीं आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन ।आमचे आपत्तीचें विंदान । सावधान अवधारीं ॥४॥इंद्र बारी चंद्र छत्रधारी । यम पाणी वाहे घरीं ।वायु सर्वदा पूजे ओसरी । विधि तेथें दळकांडा ॥५॥अश्विनी सूनू दोनी । तिही परिमळ द्यावे
अध्याय 4 कैकेयी-दशरथ संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ आज्ञाप तु महाराजो राघवस्याभिषेचनम् ।उपस्थानमनुज्ञाप्य प्रविवेश निवेशनम् ॥१॥प्रियार्हां प्रियमाख्यातुं विवेशांतःपुरं वशी ।स कैकेय्या गृहं श्रेष्ठं प्रविवेश महायशाः ॥२॥न ददर्श स्त्रियं राजा कैकेयीं शयनोत्तमें ।स कामबलसंयुक्तो । रत्यर्थी मनुजाधिपः ॥३॥अपश्यन्दयितां भार्यां पप्रच्छ ...अजून वाचाच ।नहि तस्य पुरा देवी तां वेलामत्यवर्तत ॥४॥प्रतहारी त्वथोवाच संत्रस्ता तु कृतांजलिः ।देव देवी भृशं क्रुद्धा क्रोधागारमाभिद्रुता ॥५॥ अभिषेकाची सिद्धता, दशरथ कैकेयीच्या भवनात येतो, तेथील चमत्कारीक स्थिती : श्रीरामासी अभिषेकार्थ । प्रातःकाळीं पुष्य समुहुर्त ।सिद्ध सामग्री करावया समस्त । आज्ञा नेमस्त रायें केली ॥१॥मग रतिकामसंभोगासीं । आला कैकेयीभवनासी ।गृहीं न देखोनियां तिसी । पुसे समस्तांसी प्रिया कोठें ॥२॥तेथें दास दासी
अध्याय 5 दशरथभवनात श्रीरामांचे आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रभाते शर्वरीं दृष्टवा चंद्रनक्षत्रमंडिताम् ।ततः सूतो यथाकालं पार्थिवस्य निवेशनम् ॥१॥प्रविवेश प्रबोधार्थं सुमंतो मतिसत्तमः॥२॥ प्रातःकाळी सुमंत दशरथास उठविण्यास गेला : अभिषेकावया श्रीरघुनाथ । प्रातःकाळीं सुमुहुर्त ।चंद्र देखोनि गुरुपुष्ययुक्त । वेगीं सुमंत ...अजून वाचा॥१॥सुमंत प्रधान बुद्धिमंत । प्रबोधावया श्रीदशरथ ।आला राजभवनांत । कैकेयीयुक्त नृप जेथें ॥२॥ दशरथाची काळजी : अभिषेकावया रघुनंदन । राया होई सावधान ।ऐकोनी प्रधानाचे वचन । मूर्च्छापन्न दशरथ ॥३॥राम जाईल वनांत । कोणते तोंडी बोलूं मात ।हातींचा जाईल रघुनाथ । दुःखे मूर्च्छित दशरथ ॥४॥वना धाडीतो दशरथ । ऐसी ऐकताचि मात ।वचन नुल्लंघीच रघुनाथ । जाईल वनांत तत्काळ ॥५॥रामासी नाहीं राज्यचाड
अध्याय 6 कौसल्यासांत्वनं ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ कैकेय्युवाचराजा न कुपितो राम व्यसनं नास्य किंचनं ।किंचिन्मनोगतं त्वस्य त्वभ्दयान्नानुभाषते ॥१॥प्रियं त्वामप्रियं वक्तुं वाणी नास्य प्रवर्तते ।तदवश्यं त्वया कार्यं यदनेन श्रुतं मम ॥२॥एष मह्यं वरं दत्वा पुरा मामभिपूज्य च ।पश्चात्संतप्यतेःराजा यथान्यःप्राकृस्तथा ॥३॥ ...अजून वाचाशपथपूर्वक आश्वासन दिल्यानंतर कैकेयीकडून वरांचे वृत्तकथन : पूर्व प्रसंगी आपण । रामें वाहिली वसिष्ठाची आण ।तेणें कैकेयी सुखसंपन्न । पूर्वकथन तें सांगे ॥१॥रायासी नाहीं ज्वरादि अवस्था । नाहीं भूतसंचारता ।आणिक कांही नाहीं व्यथा । तुझी ममता बहु बाधी ॥२॥तें रायाचें मनोगत । सांगातां तुझें पोळेल चित्त ।यालागीं पैं नृपनाथ । साशंकित सांगावया ॥३॥तूं रायाचा प्रिय पूर्ण । प्रियापासीं अप्रिय वचन
अध्याय 7 सीता-लक्ष्मण वनगमननिर्धर ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा दृढ निश्चय ओळखून कौसल्या त्यांचे स्वस्तयन करते : झाली कौसल्या सप्रसन्न । श्रीरामासी वनाभिगमन ।करावया करि पुण्याहवाचन । स्वस्त्ययन अवधारा ॥१॥ निश्चितं तं तथा रामं विज्ञाय गमनोत्सुकम् ।प्रास्थानिकं स्वस्त्ययनं कर्तृमेवोपचक्रमे ...अजून वाचाविनिय तमायासमुपस्पृश्य जलं शुचि ।चकार माता रामस्यं मंगलानि मनस्विनी ॥२॥गधैश्चापि समालभ्य राममायतलोचना ।ओषधीं च सुसिद्धार्थां विशल्य करणीं शुभाम् ॥३॥चकार रक्षां कौसल्या मंत्रैरभिजजाप च ।देवानभ्यर्च्य विधिवत्पणम्य च शुभव्रता ॥४॥ वनीं व्हायया वनवासी । अति उल्हास श्रीरामासी ।कौसल्या जाणोनि निश्चयेसीं । धाडी वनासी स्वस्तयनें ॥२॥करोनि करचरणक्षाळण । कौसल्या करी शुद्धाचमन ।करविलें देवतार्चन । रघुनंदननिजविजया ॥३॥सुमनचंदनीं अति ओजा । पूजा केली अधोक्षजा ।लोटांगणीं
अध्याय 8 श्रीरामांचे वनाकडे प्रयाण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामस्त्वनेन नाक्येन सुप्रीतः प्रत्युवाच तम् ।व्रजापृच्छस्व सौमित्र सर्वमेव सुहृज्जनम् ॥१॥ये च राज्ञे ददौ महात्मा वरुणः स्वयम् ।जनकस्य महायज्ञे धनुषी रौद्रदर्शने ॥२॥अभेद्ये कवचे दिव्ये तूणी चाक्षय्यसायकौ ।सर्वमायुधमादाय क्षिप्रमाव्रज लक्ष्मण ॥३॥स सुहृज्जनमामंत्र्य ...अजून वाचानिश्चितः ।इक्ष्वाकुगुरुमागस्य जग्राहायुधमुत्तमम् ॥४॥तद्दिव्यं राजशार्दूलः संस्कृतं माल्यभूषितम् ।रामास्य दर्शयामास सौमित्रिः सर्वमायुधम् ॥५॥ श्रीराम लक्ष्मणाला मातेचा आशीर्वाद घेऊन आयुधे आणण्यास पाठवितात : श्रीराम म्हणे सौमित्रासी । जरी तूं वनवासासी येसी ।तरी पुसोनि ये निजमातेसी । आणि पत्नीसी भेटोनि ॥१॥आणिकही सुहृदसंबंधे । त्यांसी पुसोनि यावें यथवबोधें ।माझीं आणावीं दिव्यायुधें । तीं अति शुद्धें युद्धार्थी ॥२॥मज दिधलें दशरथें । वरुणदत्त धनुष्यातें ।तेणेसीं आणावे
अध्याय 9 श्रीरामांचे चित्रकूटावर गमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांच्या प्रयाणानंतर दशरथ व राण्या त्यांच्या मागून धावत जातातः वना निघतां श्रीरघुनाथ । राजा महामोहें मूर्च्छित ।तो होवोनियां सावचित्त । पुसे दशरथ राम कोठें ॥१॥त्यासी स्त्रिया सांगती मात । तुम्हीं ...अजून वाचानिजरथ ।त्यावरी बैसोनि रघुनाथ । गेला निश्चित वनवासा ॥२॥एक सांगती रायासी । राम आश्वासीत जनांसी ।आहे नगरद्वारापासीं । तंव राव वेगेंसी धाविंनला ॥३॥ अथ राजा वृतः स्त्रीभिः सद्विजो दीनमानसः ।निर्जगाम प्रियं पुत्रं द्रक्ष्यामि च वनं गतम् ॥१॥ सातशें राणियांसमवेत । धाविंनला दशरथ ।कोठें कोठे माझा रघुनाथ । स्वयें पुसत सर्वांतें ॥४॥मग आक्रंदे दिधली हाक । श्रीरामा दाखवीरे निजमुख ।तुज जालिया
अध्याय 10 दशरथाचे प्राणोत्क्रमण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ गुहकाकडे सुमंताचा मुक्काम : येरीकडे सुमंत गुहक । श्रीराम गेलियावरी देख ।रामविरहें पावले दुःख । तोचि श्लोक अवधारा ॥१॥ कथयित्वा तु दुःखार्तः सुमंत्रेण चिरं सह ।गंगपारे गते रामे जगाम स्वपुरं गुहः ...अजून वाचाप्रयागे च सभाजनम् ।अगिरेर्गमनं तेषां तत्रस्थैरभिलक्षितम् ॥२॥अनुज्ञातःसुमंत्रोथ योजयित्वा हयोत्तमान् ।अयोध्यामेव नगरीं प्रययौ गाढदुर्मनाः ॥३॥ पुसोनि सुमंता गुहकासी । श्रीराम बैसोनि नावेसीं ।गेलिया गंगापरतीरासी । लागली दोघांसी टकमक ॥२॥न लागतां पातया पातीं । दोघे श्रीरामासी पाहती ।दृष्टी अंतरल्या रघुपती । दोघे पडती मूर्च्छित ॥३॥जरी दोघे जाले सावधान । तरी रामविरहें अति दुर्मन ।अश्रुधारा वाहती नयन । करिती स्मरण रामनामें ॥४॥वाचे रामनामस्मरण
अध्याय 11 श्रीरामपादुकांना पट्टाभिषेक ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांची त्यागबुद्धी पाहून सुमंताची अवस्था : श्रीरामाचें वनप्रयाण । ते काळींचे निर्लोभपण ।सुमंत आठवी आपण । श्रीरामीं मन दृढ जडलें ॥१॥त्या त्यागाची निजगती । दावोनी गेला श्रीरघुपती ।ते सुमंत स्मरे ...अजून वाचाप्रीतीं । त्यागस्थिती ते ऐसी ॥२॥असत्य त्यजिजे जेंवी पवित्रें । तेंवी त्यागी राज्यालंकार वस्त्रें ।वना निघतां श्रीरामचंद्रे । केलें वल्कलांबर परिधान ॥३॥जेवीं निंदा त्यजिजे साधुसंतीं । तेंवी राज्यवैभवसंपत्ती ।सर्वही त्यजोनि रघुपती । निघे वनाप्रती वल्कलांबरीं ॥४॥रजकस्पर्शाचें जीवन । जेंवी नातळती साधुजन ।तेंवी सांडोनि राज्यादि धनमान । निघे रघुनंदन वनवासा ॥५॥राज्यातील अणुप्रमाण । श्रीराम काहीच नेघे जाण ।त्यजोनियां पादत्राण । निघाला
अध्याय 12 भरताचे वनप्रयाण व गुहकाशी संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ कैकेयी भरताला उपदेश करते : जालिया जननिवृत्ती । पुन्हां प्राप्ती मध्यरात्री ।कैकेयी येवोनि भरतप्रती । बोले उपपत्ती ते ऐका ॥१॥ उत्थापयित्वा कैकेयी पुत्रं वचनब्रवीत ।उत्तिष्ठ पुत्र भद्रं ते ...अजून वाचानिबोध मे ॥१॥त्वद्विधा नैव शोचंति सतां सदसि संमताः ।गृहाणेदं स्वकं राज्यं सफलं कुरु में श्रमं ॥२॥मनो नंदय मित्राणां मम चाभीष्तदर्शन ।त्वकृते हि मया सर्वमिदमेवंविधं कृतं ॥३॥तत्पुत्र शीघ्रं विधिना विधिज्ञैःवसिष्ठमुख्यैः सहितो द्विजेंदैः ।संकाल्य राजानमदीनसत्वमात्मानमुर्व्यामभिषेचयस्व ॥४॥ उठवोनियां पुत्रासी । कैकेयी बुद्धि सांगे त्यासी ।राम गेला वनवासासी । तूं कां करिसी शोक त्याचा ॥२॥रांडवे बायलेव्हे परी । रडतां न लाजसी सभेमाझारीं ।ऊठ वेगीं
अध्याय 13 भरताचे चित्रकूटावर आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ स्नानसंध्या व त्रिवेणीला साष्टांग प्रणिपात : भरतें गंगा उतरोन । केलें स्नान संध्या तर्पण ।आजींची वस्ती प्रयागस्थान । म्हणोनि निशाणें त्राहाटिलीं ॥१॥रथ गज वाजी वीरश्रेणी । चालातां मार्ग न पुरें ...अजून वाचा।पुढे देखिली त्रिवेणी । दूत गर्जोनी सांगती ॥२॥देखोनी त्रिवेणी भरत शत्रुघ्न । दोघी घातले लोटांगणा ।त्यजोनियां पादत्राण । चरणचालीं निघालें ॥३॥वसिष्ठादि ऋषीश्वर । चरणीं चालती सत्वर ।देखोनि त्रिवेणींचे तीर । जयजयकार तिहीं केला ॥४॥ गोदान, पिंड्दान, धनदान : देवोनि लक्षानुलक्ष गोदानें । भरतशत्रुघ्नें केलीं स्नानें ।तीर्थश्राद्ध पिंडदानें । पितृर्पणें तिहीं केली ॥५॥तीर्थ उअपवास मुंडन । रायासी नाही हे बंभन ।वसिष्ठ
अध्याय 14 श्रीरामांकडून दुष्ट कावळ्याला शिक्षा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ चित्रकूटावर श्रीरामांची दैनंदिन चर्या, लक्ष्मणाची सेवा : येरीकडे श्रीरघुनाथ । चित्रकूट पर्वताआंत ।अग्निहोत्र सीता समवेत । नित्य वेदोक्त प्रतिपाळी ॥१॥श्रीरामसेवेसी सौमित्र । पर्णशाळा केली विचित्र ।श्रीरामाचें अग्निहोत्र । अहोरात्र ...अजून वाचा॥२॥विचित्र आणी फळें मुळें । नित्य निर्वाह पुरवी जळें ।काष्ठें आणोनियां प्रबळें । अग्नि सोज्ज्वळ स्वयें रक्षी ॥३॥रामसीतेचें चरणक्षाळण । नित्या नेमें करी लक्ष्मण ।जैसीं लक्ष्मीनारायण । या बुद्धीं पूर्ण पूजित ॥४॥विधिविधान जाणे श्रीराम । दर्शपौर्णमासिक होम ।मृगमांसें होमसंभ्रम । चालवी नेम सौमित्र ॥५॥श्रीरामाचे सेवेवरी । शरीर वंचीना तिळभरीधनुष्यबाण घेवोनि करीं । मृगें मारी होमार्थ ॥६॥धन्य त्या मृगांचें जीवित ।
अध्याय 15 श्रीराम-भरतभेट ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताचे चित्रकूटाकडे प्रयाण : देखोनि चित्रकूट पर्वत । अत्यंत हरखिला भरत ।देखावया श्रीरघुनाथ । उल्हास अद्भुत सर्वांसी ॥१॥सेन शृंगारिली मनोहर । वीरीं केले नाना शृंगार ।गर्जत घेवोनि गजभार । भरत सत्वर चालिला ...अजून वाचाकातिया कुर्हा्डे । वन छेदिती सैन्यापुढें ।वेगीं भूमि सज्जिती मातियेडे । गज रथ घोडे चालावया ॥३॥अश्वगजांचा कडकडाट । रथ चालिले घडघडाट ।सैन्य चालतां न पुरे वाट । रजें वैकुंठ व्यापिलें ॥४॥चरणरज अति उभ्दट । लोकलोकांतर त्यजोनि स्पष्ट ।ठाकोनि जावें वैकुंठ । हा नेटपाट रजाचा ॥५॥गज गर्जती गहिरे । वारूं हिंसती एकसरें ।तुरें वाजती अपारें । गिरा गंभीर वीर गर्जती ॥६॥निशाण
अध्याय 16 श्रीरामांकडून पिंडदानविधी ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ आघ्राय रामस्तं मूर्घ्नि परिष्वज्य च राघवं ।अंके भरतमारोप्य पर्यपृच्छत सादरं ॥१॥क नु तेऽभूत्पिता तात यदरण्यं त्वमागतः ।नहि त्वं जीवतस्तस्य वनमागतुमर्हासि ॥२॥किंनु वीर महारण्ये तवागमनकारणं ।कच्चिदॄशरथो राजा कुशली सत्यसंगरः ॥३॥तात कच्चिच्च कौसल्या ...अजून वाचाच प्रजावती ।सुखिनी किच्चदार्या च देवी नंदती कैकेयी ॥४॥ श्रीराम भरतास अयोध्येचे कुशल विचारतातः अति प्रीतीं रघुनंदन । भरत आणि शत्रुघ्न ।हृदयी धरिले आलिंगोन । सुखसंपन्न तेणें दोनी ॥१॥हृदया हृदय एक जालें । तेणें सुखाचें भरतें आलें ।दुख निःशेष निमालें । सागर भरिले स्वानंदें ॥२॥परमानंदें तृप्ति गाढी । द्वंद्वदुःखें देशोधडी ।होत हरिखाचिया कोडी । जोडिला जोडी श्रीराम ॥३॥मग भरतासी रघुनंदन
अध्याय 17 भरताचे समाधान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाने बांधलेल्या पर्णशाळेचे सर्वांनी केलेले कौतुक : श्रीरामें उद्धरिले पितर । ते गगनीं करिती ।वर्षती सुरवर । जगदुद्धार श्रीराम ॥१॥मार्गीं चालतांदेखती डोळां । मनोहर पर्णशाळा ।सौमित्रे रचिल्या विशाळा । जनकबाळा स्वयें ...अजून वाचा॥२॥तें देखोनि म्हणती माता । धन्य जीवित्व सुमित्रासुता ।वनीं सुखरूप श्रीरामसीता । जाणा तत्वतां याचेनि ॥३॥याची सेवा अति निर्वाण । श्रीराम चरणी विकिला प्राण ।मस्तकीं जळ वाहे आपण । काष्ठें संपूर्ण हा आणी ॥४॥श्रीरामसीतेचें चरणक्षाळण । स्वादिष्ठ फळें पुरवी संपूर्ण ।नित्य नेमेस्त करी आपण । आणि जागरण अहर्निशीं ॥५॥वनी वसतां श्रीरघुनाथा । येणें विसरविली मातापिता ।विसरविली राज्यभोगता । सुख रघुनाथा
अध्याय 18 श्रीरामपादुकांसह भरत अयोध्येत येतो ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ भरत श्रीरामांची क्षमायाचना करतोः भरतें धांवोनि आपण । दृढ धरिले श्रीरामचरण ।अश्रु चालिले संपूर्ण । तेणें चरणक्षाळण श्रीरामा ॥१॥ स्वस्थगात्रस्तु भरतो वाचा संसज्जमानया ।कृताजलिरिदं वाक्यं राघवं पुनरब्रवीत ॥१॥ ...अजून वाचारोमांच रवरवित । तेणें सर्वांग डवडवीत ।हरिखे उत्कंठित जालें चित्त । सद्रदित पैं वाचा ॥२॥विकळ वाचा होवोनि ठायीं । विनटोनि श्रीरामाच्या पायीं ।अंजळिपुट जोडोनि पाहीं । भरत लवलाहीं विनवित ॥३॥करोनिया कुशास्तरण । तुजवरी देत होतों प्राण ।हा माझा अपराध दारूण । क्षमा संपूर्ण करीं स्वामी ॥४॥भूतीं पृथ्वी नांगरून । दाढी घालोनि करिती दहन ।जीवनेंसहित लाताऊन ॥ कर्दमकंदन जन करिती ॥५॥तो
अरण्यकाण्ड अध्याय 1 श्रीरामांचे दंडकारण्यात गमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकं अक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ ॥कुजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम् ॥ २ ॥ श्रीरामनाम महिमा : श्रीराम चूतवृक्ष प्रबळ । त्यावरी वाल्मीक ...अजून वाचाकोकिळ ।नारदवसंतें फुटली कीळ । मधुराक्षरी सरळ आलापु केला ॥ १ ॥त्या मधुराक्षरांमाजी मधुर । श्रीरामनाम हें सुखसार ।सुखी केले चराचर । सुखें शंकर डुल्लत ॥ २ ॥उफराटें राम ये अक्षरी । मरा मरा या उत्तरीं ।नारद वाल्मीका उपदेश करी । दों अक्षरीं उद्धरला ॥ ३ ॥नाम शुद्ध हो अथवा अशुद्ध । जो जपे तो पावन शुद्ध ।श्रीरामनाम जगद्वंद्य ।
अध्याय 2 विराध राक्षसाचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ अत्री आश्रमात श्रीरामांचे आगमन : अतिऋषि वसे जेथ । आतुरविश्रांतिपर्वत ।तेथें आला श्रीरघुनाथ । समवेत स्त्रीबंधू ॥ १ ॥देखोनि अत्रीचे चरण । श्रीरामें घातलें लोटांगण ।ऋषीनें दिधलें आलिंगन । समाधान ...अजून वाचा॥ २ ॥सीता आणि लक्ष्मण । दोघीं घातलें लोटांगण ।दृढ मस्तकीं धरले चरण । सुखसंपन्न ऋषि जाला ॥ ३ ॥श्रीरामें अति उल्हासता । अनसूयाचरणीं ठेविला माथां ।अत्रि म्हणे श्रीरघुनाथा । तुझी हे माता पुरातन ॥ ४ ॥ अनसूया व सीतेची भेट, सीतेचे अभिनंदन : ऐकोनि अत्रीचें वचन । सौमित्रें वंदिले तिचे चरण ।सीतेनें घातलें लोटांगण । दिधलें आलिंगन अनसूये ॥
अध्याय 3 शरभंगऋषींचा उद्धार ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हत्वा त तं भीमबलं विराधं राक्षसं वने ।आश्रमं शरभंगस्य राघवौ तौ प्रजग्मतुः ॥ १ ॥तस्य् देवप्रभावस्य तपसा भावितात्मनः ।समीपे शरभंगस्य ददर्श महदद्भुतम् ॥ २ ॥ श्रीरामाचे शरभंगाश्रमात आगमन : महाभयानक विराधु ...अजून वाचात्याचा क्षणार्धे केला वधु ।प्रतापें शोभती दोघें बंधु । परम आल्हादु सीतेसी ॥ १ ॥मग तिघें जणें वेगेंसीं । निघालीं शरभंगाआश्रमासी ।मार्ग क्रमितां दो कोशीं । त्या आश्रमासी देखिलें ॥ २ ॥तैं शरभंग तपोराशी । तो न्यावया ब्रह्मलोकासी ।ब्रह्मयाने धाडिलें इंद्रासी । विमानेंसीं हंसयुक्त ॥ ३ ॥ ब्रह्मदेवाचे विमान धाडले : हंसयुक्त विमानंसी । बैसावया सामर्थ्य नाहीं इंद्रासी ।पुढें घालोनि
अध्याय 4 मंदकर्णी ऋषींचा उद्धार ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मंदकर्णी ऋषींचा उद्धार शरभंगे दिवं प्राप्ते मुनिसंघाः समंततः ।अभ्यगच्छंत ककुत्स्थं रामं ज्वलिततेजसम् ॥ १ ॥ ब्राह्मण आश्रयार्थ श्रीरामांकडे येतात : विराध वधिला अति दारुण । केलें शरभंगोद्धरण ।तें देखोनि मुनिगण ...अजून वाचाआले ठाकून श्रीरामा ॥ १ ॥वैखानस वालखिल्य । अग्निहोत्री शुद्धशीळ ।राक्षसभयें अति व्याकुळ । आले सकळ श्रीरमापासीं ॥ २ ॥जळाहारी फळाहारी । जताधारी ब्रह्मचारी ।पत्राहारी वायुआहारी । निरहारी ऋषी आले ॥ ३ ॥एक भगवे एक नागवे । वल्कलधारी मळिन लेवे ।राक्षसभयें आले आघवे । आम्हां राघवें रक्षावें ॥ ४ ॥एकांगुष्ठाव्रत एकांसी । एक ते वृक्षाग्रनिवासी ।एक ते एकपाद तापसी ।
अध्याय 5 अगस्ती ऋषींकडून श्रीरामास अस्त्रप्राप्ती ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ ताबडतोब आजच जाण्याचा पदेश : श्रीराम म्हणे महामती । तुझ्या जेष्ठ बंधु अगस्ती ।तयाचिया दर्शनार्थी । तुम्हांप्रती मी आलों ॥ १ ॥करावया ज्येष्ठाचें दर्शन । अति उदति माझें मन ...अजून वाचामार्गें करावें गमन । कृपा करोनि सांगावें ॥ २ ॥ यदि बुद्धिः कृता राम द्रष्टुं तं मुनिपुंगवम् ।अद्यैव गमने बुद्धिं रोचयस्व महामते॥ १ ॥ जरी अगस्तीचें दर्शन । करावया वांछी तुझें मन ।तरी आजचि करावें गमन । विलंबव्यवधान न करावें ॥ ३ ॥ आश्रमातील देवस्थाने : जे मार्गी करितां गमन । सर्वथा न चुकिजे आपण ।तैसें सांगेन मार्गचिन्ह । सावधान
अध्याय 6 कश्यपवंशवर्णन व अमृतहरणासाठी गरुडाचे प्रयाण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ अथ पंचवटीं गच्छन्नंतरा रघुनंदनः ।आससाद महाकायं गृघ्नं भीमपराक्रमम् ॥ १ ॥तं दृष्टावा तौ महाभागौ वनस्थौ रामलक्ष्मणौ ।मेनाते राक्षसं गृघ्नं ब्रुवाणौ को भवनिति ॥ २ ॥ततो मधुरया वाचा सौम्यया ...अजून वाचा।उवाच वत्स मां विद्धि वयस्यं पितुरात्मनः ॥ ३ ॥ पंचवटीत संगमावर आश्रमयोजना : पंचवटीं परम प्रयाण । श्रीराम सीता सह्लक्ष्मण ।अगस्तीसी करोनि नमन । शीघ्र गमन तिहीं केलें ॥ १ ॥रम्य रमणीय गंगातटीं । पंचक्रोश पंचवटीं ।उल्हास तिघांच्याही पोटीं । उठाउठीं निघालीं ॥ २ ॥अरुणावारुणासंगमप्राप्ती । मीनली प्राची सरस्वती ।तीर्थ पावन त्रिजगतीं । आवडे वस्ती श्रीरमा ॥ ३ ॥सुंदर आणि
अध्याय 7 जटायूसह श्रीरामांचे पंचवटीत आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ अमृतरक्षणासाठी घेतलेली दक्षता : अच्युत नाम धरोनि मानसीं । गरुड निघाला अमृतासी ।भावें वंदितां कश्यपासी । साह्य् सप्तऋषी त्यासी जाले ॥ १ ॥गरुडें अतिक्रमोनि गगन । सूक्ष्मरुप धरोनि जाण ...अजून वाचालक्षितां पूर्ण । तव बहु रक्षण अमृतासी ॥ २ ॥प्रथम सर्पांचें संपूर्ण । दुसरें रक्षण वरुण ।तिसरें जाण यक्षगण । मरुद्गण तें चवथें ॥ ३ ॥पांचवें रक्षण यमदूत । सहावे रक्षण शिवदूत ।सातवे रक्षण विष्णुदूत । सावचित्त सर्वदा ॥ ४ ॥ योग्य वेळी गरुडाचे आक्रमण : गरुडें साधोनयां सवडी । कुंडीं घालोनियां उडी ।अमृत शोपोनियां तातडीं । अति झडाडी निघाला
अध्याय 8 शूर्पणखेला विद्रूप करतात ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ स तां पंचवटीं गत्वा नानाशकुनिनादिताम् ।उवाच भ्रातरं रामो लक्ष्मणं शुभलक्ष्मणम् ॥१॥अयं देशः समः श्रीरान्तुप्पितस्तरुभिर्वृतः ।इहाश्रमपदं रम्यं यथावत्कर्तमर्हसि ॥ २ ॥ पंचवटीत आगमन व वनसौंदर्याने सर्वांना संतोष : पंचवटीं । श्रीराम ...अजून वाचादेखोनि दृष्टीं ।सुखावली सीता गोरटी । आल्हाद पोटीं सौमित्रा ॥ १ ॥श्रीरामा देखोनि आल्हादें । कोकिळा कूजती पंचमशब्दें ।घुमरी घुमघुमती स्वानंदें । सुखानुवाद अति मधुर ॥ २ ॥श्रीरामां तूं तूं सीते तूं तूं । धन्य धन्य सुमित्रा तूं तूं ।ऐसें कपोत कूजतू । पुण्यपुरुषार्थी ये वनीं ॥ ३ ॥स्वतःप्रमाण कीं परतःप्रमाण । प्रयोगोपाधीनें व्यावर्तित कोण ।जहदजहल्लक्षणेचें काय प्रयोजन । शुक
अध्याय 9 खर – दूषणांशी युद्ध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ विद्रूप शूर्पणखा पद्मपुरीला जाते : घेवोनि लक्ष्मणाचा दरारा । शूर्पणखा आली पद्मपुरा ।निर्नासिकी विरुपाकारा । रुधिरधारा लागलिया ॥ १ ॥राक्षससभेचिये मेळीं । शूर्पणखा अतुर्बळी ।ते सरकटली समूळीं । राक्षसकुळीं ...अजून वाचा॥ २ ॥शूर्पणखा अती दुर्धर । तीतें विटंबिलें तो महावीर ।राक्षसां धाक लागला थोर । निशाचर चळीं कांपती ॥ ३ ॥शूर्पणखेचें विरुपकरण । देखोनिय़ां खर दूषण ।कोपा चढले अति दारुण । क्रोधें गर्जोन पूसत ॥ ४ ॥ तां तथा पतितां दृष्टवा विरुपां शोणितोक्षिताम् ।भगिनीं क्रोधसंतप्तः खरः पप्रच्छ राक्षसः ॥१॥बलविक्रमसंपन्ना कामगा कामरुपिणी ।इमामवस्थां नीता त्वं केनांतकसमागता ॥२॥ खर-दूषण राक्षसास निवेदन व
अध्याय 10 दूषण राक्षसाचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ युद्धार्थी चालिला खर । देखोनि उभा श्रीरघुवीर ।अवघे खवळले निशाचर । शस्त्रसंभार सुटले ॥ १ ॥ ततस्ते कूरकर्माणं क्रुद्धाः सर्वे निशाचराः ।रामं नानाविधैःशस्त्रैरभ्यवर्षन्त दुर्जयम् ॥ १ ॥ श्रीरामांचे युद्धकौशल्य : ...अजून वाचारणरंगधीर । क्रूरकर्मी निशाचर ।मोळोनि समग्र सैन्यसंभार । शस्त्रें अपार वर्षले ॥ २ ॥गदा मुग्दल तोमर त्रिशूळ । परशु पट्टिश महाशूळ ।कातिया कुर्हाडी परिघ मुसळ । लहुडी स्थूळ महाघात ॥ ३ ॥खड्ग हाणिती खणखणां । बाण सुटती सणसणां ।वोडणें वाजती दणदणां । लागली निशाणां एक घाई ॥ ४ ॥श्रीराम एकाकी एकला । गेला तुटला निवटला ।शस्त्रसंपाती आटला । म्हणती निमाला
अध्याय 11 त्रिशिरा व खर राक्षसांचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ दूषणाच्या वधानंतर खर व त्रिशिरा हे पुढे येतात; त्यांच्या वल्गना : श्रीरामें मारिल्या सैन्य धुरा । तेणें दुर्धर कोप आला खरा ।त्यासी पुसोनियां त्रिशिरा । श्रीरामचंद्रावरी आला ॥ ...अजून वाचा॥खर म्हणे त्रिशिर्यासी । रणीं मर्दिलें दूषणासी ।म्हणोनि भिवो नको रामासी । तुझे पाठीसीं मी आहें ॥ २ ॥मनुष्य खाजें राक्षसांसी ।त्याचें भय काय आम्हांसी ।काटें देखोनि फणसासी । खाणारासी भय नाहीं ॥ ३ ॥चिरोनि फणसाचे कांटे । काढोनि अमृताचे सांठे ।मग सेविती घटघटें । युद्धसंकटें तेंवि श्रीराम ॥ ४ ॥श्रीराम बाणकटकेंसीं । अति दुर्धर राक्षसांसी ।तो गोड भखितां आम्हांसी
अध्याय 12 शूर्पणखा-रावण संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पंचवटीतील राक्षससंहारामुळे राक्षसस्त्रियांचा विलाप : खरत्रिशिरादि बळांवर्ती । राक्षसांची जातिव्यक्ती ।रामें रणीं पाडिले क्षितीं । शरसंपातीं निवटोनियां ॥ १ ॥ ततःशूर्पणखा दृष्ट्वा सहस्त्राणि चतुर्दश ।हतानि रामेणैकेन मानुषेण पदातिना ॥ १ ॥ ...अजून वाचाश्रीराम धनुष्यपाणी । युद्धीं विचरतां चरणीं ।चवदा सहस्त्र वीरश्रेणीं । पाडिले रणीं शरघातें ॥ २ ॥बोंब सांगावया पुरती । राक्षसांची पुरुषव्यक्ती ।नाहीं उरली रणाप्रती । बाणावर्ती निवर्तले ॥ ३ ॥बोंब सांगावया देख । उरली शूर्पणखा एक ।घेवोनि लक्ष्मणाचा धाक । मारोनि हाक पळाली ॥ ४ ॥रणीं विमर्दाची धुकधुक । अति आक्रोशें करी शंख ।जनस्थान आली देख । नकटें मुख घेवोनी
अध्याय 13 रावण व मारीच यांची भेट : ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण व मारीच यांची भेट : सीताप्राप्त्यर्थ उद्विग्न । रथारुढ रावण ।मारीचाश्रमा ठाकोन । आला आपण सवेग ॥ १ ॥ तत्र कृष्णानिजधरं जटामंडलधारिणम् ।ददर्शं नियताहारं मारीचं नाम ...अजून वाचा॥ १ ॥तं रावणः समागम्य विधिवत्स्वेन तेजसा ।कुशलं परिपृच्छ्यार्थ ययाचे तेज पूजितः ॥२॥ मारीचातें देख रावण । जटाधारी वल्कलाजिन ।आणि नेमस्थ फळाभोजन । एकांतस्थान वनवासी ॥ २ ॥ऐसा मारीच रावणें देखोन । दोघीं दिधलें आलिंगन ।मग त्यासी कुशळ पुसोन । केलें पूजन यथाविधि ॥ ३ ॥ आलेल्या संकटांचे मारीचाला निवेदन व सीता हरणाची इच्छा : मग बैसवून एकांतीं । रावण
अध्याय 14 हरिणरुपी मारीचाचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचे पंचवटीत आगमन, तेथील विध्वंस पाहून त्याची बिकट अवस्था : श्रीरामाश्रम पंचवटीं । रावण देखोनि आपुल्या दृष्टीं ।मारिल्या राक्षसांच्या कोटी । तेणें पोटीं दचकला ॥ १ ॥राक्षसांचीं दीर्घ मढीं । ...अजून वाचादेखोनि करवंडी ।मारीच अत्यंत हडबडी । खाजवी शेंडी भयभीत ॥ २ ॥आधींच श्रीरामभयें भीत । त्यावरी देखोनि राक्षसघात ।मारीच चळचळां कांपत । जे राक्षसां अंतक श्रीराम ॥ ३ ॥ मारीचाचा अनुनय : देखोनि राक्षसांचे कंदन । मारीचास स्वयें रावण ।अत्यंत देऊन सन्मान । त्याचे चरण दृढ धरिलें ॥ ४ ॥सीताहरण अति निर्वाण । खुंटलें स्वामिसेवकपण ।कृपा करोनि आपण । जानकीहरण
अध्याय 15 लक्ष्मणाचे सांत्वन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांची हाक ऐकून सीता घाबरते : श्रीरामस्वरासमान । मारीचानें केलें आक्रंदन ।ऐकोनि सीता करी रुदन । श्रीराम आपण सांपडला ॥ १ ॥राम रणरंगधीर संपूर्ण । विकट योद्धा अति दारुण ।तरी तो ...अजून वाचादीनवदन । पाव लक्ष्मणा म्हणोनि ॥ २ ॥श्रीरामाचें आक्रंदन । ऐकोनियां दीनवदन ।उगाचि राहिला लक्ष्मण । याचें का मन द्रवेना ॥ ३ ॥ अतृस्वरं तु तुं भर्तुर्विज्ञाय सद्दशं वने ।उवाच लक्ष्मणं सीता गच्छ जानीहि राघवम् ॥ १ ॥सखायं भ्रातरं ज्येष्ठं रामं पंथानमागतम् ।काक्रंदमान तु वने भ्रातरं त्रातुमर्हसि ॥ २ ॥तं क्षिप्रमभिधावं त्वं भ्रातरं शरणैषिणम् ।रक्षसां वशमापन्नं सिहानामिव गोवृषम् ॥ ३
अध्याय 16 लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्याच्या वेषात रावणाचे आगमन : ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्याच्या वेषात रावणाचे आगमन : लक्ष्मण गेला रामापासीं । सीता एकली गुंफेसीं ।रावण आला तेचि संधीसीं । सीतेपासीं भिक्षुवेषें ॥ १ ॥ ...अजून वाचादशग्रीवः प्रतापवान् ।परिव्राजकरुपेण वैदेहिमन्ववर्तत ॥ १ ॥ गुंफे नसतां श्रीरामलक्ष्मण । शून्य मंदिरी रिघे श्वान ।तेंवी आला दशानन । सीताहरणकार्यार्थी ॥ २ ॥गर्भजन्में जन्मली नाहीं । सीता देहींच विदेही ।तिचे हरन करावया पाहीं । आला लवलाहीं लंकानाथ ॥ ३ ॥सीताहरण करुं म्हणतां । मुळींच भीक लागली लंकानाथा ।चौपालवी आली हाता । अंगीं अशुभता बाणली ॥ ४ ॥चौदा चौकड्यांचें राज्यलक्ष्मण ।
अध्याय 17 जटायु-रावण युद्ध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेला रथात बसवून रावणाचे प्रयाण : रावण करोनि सीताहरण । सवेग निघाला आपण ।ते काळींचें गमनलक्षण । सावधान अवधारा ॥ १ ॥ वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह ...अजून वाचा॥ १ ॥ततस्तां परुषैर्वाक्यैरभितर्ज्य महास्वनः ।अंकेनादाय वैदेहीं रथमारोहयत्तदा ॥ २ ॥ सीता बैसवितां रथासीं । आंग टाकिलें भूमीसीं ।रावणें धरोनियां केशीं । वाहोनि अंकासी बैसे रथीं ॥ २ ॥अंकीं बैसवितां पद्माश्री । तेणें रावण जाला सुखी ।सीता जाली परम दुःखी । धांवा पोखी आक्रंदें ॥ ३ ॥ सीतेचा विलाप, आक्रंदन व लक्ष्मणाबद्दल अनुताप : धांव पाव गां श्रीरघुवीरा । सवेग
अध्याय 18 रावण सीतेला अशोकवनात पाठवतो ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ जटायू मूर्च्छित झाल्यामुळे सीतेला शोक : जटायूस स्वयें रावण । वधिता जाला करोनि छळण ।ते देखोनि सीता जाण । झाली आपण अति दुःखी ॥ १ ॥ तं स्वल्पजीवितं भूमौ ...अजून वाचाजटायुषम् ।निरिक्ष्य पतितं सीता विललाप सुदुःखिता ॥ १ ॥ जटायूचे उपडितां पांख । भूमीं मूर्च्छित जीव निःशेख ।त्याचें देखोनियां असुख । परम दुःख सीतेसी ॥ २ ॥न पवतीच श्रीरामलक्ष्मण । जटायु करितां सोडवण ।तों त्यासीच आलें मरण । कपटी रावण दुष्टात्मा ॥ ३ ॥जटायूसी म्हणे आपण । तुझें मज न येचि कां मरण ।तूं बळियां बळीं संपूर्ण । मजलागीं प्राण
अध्याय 19 श्रीरामांचा सीताशोक ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेवर राक्षसिणींचा पाहारा असतो त्याचे वर्णन : अशोकवनीं सीतेपासी । दुष्ट दुर्धर राक्षसी ।रावण ठेवी भेडसावयासी । भयें आपणासी वश होईल ॥ १ ॥ अशोकवनिकामध्ये मैथिली नीयतामिती ।तत्रेयं रक्ष्यतां गूढं युष्माभिः ...अजून वाचा॥ १ ॥ सीतासंरक्षणीं नित्यवासी । विकटा विकृता समयेंसी ।विरुपा विक्राळा राक्षसी । अशोकवनासी त्या आल्या ॥ २ ॥नानारुपा नानाकारा । विक्राळा कराळा अति उग्रा ।भिंगुलवण्या भयासुरा । आल्या समग्रा सीतेपासीं ॥ ३ ॥एकीचें विक्राळ वदन । सर्वांगासी एकचि कान ।तीसी कानचि आच्छादन । येरवीं नग्न कराळी ॥ ४ ॥लागतां कानाचा फडकारा । नक्षत्रें पडती जैशा गारा ।जयाचें भय सुरसुरां
अध्याय 20 उमा व श्रीराम यांचा संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पौणिमेच्या रात्री गवताच्या अंथरुणावर पहुडले असता श्रीरामांचा झालेला मनःक्षोभ : पूर्णिमेची रात्री शोभयमान । तृणशेजे रघुनंदन ।करिता जाला सूखें शयन । करीं पादसंवाहन सौमित्र ॥ १ ॥चंद्रादय मनोहर ...अजून वाचाचंद्रकिरण अति सुकुमार ।अंगीं लागतां श्रीरामचंद्र । उठी सत्वर गजबजोनी ॥ २ ॥ सौमित्रे ननु सेव्यतां तरुतलं चंडांशुरुज्जंभते ।चंडांशोर्निशि का कथा रघुपते चंद्रोयऽमुन्मीलति ।वत्सैतद्भवता कथं नु विदितं धत्ते कुरंगं यतः ।क्वासि प्रेयसि हा कुरंगनयने चंद्रानने जानकि ॥ १ ॥ श्रीराम म्हणे लक्ष्मण । खडतर सूर्याचे किरण ।मज बाधिती दारुण । बैसूं दोघे जण तरुतळीं ॥ ३ ॥तंव सौमित्र म्हणे श्रीरघुनाथा
अध्याय 21 जटायूचा उद्धार ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेच्या शोधासाठी मार्गक्रमण चालू असता अद्भुत राक्षसाचा पाय आढळतो : उमा गेली महेशापाशीं । श्रीराम लक्ष्मण वनवासी ।निघाले सीतागवेषणासी । मार्गचिन्हांसी पहाताचि ॥ १ ॥ ददर्श भूमौ निष्क्रातं राक्षसस्य पदं महत् ...अजून वाचासमीक्ष्य परिक्रान्तं सीताया राक्षसस्य च ॥ १ ॥संभ्रान्तहृदयो रामः शशंस भ्रातरं प्रियम् ।इह लक्ष्मण पश्य त्वं राक्षसस्य महत्पदम् ॥ २ ॥मिथ्यामे तर्जितःशैलो न सीता गिरिगह्नरे ।तदद्दष्टवा लक्ष्मणो भितःपदं विकृतमद्भुतम्॥ ३ ॥ मार्गी माग पहात जात । तंव राक्षसपद अत्यद्भुत ।देखोनि श्रीरामा आनंद । मार्गी माग शुद्ध लागला ॥ ३ ॥लक्ष्मणा धांव धांव आतां । राक्षस घेवोनि जातो सीता ।मार्ग ओळख
अध्याय 22 कबंध राक्षसाचा उद्धार ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पुढें मार्ग क्रमीत असताना लक्ष्मणाला अपशकुन होऊ लागतातः करोनि जतायूद्धरण । श्रीराम आणि लक्षमण ।करावया सीतागवेषण । वनोपवन शोधिती ॥ १ ॥वन शोधितां लक्ष्मण । तंव देखता होय अपशकुन ।तेणे ...अजून वाचाकंपायमान । सांगता होय श्रीरामा ॥ २ ॥ लक्ष्मणस्तं महातेजाःसत्यवांश्छीलवाश्छुचिः ।अब्रवित्प्रांजलिर्वाक्यं भ्रातरं दीनचेतसम् ॥ १ ॥स्पंदते मे दृढं बाहुरुव्दिग्नमिव मे मनः ।प्रायशश्चाप्यनिष्टानि निमित्तान्युपलक्षये ॥ २ ॥तत्मात्सज्जोभवार्य त्वं कुरुष्व वचनं मम ।ममैव हि निमित्तानि सद्यःशंसन्ति संभ्रमम् ॥ ३ ॥ सौमित्र तेजस्वी महावीर । परनारी सहोदर ।सत्यवादी अति पवित्र । नित्य एकाग्र श्रीरामभजनीं ॥ ३ ॥त्यायोनियां धनमान । रामा त्यजोनि श्रीरामभजन ।ऐसा
अध्याय 23 शबरीचा उद्धार ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पंपासरोवरावर विश्रांती : कबंधरुपें दानव दनु । पावला होता राक्षसतनु ।तो श्रीरामें उद्धरोनु । केला पावन तिहीं लोकीं ॥ १ ॥दनूनें केलें उर्ध्वगमन । पुढे श्रीराम लक्ष्मण ।पंपेसी निघाले आपण । ...अजून वाचासज्जोनी ॥ २ ॥ पंपायाः पश्चिमे तीरे उपविष्टो च राघवौ ।ददर्शतुस्ततस्तत्र शबर्या रम्यमाश्रमम् ॥ १ ॥तौ तमाश्रममासाद्य द्रुमैर्बहुभिरावृतम् ।सुरभ्यमभिवीक्षंतौ शबरीमभ्युपेयतुः ॥ २ ॥तौ दृष्ट्वा तु तदा सिद्धा समुत्थाय कृताञ्जलिः ।पादौ जग्राह रामस्य लक्ष्मणस्य च धीमतः ॥ ३ ॥ श्रीराम लक्ष्मण अति सत्वर । पावोनि पंपापश्चिमतीर ।सेवोनियां पंपापवित्रनीर । विश्रांतीस वीर बैसले ॥ ३ ॥ शबरीच्या आश्रमास भेट, शबरीने केलेले स्वागत
किष्किंधाकांड अध्याय 1 श्रीराम-हनुमंत भेट ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम-हनुमंत भेट आदित्यान्वयसागरे दशरथः स्वातीजलं निर्मलंकौसल्याजठराख्यशुक्तिपुटके श्रीराममुक्ताफलम् ।तन्नीलं हृदाये हरेण पदकं सम्यग्धृतं सुज्ज्वलंसच्छत्रं स्मरणेन शंकरसमं प्राप्तोति भाग्यं जनः ॥१॥सच्चिदानंदरुपाय जनार्दनस्वरुपिणे ।स्वप्रकाशाय शुद्धाय आचार्याय नमो नमः ॥२॥मायातीताय नित्याय मायागुणप्रकाशिने ।व्यक्ताव्यक्तस्वरुपाय आचार्याय ...अजून वाचानमः ॥३॥ श्री एकनाथांचे आत्मनिवेदन : अरण्यकांडा झाले निरुपण । श्रीरामें केलें संपुर्ण ।आता किष्किंधाकांडकथन । श्रीरघुनंदन स्वयें वदवी ॥१॥माझ्या अंगीं मुर्खपण । त्या मजकरवीं रामायण ।श्रीराम वदवी आपण । निग्रहूनि निजबळें ॥२॥सांडोनि रामकथालेखन । मजकरितां गमनागमन ।मार्गी श्रीराम रामायाण । स्वयें संपूर्ण प्रकाशी ॥३॥करूं बैसतां भोजन । ग्रासोग्रासीं स्मरे रघुनंदन ।मागें घालूनि जेवन । राम रामायण स्वयें वदवी ॥४॥पाहों
अध्याय 2 सुग्रीवाची जन्मकथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ दूतोऽहं प्रेषितस्तेन सुग्रीवेण महात्मना ।राजा वानरमुख्यानां हनूमान्नाम वानरः ॥१॥युवाभ्यां स हि धर्मात्मा सुग्रीवः सख्यमिच्छति ।तस्य मां सचिवं विद्धि वानरं पवनात्मजम् ॥२॥ हनुमंत सुग्रीवाचा जन्मवृत्तांत विचारतो : हनुमंत सांगे श्रीरामासी । मज ...अजून वाचातुम्हापासीं ।धाडिले पहावया वृत्तांतासी । सख्य तुम्हांसीं करावया ॥२॥देवदैत्यदानवांसी । रिघु नव्हे या वनासी ।तेथें येतां तुम्हां मानवांसी । वानरांसी विस्मयो ॥३॥धीर वीर गंभीरता । तुम्हां दोघां देखोनि येतां।भयें आश्चर्य सुग्रीवाच्या चित्ता । निःशंकता देखोनि ॥४॥ सुग्रीवाची शोचीय अवस्था व इच्छा, मारुतीची भूमिका व श्रीरामांचे आश्वासन : हृतदार हृतस्वार्थ । सुग्रीव वाळिभयें भीत ।तुमचा इच्छितो साह्यार्त । मज तदर्थ धाडिलें
अध्याय 3 सुग्रीवाशी सख्य ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीवाला स्नेहसंबंध जोडण्यासाठी श्रीराम पाचारण करितात : वालिसुग्रीवजन्मकथा । ऐकोनि सुख श्रीरघुनाथा ।संतोषोनियां हनुमंता । होये बोलता श्रीराम ॥१॥सख्य करावें सुग्रीवासीं । हे मुख्य कर्तव्य आम्हांसी ।तूंही सख्यार्थ आलासी । अतिशयेंसी ...अजून वाचाजालें ॥२॥कबंधे सांगीतले मजपासीं । हृतदारदुःख सुग्रीवासी ।सुखी करावया तयासी । ऋष्यमूकासी मी आलों ॥३॥जो मज होय अनन्य शरण । त्याचें दुःख निर्दाळून ।सुखी करावें संपूर्ण । ब्रीर्द जाण हें माझें ॥४॥दुःख निरसूनि सुख द्यावयासी । मी आलों वनवासासी ।वेगीं बोलावी सुग्रीवासी । सुखी त्यासी मी करीन ॥५॥ऐकोनि श्रीरामाचें वचन । हनुमंत जाला सुखसंपन्न ।वंदोनि श्रीरामाचे चरण । केले उड्डाण
अध्याय 4 वाली सुग्रीवाच्या वैराची मूळ कथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ दोघा बंधूंच्या कलहाच्या कारणासंबंधी श्रीरामांचा प्रश्न : निर्दळोनियां वाळीसी । सदार राज्य सुग्रीवासी ।द्यावया श्रीराम उल्लासी । मित्रकार्यासी अवंचक ॥१॥स्वकार्य सांडोनियां मागें । मित्र-मित्रकार्यार्थ लगवेगें ।श्रीरघुनाथ धांवे अंगें ...अजून वाचासाह्य सर्वेस्वें शरणागता ॥२॥श्रीराम विचार करी शुद्धु । हे तंव दोघे सखे बंधु ।कां पडला द्वेषसंबंधु । द्वेषसंबंधु पुसत ॥३॥ किंनिमित्तं महद्वैरं श्रोतुमिच्छामि तत्वतः ।अनंतरं वधिष्यामि संप्रधार्य बलाबलम् ॥१॥ तुम्ही दोघे बंधु सहोदर । तुम्हां दोघांत कां पडिलें वैर ।तेंही अतिशयेंसी दुर्धर । येरयेरां घातक ॥४॥ सुग्रीवाकडून निवेदन : या वैराचें मूळ कारण । समूळ सांगावें संपूर्ण ।ऐकोनिया श्रीरामभाषण ।
अध्याय 5 वालीकडून सुग्रीवाचा पराभव ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ वालीच्या सामर्थ्याने सुग्रीवाला भीती : पुढती वाळीच्या संत्रासीं । सुग्रीव सांगे श्रीरामापासीं ।हृतराज्य गुप्त वनवासी । तेथेंही आम्हांसी मारूं धांवे ॥१॥ तेनाहमपविद्धश्च हृतदारश्च राघव ।तद्भयाश्च महीं कृत्स्नां विचरामि समंततः ॥१॥ऋष्यमूकं ...अजून वाचाभार्याहरणदुःखितः ।प्रविष्टोऽस्मि दुराधर्ष वालिनः कारणान्तरे ॥२॥ आम्हीं जावें जेथ जेथ । वाळी मागें धावें तेथ तेथ ।आमचा करावया जीवघात । वैर पोटांत दृढ धरिलें ॥२॥वालिभयें भयभीत । अहोरात्र असों गुप्त ।पाळती येवोनियां तेथ । शुद्धि सांगत वाळीसी ॥३॥ त्यामुळे सुग्रीव ऋषमूक पर्वताचा आश्रय घेतो : भयें भोंवतां दशदिशीं । नारदें सांगीतलें आम्हांसी ।जावोनि रहावें ऋषमूक पर्वतांसी । तेथें वाळीसी ऋषीशाप
अध्याय 6 वालीचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम हनुमंत सौमित्र । सुग्रीवसमवेत वानर ।पावोनि किष्किंधेचें द्वार । केला भुभुःकार सुग्रीवें ॥१॥ अथ तस्य निनादं तं सुग्रीवस्य महात्मनः ।शुश्रावांतःपुरगतो वाली भ्रातुरमर्षणः ॥१॥ सुग्रीवाचेनि गिरागजरें । नादें दुमदुमिलें अंबर ।कोसळों ...अजून वाचागिरिकंदर । वाळीचें मंदिर दणाणलें ॥२॥ सुग्रीवाची गर्जना ऐकून वालीचा संताप : ऐकोनि सुग्रीवाची आरोळी । कोपें खवळलासे वीर वाळी ।आरक्त जाला क्रोधानळीं । जेंवी कुलाचळीं बालसूर्य ॥३॥वाळी विचारी हृदयांत । आतांच युद्धीं जर्जरीभूत ।म्यां पाडिला होता मूर्च्छित । सवेंचि गर्जत केंवी आला ॥४॥माझ्या घायें मासानुमास । कुंथत पडे वर्षानुवर्ष ।सवेंचि आला युद्धास । अति उल्लासें गर्जत ॥५॥आतां असो हा
अध्याय 7 सुग्रीवराज्याभिषेक ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ वालीच्या निधनाने वानरांचा घबराट : श्रीरामाच्या दृढबाणीं । घायें वाळी पडिला रणीं ।लोळतां देखोनि धरणीं । वानरां पळणी मांडली ॥१॥ निहते वालिनि रणे रामेण परमात्मना ।जग्मुस्ते वानराः सर्वे किष्किंधां भयविंह्वलाः ॥१॥तारामूचुर्महाभागे हतो ...अजून वाचारणाजिरे ।अंगदं परिगृह्यार्थ मंत्रिणं परिनोदय ॥२॥चतुर्द्वारकपाटादीन्बद्धा रक्षामहे पुरीम् ।वानराणां तु राजानमंगदं कुरु भामिनि ॥३॥ श्रीरामाच्या बाणनेटीं । वाळी पडिला देखोनि दृष्टीं ।वानरसेना भयसंकटीं । उठाउठीं पळाली ॥२॥वाळी मारिला विंधोनि पूर्ण । सैन्यावरी सोडील बाण ।अवघियांचा घेईल प्राण । पलायमान तेणें धाकें ॥३॥श्रीरामबाण अति दुर्धर । घायें निवटिले त्रिशिरा खर ।चवदा सहस्र निशाचर । बाणीं सत्वर निर्दळिलें ॥४॥श्रीराम जीवें उरों नेदी
अध्याय 8 मागील अनुसंधान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामें उद्धरिलें वाळीसी । राज्यभिषिंचन सुग्रीवासी ।सुखी केलें स्वयें तारेसी । देवोनि अंगदासी यौवराज्य ॥१॥सुग्रीव राजा निजभ्रतार । युवराज निजकुमर ।तारा तेणें सुखनिर्भर । श्रीरामचंद्रप्रसादें ॥२॥ अभिषेके तु सुग्रीवे प्रविष्टे वानरे ...अजून वाचा।आजगाम सहभ्राता रामळ पस्रवणं गिरिम् ॥१॥ प्रधान अंगदसमवेत । सुग्रीव गेला किष्किंधेत ।श्रीरामें वसविला माल्यवंत । गुहा प्रशस्त देखोनि ॥३॥ पावसाळा संपल्यावरही सुग्रीवाच्या उपेक्षेमुळे रामांचा क्रोध : माल्यवंतगिरिवरीं । प्रस्रवणगुहेभीतरीं ।श्रीराम राहिला मास चारी । सहे साहाकारी सौमित्र ॥४॥चारी मास पर्जन्यकाळ । श्रीराम राहिला सुनिश्चळ ।श्रीरामकार्या उतावेळ । शरत्काल स्वयें आला ॥५॥ग्रासोनि वर्षाकाळ । शीघ्र पावला शरत्काळ ।श्रीराम काळाचाही काळ
अध्याय 9 वानरसेनेला श्रीरामदर्शन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीव श्रीरामांना वानरसेनेचा विस्तार समजावून सांगतो : सुग्रीवें विनविला रघुवीर । सैन्य सेनानी सेनाधर ।सैन्ययूथपाळ महावीर । नमस्कार करूं पाहती ॥१॥स्वामि समवेत सौमित्र । पहावा वानरांचा संभार ।ऐकोनि सुग्रीवांचे उत्तर । ...अजून वाचासादर श्रीराम ॥२॥ यूथपा दशसाहस्रं वृता वानरकोटिभिः ।वानयैः पार्वतीयैश्च सामुद्रैश्च महाबलैः ॥१॥ माझे कटकीं दहा सहस्र । सेनानायक सेनाधर ।एकएकातळीं कोटि वीर । अति दुर्धर रणयोद्धे ॥३॥उदयास्तगिरिपर्यंत । वानर आले जी समस्त ।नंदवनींचे वीर विख्यात । आले त्वरित रामाकार्या ॥४॥सप्तारण्य सप्तसमुद्र । नदीस्रोत वनें उखर ।तेथोनियां वानरवीर । आले सत्वर रामकार्या ॥५॥मेरू मंदार आणि विंध्याद्री । वेंकटाद्रि आणि सह्याद्री ।तेथोनि
अध्याय 10 हनुमंत जन्मकथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा प्रश्न : अगस्तिमहामुनीप्रती । प्रश्न केला श्रीरघुपतीं ।सुग्रीवा निजसखा मारूती । अद्भुतशक्ती असतां ॥१॥तेणें साधावया मित्र कार्यार्था । कां न करीच वाळीच्या घाता ।या हनुमंताच्या भावार्था । मजला साद्यंत सांगावें ...अजून वाचाराघवस्य वचः श्रुत्वा हेतुयुक्तमृषिस्तदा ।हनूमतः समक्षं तमिदं वचनमब्रवीत् ॥१॥ अगस्ती मारुतीची जन्मकथा सांगतात : ऐसें पुसता श्रीरघुनाथ । अगस्ति मुनि आनंदयुक्त ।हनुमंताचें निजसामर्थ्य । असे सांगत स्वानंदे ॥३॥आतां सांगेन श्रीरघुनाथा । हनुमंताची जन्मकथा ।सकळमूळारंभवार्ता । होय सांगता अगस्ति ॥४॥पुत्रेष्टियाग दशरथासी । ताटप्रसाद यज्ञपुरुषीं ।वसिष्ठें करोनि विभागांसी । तिघी राणियांसी दीधलें ॥५॥कैकेयीभाग हरिला घारीं । ते शापद्वारें जाली नारी ।तेथें वर्तली
अध्याय 11 सीतेच्या शोधासाठी वानरांना पाठविले ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीवाची श्रीरामांना विनंती : दाविला कपिसेनासंभार । अति दाटुगा हनुमंत वीर ।तेणें सुखावला श्रीरामचंद्र । केला नमस्कार सुग्रीवें ॥१॥वानरसेना कडकडाटीं । वेगीं रिघों लागे वैकुंठीं ।अथवा कैलासगिरितटीं । मेरुपृष्ठीं ...अजून वाचाघाला ॥२॥रिघोनि पाताळाच्या पोटीं । मारूं दानवांच्या कोटी ।अथवा दैत्यांचि थाटी । उठउठीं निर्दाळूं ॥३॥गण गंधर्व सुरवर । यक्ष राक्षस नर किन्नर ।माझे निर्दाळिती वानर । चराचर उलथिती ॥४॥लोकालोकांहीपरती । कव घालोनि अवचितीं ।वानर कृतकार्य साधिती । आज्ञा रघुपति शीघ्र द्यावी ॥५॥ इति ब्रुवंतं सुग्रीवं रामो दशरथात्मजः ।बाहुभ्यां संपरिष्वज्य प्रीतो वचनमब्रवीत् ॥१॥ज्ञायतां सौम्य वैदेही निलये रावणस्य च ॥२॥ सीतेच्या शोध
अध्याय 12 सीताशोधासाठी वानरांचे प्रयाण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ तिन्ही दिशांकडे वानरांना पाठविल्यावर दक्षिणदिशेकडे महापराक्रमी निवडक वीरांना पाठविले : नाना स्थानें स्वर्गवासीं । तेथें शोधावया सीतेसी ।सुग्रीवें सांगोनि तारापासीं । वेगीं तो स्वर्गासी धाडिला ।पूर्व पश्चिम उत्तर । स्वर्ग ...अजून वाचाधाडिले वीर ।दक्षिणदिशेचा विचार । सांगो कपीश्वर विसरला ॥२॥ऐसें न म्हणाचें श्रोतीं । दक्षिणदिशेची गती ।आहे सीतेची निजप्राप्ती । गोड ग्रासार्थीं राखिली ॥३॥गोड ग्रास तो रामायणांत । तो हा सीताशु्द्धीचा ग्रंथ ।ख्याति करील हनुमंत । लंकेआंत तें ऐका ॥४॥दक्षिणदिशेचा विचार । सीथाप्राप्तींचे मुख्य घर ।तेथें धाडिले महाशूर । वीर दिनकरप्रतापी ॥५॥ पितामहसुतं चैव जांबवंतं महाबलम् ।नीलमग्निसुतं चैव हनूमंतं च वानरम
अध्याय 13 श्रीराम-हनुमंत संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीव अंगदाला हनुमंताच्या स्वाधीन करुन त्याच्यावरच सर्व भार टाकतो : सीताशुद्धीस गेले वानर ।दक्षिणेसी संगद वीर ।निघाले ही सहपरिवार । वानरवीरसमवेत ॥१॥ सह तारांगदाभ्या तु प्रस्थितो हनुमान्कपिः ।सुग्रीवेण यथोद्दिष्टं तं तु ...अजून वाचासुरासदम् ॥१॥ सु्ग्रीवें बोललावोनि हनुमंत । हातीं दिधला वािलसुत ।सीताशुद्धीं रामकार्यार्थ । तुझेनि निजविजयी ॥२॥अंगद वीर अति विख्यात । सवे नळ नीळ जांबुवंत ।वानरवीर असंख्यात दुर्धर पंत दक्षिणे ॥३॥सिद्धि न्यावया रामकार्यार्था । शुद्धि साधावया सीता ।मुखरण करोनि हनुमंता । होय धाडिता सुग्रीव ॥सीताशुद्धि माझे माथां । सुग्रीवें ठेविली तत्वतां ।तेणें उल्लास हनुमंता । श्रीरामकांता शोधावया ॥५॥ हनुमंत श्रीरामांकडे जाण्याची अंगदाची
अध्याय 14 वानरांचा गुहाप्रवेश ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ एक महिना होतांच पूर्व, पश्चिम व उत्तरेकडील वानर परत आले : पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य । उत्तर नैर्ऋत्य आग्नेयकोण ।पाताळदिशा स्वर्गभुवन । आले शोधून वानर ॥१॥ तदहः प्रथमं कृत्वा मासे प्रस्रवणं ...अजून वाचा।कपिराजेन संगम्य निराशाः कपिकुंजराः ॥१॥समेत्य मासे संपूर्णे सुग्रीवमुपचक्रमुः ।तं प्रस्रवणपृष्ठस्थमभिगम्याभिवाद्य च ।सुग्रीवं प्लवगाः सर्वे सुषेणप्रमुखा ब्रुवन् ॥२॥ राया सुग्रीवांचे आज्ञापन । मासें एकें संपूर्ण ।अवघीं यावें सीता शोधून । न येतां दारूण राजदंड ॥२॥ सर्वजण शोध न लागता परत आले : प्रस्रवण गिरिवर । तेथें वसे श्रीरामचंद्र ।तयापासीं सुग्रीव वीर । नित्य तत्पर सेवेंसीं ॥३॥श्रीराम पुसे सुग्रीवासी । वानर गेले
अध्याय 15 तापसी-हनुमंत-संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सावध झाल्यावर त्या वानरांना सभोवती सुवर्णभुवन दिसते : वानर होवोनि सावधान । पाहती तंव हेमभुवन ।हेमशय्या हेमासन । उपरी आस्तरण हेमाचें ॥१॥हेममय तेथींची क्षिती । हेममय अवघ्या भिंती ।हेमदीपिका हेमदीप्ती । पात्रपंक्ती ...अजून वाचा॥२॥हेमविमानें हेमांबरें । हेमबद्ध सरोवरें ।हेममत्स्य हेमनगरें । जळचरें हेममय ॥३॥मुक्ताफळें हेमरत्नें । हेमपदकें हेमभूषणें ।हेममय उपकरणें । हेमाभरणें पशुपक्षी ॥४॥ ते विवर सर्व समृद्धीने निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण : विवरीं धनधान्यसमृद्धी । विवरीं परमामृतनदी ।विवरामांजि ऋद्धिसिद्धी । सुख त्रिशुद्धी वानरां ॥५॥नसोनि रविचंद्रभास । विवरामाजी नित्य प्रकाश ।तेणें वानरां अति उल्लास । पाहती वास वायपुत्राची ॥६॥ऐसिये रमणीय स्थानीं हनुमंत पाहोनियां नयनीं
अध्याय 16 संपातीचा उद्धार ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ फळांनी व पाण्याने वानरांची तृप्ती : वानरां मास उपोषण । तापसीं फळें आणूनि पूर्ण ।दिधलें यावृत्तृप्ति भोजन । वानरगण उल्लासी ॥१॥ संतृप्तास्ते फलैर्मूलैः संजाताः शीतवारिणा ।बलवीर्याश्च ते सर्वे तत्रासन्हरिपूगवाः ॥१॥अपतन्सर्व एवैते ...अजून वाचावानरयूथपाः ॥२॥ भक्षितां पैं फळमूळ । सेविता निर्मळ जळ ।वानर सुखी जाले सकळ । हर्ष प्रबळ तृप्तीचा ॥२॥वानरांचे सकळ दळ । पूर्विल्यापरिस अति प्रबळ ।शतगुणें वाढलें बळ । जनकबाळ शोधावया ॥३॥ यानंतर सर्व वानरांची परत जाण्याची इच्छा : वानर म्हणती हनुमंतासी । येथें काय फळें खावया आलासी ।किंवा सीता शोधावयासी । त्या रामकार्यासी साधावें ॥४॥शोधितां या विवराआंत । सीता न
अध्याय 17 हनुमंताचे समुद्रावरुन उड्डाण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ आख्याता गृध्रराजेन समुत्पत्य प्लवंगमाः ।संगताः प्रीतिसंयुक्ता विनेदुः सिंहविक्रमाः ॥१॥ संपातीकडून सीतेची माहिती मिळाल्यामुळे वानरांना आनंद : संपातीनें सीताशुद्धी । यथार्थ सांगितली बुद्धी ।तेणें वानरांची मांदी । जयजयशब्दीं गर्जत ॥१॥मिळोनि वानरांचा ...अजून वाचा। सिंहनादाहूनि थोर ।करिते जाले भुभुःकार । सीता सुंदर सांपडली ॥२॥येरयेरां आलिंगण । येरयेरां अभिनंदन ।सीता सांपडली चिद्रत्न । हर्षे उड्डाण करिताती ॥३॥आमच्या कष्टांची जाली सिद्धी । आजि पावली सीताशुद्धी ।म्हणोनि वानरांची मांदी । हर्षानुवादीं डुल्लत ॥४॥येरयेरां दाविती वांकुल्या । येरयेरा करिती गुदगुल्या ।सत्य सीताशुद्धी जालिया । आमची फिटली आशंका ॥१०५॥अंगदे बैसोनि सपरिवार । शतयोजन हा सागर ।उल्लंघो शके कोण
अध्याय 18 हनुमंताचा लंकाप्रवेश ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताच्या उड्डाणात सिंहिकेचे विघ्न : सुरसा देवविघ्नातें । स्वयें जिणानि हनुमंते ।पुढें लंघोनि समुद्रातें । सिंहिका तेथें ग्रासूं आली ॥१॥ प्लवमानं तु तं द्दष्ट्वा सिंहिका नाम राक्षसी ।मनसा चिंतयामास प्रकृद्धा कामरुपिणी ...अजून वाचाहि सुमहत्सत्वं चिरस्य वशमागतम् ।इति संचित्य मनसा छायामस्य समक्षिपत् ॥२॥ गगनीं उडतां हनुमंत । छाया पडती समुद्रांत ।सिंहिकेचा मनोरथ । ग्रासावया हनुमंत वाढली ॥२॥शिववरद सिंहिकेसी । छाया धरितां प्राणी ग्रासी ।छायाग्रह नांव तिसी । ते हनुमंतासीं गिळों आली ॥३॥कपिच्छाया पडतां जळीं । सिंहिका ते छाया गिळी ।हनुमंताची गति खुंटली । देहाची वळली मुरकुंडी ॥४॥ छायायां संगृहीतायां चिंतयामास वानरः ।किमाक्षिप्तोऽस्मि सहसा
सुंदरकांड अध्याय 1 लंकेचा शोध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम् ।काकुत्स्थं करूणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।राजेन्द्रं सत्यसंघं दशरथनयनम् श्यामलं शांतमूर्तिम् ।वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ श्रीरामनामाचा महिमा : श्रीरामें पावन कथा । श्रीरामें पावन ...अजून वाचा।श्रीरामें पावन श्रोता । श्रीराम स्वतां ग्रंथार्थ ॥ १ ॥श्रीरामें धन्य धरणी । श्रीरामें धन्य करणीं ।श्रीरामें धन्य वाणी । जे रामायणीं विनटली ॥ २ ॥श्रीरामें पावन संसार । श्रीरामें पावन चराचर ।श्रीरामें पावन नर । जें तत्पर नित्य स्मरती ॥ ३ ॥रामनामें शुद्ध साधन । रामनाम शुद्ध ज्ञान ।रामनामें सुते बंधन । नाम पावन सर्वार्थी ॥ ४ ॥रामनामें सरतें
अध्याय 2 सीतेचा शोध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ नगरशोध केल्यानंतर राजवस्तीत हनुमंत जातो : हनुमंत महावीरें । लंका शोधिली घरोघरें ।हाट चोहाटें चौबारें । गुप्त ओवरें स्त्रियांचीं ॥ १ ॥ऐसें शोधितां नगरांत । न लभेचि सीताशुद्धर्थ ।राजवर्गाच्या गृहांत । ...अजून वाचाहनुमंत पाहों रिघे ॥ २ ॥ विचक्रमे गृहान् वेगात् प्रहस्तस्य निवेशनम् ।ततो न देवीति गृहं महापार्श्वस्य वीर्यवान् ॥ १ ॥महोदरस्य च तथा महाकायस्य चैव हि ।विद्युज्जिव्हस्य भुवनं जंबुमालेस्तथैव च ॥ २ ॥वज्रदंष्ट्रस्य तथा शुकसारणयोरपि ।विद्युन्माले सुमालेश्च विकटस्याप्यतुर्बले ॥ ३ ॥बहुशत्रोः सूर्यशत्रोः कुमित्रामित्रयोस्तथा ।चित्रकस्य च विचित्रस्य अतिगर्विष्ठमित्रयोः ॥ ४ ॥ताम्राक्षस्य च धूम्रस्य मकराक्षमृगाक्षयो ।लंबजिव्ह विरूपाक्ष आदिनां च महाबलः ॥ ५ ॥
अध्याय 3 रावणसभेवर मारूतीचा पुच्छप्रयोग ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ बाजातपेठा, बिभीषणाचे मंदिर पाहूनही सीतेचा शोध लागला नाही : शोधितां बिभीषणमंदिर । सुखी झाला तो कपीन्द्र ।शुद्धि न लभेचि सीता सुंदर । तेणें वानर उद्वेगी ॥ १ ॥शोधिलें समस्त नगर ...अजून वाचाशोधिलीं हटकें घरोघर ।शुद्धि न लभेचि अणुमात्र । तेणें वानर उद्वेगी ॥ २ ॥शोधिलें समस्त नगर जाण । जन आणि अवघें वन ।स्वयें शोधिलें सावधान । तेणें उद्विग्न वानर ॥ ३ ॥सीताशुद्धर्थी उद्विग्न । अति चिंता कंपायमान ।आतां करी बुद्धि आपण । सीता चिद्रत्न तेणें लाभे ॥ ४ ॥ मारूतीची अभिनव योजना : येथें शोधावया सीताशुद्धर्थ । कळी माजवूं नगराआंत
अध्याय 4 रावणाच्या शयनभवनांत सीतेचा शोध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही सीतेचा शोध लागत नाही रावणाचें सभेआंत । न लभे सीताशुद्धीची मात ।तेणें दुःखें हनुमंत । चिंताग्रस्त दृढ झाला ॥ १ ॥दृढ प्रयत्न केला भारी । समस्त ...अजून वाचालंकापुरी ।धांडोळिलें घरोघरीं । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ २ ॥विनोदें वाटिका अरामशिरीं । नद नदी वापी पोखरीं ।राजकुमरांच्या घरोघरीं । सीता सुंदरी तेथें नाही ॥ ३ ॥प्रत्यावर्ती लंकापुरीं । शतावृत्तीं घरोघरीं ।शुद्धि घेतां नानापरी । सीता सुंदरी तेथे नाहीं ॥ ४ ॥स्त्रीपुरूषांचे शेजारी । त्या स्थानांचे उपराउपरीं ।शोधितां कोट्यनुकोटी नारी । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ ५ ॥रावणाचे सभेमाझारीं
अध्याय 5 मारूतीला अशोकवनात सीतेचे दर्शन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचा शांतिहोम : विघ्नदेखिलें सभेआंत । रावण होम क्री शांत्यर्थ ।मंदोदरी सेजे गुप्त । देखे हनुमंत एकाकी ॥ १ ॥ मंदोदरीलाच सीता समजून हनुमंताचे विचार व मनोविकार : ही ...अजून वाचाहोय सीता । ऐसें मानलें हनुमंता ।तेचि अवधारा पैं कथा । श्लोकीं श्लोकार्थ अवधारिजे ॥ २ ॥विमानीं उपराउपरीं । शोधितां एकांत ओवरी ।रावणाचे सेजेवरी । मंदोदरी देखिली ॥ ३ ॥ठाण माण गुणलक्षण । रूपरेखा स्थान यौवन ।सीतेसारखी समसमान । दोघी अनुपम्य स्वरूपें ॥ ४ ॥हेचि श्रीरामाची कांता । हेचि माझी स्वामिनी सीता ।ऐसे मानिलें हनुमंता । उल्लासतां नाचत ॥ ५
अध्याय 6 मंदोदरीची जन्मकथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेची देहस्थिती : श्रीरामाची निजभक्ती । भजनें दाटुगी सीता गती ।तृण पाषाण नामें गर्जती । नामें त्रिजगती कोंदली ॥ १ ॥श्रीरामाची परम भक्ती । स्वयें जाणे सीता सती ।तिचे भजनाची देहस्थिती ...अजून वाचाभजती युक्ती अवधारा ॥ २ ॥ काया – वाचा – मनाने भजनभक्ती : ह्रदयीं आत्मा श्रीरघुपती । पाहतां वेदशास्त्रव्युत्पत्ती ।ऐसी जे कां निजप्रतीती । भजनभक्ति ते नांव ॥ ३ ॥तेचि भक्ति धरितां चित्तीं । श्रीराम दिसे सर्वांभूतीं ।हे दृष्टीची भजनस्थिती । केला वेदांती निश्चय ॥ ४ ॥याचि स्थितीं वचनोच्चार । हेंचि वाचिक वजन निर्धार ।श्रीराम अक्षरीं अक्षर । नामोच्चार श्रीराम
अध्याय 7 रावणाचे अशोकवनात आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मारूतीचे अशोकवनात आगमन : पूर्वप्रसंगाप्रती । दूतिकांमागें मारूती ।आला अशोकवनाप्रती । सीता सती वंदावया ॥ १ ॥देखोनियां अशोकवन । हनुमान घाली लोटांगण ।करोनियां श्रीरामस्मरण । सीतादर्शन करूं निघे ॥ २ ...अजून वाचाअशोकवनाचे वर्णन : साधावया सीता चिद्रत्न । हनुमान क्षण एक धरी ध्यान ।देखोनियां अशोकवन । आलें स्फुरण हनुमंता ॥ ३ ॥जैसा श्रीरामाचा बाण । तैसें करोनि उड्डाण ।अशोकवनामाजी जाण । आला आपण हनुमंत ॥ ४ ॥वृक्ष सफळ आणि सरळ । वन देखोनि विशाळ ।करी हर्षाचा गोंधळ । घोंटी लाळ मिटक्या देत ॥ ५ ॥दाट देखोनियां झाडां । उल्लास आला माकडा
अध्याय 8 रावण सीता संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाच्या आगमनाने सीतेची झालेली स्थिती : पूर्वप्रसंग संपतां तेथ । रावण होऊनि पंचोन्मत्त ।येवोनि अशोकवनांआंत । सीता पाहत भोगेच्छा ॥ १ ॥रावणें ऐसी देखिली सीता । कंपायमान अति भयार्ता ।जेंवी ...अजून वाचावायुघाता । श्रीरामकांता तेंवी कांपे ॥ २ ॥देखोनियां दशानन । ऊरूउदरबाहुभूषण ।पीतांबर अति जीर्ण । तेणेंचि आपणा आच्छादी ॥ ३ ॥पीतांबर तो अति जीर्ण । तेणें अवयव आच्छादून ।जानकी अति लज्जायमान । अधोवदन राहिली ॥ ४ ॥नाहीं अभ्यंग ना स्नान । सर्वांग मलिन मळकण ।नाहीं आच्छादन आस्तरण । नाहीं आसन बैसावया ॥ ५ ॥सीता धरणिजा आपण । धरासनीं सुखसंपन्न ।बैसली
अध्याय 9 दशरथ – कौसल्या विवाहाची पूर्वकथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मंदोदरीकडून रावणाचा अनुनय : रावण सीतेसी लावितां हात । हनुमान त्याचा करिता घात ।तों मंदोदरी येऊनि तेथ । अति अनर्थ चुकविला ॥ १ ॥अतिकायाची जननी । रावणप्रिया वनमालिनी ...अजून वाचारावणा आलिंगूनी । युक्तवचनीं बोलत ॥ २ ॥स्वदारकाम मजसीं रम । मजसीं रमणें हा स्वधर्म ।सीता अकाम चित्ता काम । परम अधर्म अधःपात ॥ ३ ॥सांडी अकाम सीतेंसी । स्वेच्छा रमावें मजसीं ।माझेनि कामें सुखी होसी । सीतेपासीं अति दुःख ॥ ४ ॥ सीताहरणामुळे होणारे भावी अनर्थ : श्रीरामकांता सीता सती । तिचे कामाचे आसक्तीं ।राक्षसांची जावया व्यक्ती । होईल
अध्याय 10 सीतेचा पश्चाताप ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेला रावणाच्या धमक्या : रावणें भेडसावितां सीता । त्याच्या पत्न्या ज्या समस्ता ।आश्वासिती श्रीरामकांता । नेत्रवक्त्रा खुणावूनि ॥ १ ॥ देवगंधर्वकन्याश्च विषेदू राक्षसीस्तदा ।ओष्ठप्रकारैरपरा नेत्राकारैस्तथा परा : ॥१॥सीतामाश्वासयामासुस्तर्जितां तेन राक्षसा ॥२॥ ...अजून वाचाम्हणे स्वयें रावण । माझी भार्या न होतां पूर्ण ।तुझा घेईन मी प्राण । नाक कान कापूनी ॥ २ ॥फोडा इचे दोनी डोळे । वेगें मोडा रे सिसाळें ।स्तन कापा मांसगोळे । अंत्रमाळे काढा वेगीं ॥ ३ ॥तुझिया पातिव्रत्याची थोरी । भीड धरिली सहा मासवरी ।आतां भोगीन बलात्कारीं । राम भिकारी वनवासी ॥ ४ ॥रावणपत्न्यांनी सीतेला अभयाचे आश्वासन दिले :ऐसीं
अध्याय 11 सीता व मारुती यांची प्रथम भेट ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वीच्या घटनांचे स्मरण होऊन सीतेचा अनुताप : सवेग भेटी श्रीरामकांता । परम आल्हाद हनुमंता ।तिच्या निरपेक्ष एकांता । वृक्षाआंतौता बैसला ॥ १ ॥स्वस्थानीं राक्षसी समस्ता । स्वभावें ...अजून वाचानिद्रिस्ता ।अशोकवृक्षातळीं सीता । सावधानता बैसली ॥ २ ॥म्हणे मज नाहीं पापकर्मपरता । आणि कां भोगितें दुःखावस्था ।वृथा लक्ष्मणाभिशापता । तेणें पापें लंकेशा आतुडलें ॥ ३ ॥लक्ष्मणाची मर्यादारेखा । म्यां उल्लंघिता देखा ।अंतरोनी श्रीरामसखा । त्या दशमुखा आतुडलें ॥ ४ ॥छळूं जातां श्रीरामभक्ता । मुकलें मी श्रीरघुनाथा ।हें पाप माझें माथां । दुःखावस्था मी भोगीं ॥ ५ ॥अवज्ञा केली म्यां
अध्याय 12 सीता – हनुमंत यांचा संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता मारूतीला पूर्ववृत्तांत कथन करण्याची सूचना करिते : एकाएकीं अशोकवनां आंत । आला देखोनि हनुमंत ।त्यासी समूळ वृत्तांत । पुसे साद्यंत जानकी ॥ १ ॥मज वनवासीं असतां । ...अजून वाचातूं नव्हतासी हनुमंता ।कैंचा आलासी तूं आतां । निजवृत्तांता सांगावें ॥ २ ॥कैसेनि राम देखिला दृष्टीं । तुज रामासीं कैसेनि भेटीं ।कैशा कैशा केलिया गोष्टी । जेणें पोटीं अति प्रीति ॥ ३ ॥कैसा बाणला तो वचनार्थ । साधावया श्रीरामाकार्यार्थ ।हनुमान प्राणेंसीं साह्यभूत । तो गुह्यार्थ मज सांगें ॥ ४ ॥श्रीराम भेटलिया कैसें सुख । श्रीरामवचनीं कैसें पीयूख ।श्रीरामसंगें कैसा हरिख
अध्याय 13 हनुमंताकडून वनविध्वंस ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मणी पाहून श्रीरामांना पूर्वींच्या गोष्टींचे स्मरण होईल ते सीता सांगते : मणि देवोनि वानराहातीं । स्वयें बोले सीता सती ।मणि देखोनि रघुपती । स्मरेल चित्तीं तिघांतें ॥ १ ॥कौसल्या माता आणि ...अजून वाचा। आठवेल दशरथ पिता ।तिघे आठवती श्रीरघुनाथा । कोण्या अर्था तें ऐका ॥ २ ॥पूर्वी समुद्रमंथनीं । तेथें निघाला कौस्तुभमणी ।तो घेतां श्रीविष्णूंनीं । इंद्र ते क्षणीं तळमळी ॥ ३ ॥ब्रह्मशापाच्या शापोक्तीं । सिंधुनिमग्न सर्व संपत्ती ।त्यांतील कौस्तुभ श्रीपती । माझा मजप्रती देइजे ॥ ४ ॥इंद्र मणि मागे करोनि ग्लानी । विष्णु त्यास दे फणिमणि बदलोनी ।इंद्रें देखतांचि नयनीं ।
अध्याय 14 रावणपुत्र अखयाचा मारूतीकडून वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ ऎंशी हजार किंकर, चौदा हजार बनकर व संपूर्णवनाचा मारूतीने विध्वंस केला म्हणून रावणाचा संताप किंकर मारिले ऐशीं सहस्त्र । चवदा सहस्त्र बनकर ।वन विध्वंसिलें मनोहर । तेणें दशशिर कोपला ...अजून वाचा१ ॥वानर जाणोनि महाबळी । प्रहस्तसुत जंबुमाळी ।रावणें पाचारोनि जवळी । गुज त्याजवळी सांगत ॥ २ ॥मारिले किंकर बनकर । विध्वंसिलें मनोहर ।तो तुवां मारावा वानर । युद्धीं दुर्धर गांजोनी ॥ ३ ॥वानर न मरतां देख । तुज परतल्या एकाएक ।तरी तुवां हारविलें नासिक । नपुंसक राक्षसांत ॥ ४ ॥वानरा न करो मर्दन । तेव्हांचि तुझे काळें वदन ।रासभारोहण अपमान
अध्याय 15 इंद्रजिताचा मारुतीकडून अपमान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ अखयाच्या निधनाने रावण दुःखी अखया कुमार पाडिला रणीं । रावणें ऐकतांचि कानीं ।शंख करित दाही वदनीं । लोळे धरणीं गडबडां ॥ १ ॥मुकुट पडिला सभास्थानीं । हें प्रत्यक्ष देखोन नयनीं ...अजून वाचारडे आक्रंदोनी । विरूद्ध करणी म्यां केली ॥ २ ॥बुद्धिभ्रंश झाला मजसी । कुमार धाडिला युद्धासी ।रणीं वानरें मारिलें त्यासी । बोल कवणासीं ठेवावा ॥ ३ ॥माझें जें कां अशोकवन । तें मज जालें शोकस्थान ।कपीनें लंके घालोनि खान । पुत्रनिधान तेणें नेलें ॥ ४ ॥आम्हां अवघ्यांदेखतां जाण । देहामाजि घालोनि खान ।अखया नेला निजनिधान । नागवण मज आली ॥
अध्याय 16 रावण सैन्याचा संहार ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ अपमानामुळे उद्विग्न झालेल्या इंद्रजिताचे पलायन व बिळात प्रवेश इंद्रजित पावोनि अपमान । अतिशयें जाला उद्विग्न ।हनुमंताचें बळलक्षण । सर्वथा संपूर्ण लक्षेना ॥ १ ॥हनुमंताची धैर्यवृत्ती । हनुमंताची संग्रामशक्ती ।हनुमंताची सवेग ...अजून वाचा। अतर्क्यस्थिती लक्षेना ॥ २ ॥अतर्क्य हनुमंताची गती । ते लक्षेना नाना युक्तीं ।इंद्रजिताची खुंटली मती । रणीं मारूती नाटोपे ॥ ३ ॥रणीं नाटोपे मारूती । आपुलें पूर्वशौर्य कीर्तीं ।वानरें नेली निंदेप्रतीं । सलज्ज चित्तीं इंद्रजित ॥ ४ ॥इंद्रातें रणीं जिंकोन । पावलों इंद्रजित अभिधान ।वानरांसीं करितां रण । तृणसमान मज केलें ॥ ५ ॥मी एक गाढा वीर सृष्टीं ।
अध्याय 17 हनुमंताचे रावणसभेत आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताची दैन्यावस्था, ब्रह्मदेवाचे स्मरण रणीं पाठी देवोनि वानरा । लपाला असतां विवरा ।परम लज्जा राजकुमरा । काय महावीरां मुख दावूं ॥ १ ॥माझी वीरवृत्ति अति लाठी । इंद्रजितनामाची ख्याती मोठी ...अजून वाचानेली पुच्छासाठीं । रणसंकटीं गांजोनी ॥ २ ॥कपिपुच्छाचा दुर्धर मार । रणीं गांजिला राजकुमर ।सैन्या जाला समूळ मार । काय करूं मी आतां ॥ ३ ॥कैसेनि भेटों महावीरां । केंवी मुख दावूं राक्षसेंद्रा ।आतां न वचें लंकापुरा । लाजेचें वीरा अति दुःख ॥ ४ ॥वाहिली सदाशिवाची आण । शिवलों रावणाचे चरण ।प्रमाणें जालीं अप्रमाण । वानरें पूर्ण गांजिलें ॥ ५
अध्याय 18 रावणाच्या दाढी-मिशा मारूतीने जाळल्या ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंतासी न चले घात । स्वयें सांगे इंद्रजित ।अवध्य वीर हा हनुमंत । साक्षेपें सांगत बिभीषण ॥ १ ॥इंद्रजित जो कां ज्येष्ठ सुत । नानायुक्ती स्वयें सांगत ।शस्त्रास्त्रीं ब्रह्मपाशांत ...अजून वाचान चले पात हनुमंता ॥ २ ॥शस्त्रशक्ती अस्त्रशक्ती । मंत्रशक्ती तंत्रशक्ती ।कपटमायामोहनशक्ती । रणीं मारूती न धरवे ॥ ३ ॥कर्मपाश धर्मपाश । ब्रह्मयाचा ब्रह्मपाश ।बांधों न शके वानरास । जन्मपाश मुख्यत्वें ॥ ४ ॥बिभीषण प्रिय भ्राता । सांगतसे परम हिता ।शरण रिघावें श्रीरघुनाथा । काय म्यां आतां करावें ॥ ५ ॥सर्वथा अवध्य हा मारूती । इंद्रजिताची उपपत्ती ।बिभीषणाची भिन्न युक्ती
अध्याय 19 लंकादहन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ दाढी – मिशा जळाल्यामुळे रावणाची उडालेली धांदल : पुच्छाग्नि फुंकितां रावण । भडक्यानें उठला हुताशन ।हनुमंत पित्यासी सांगे आपण । करीं अपमान रावणा ॥ १ ॥एकोनि पुत्राचें वचन । वायु वन्हि प्रज्वळून ...अजून वाचामुख पोळून । केलें दहन खांडमिशां ॥ २ ॥अपमानला दशानन । ओष्ठ पोळले दारूण ।शंख करूं न शके रावण । टिरी पिटोन आक्रंदें ॥ ३ ॥उफराटें शंखस्फुरण । गुद त्राहाटोनि करी रावण ।प्रथम पावला अपमान । पुच्छदहन भलें नव्हे ॥ ४ ॥रावणा विचारी विवेकमार्गी । आम्हीं पुच्छासीं लाविली आगी ।तें हित आम्हांलागीं । वानर सर्वांगीं निःशंक ॥ ५ ॥छळोनि जाळितां
अध्याय 20 हनुमंताचे सीतेला आश्वासन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचा अपमान करून व लंका जाळून मारुती परतला कोट्यानुकोटी वीर मर्दून । लंकाभुवना करोनि दहन ।रावणातें अपमानून । कपि परतोन निघाला ॥ १ ॥ त्यावेळी त्याच्या मनात चाललेले विचार : ...अजून वाचामर्दितां समस्त । सांपडला लंकानाथ ।हनुमान न करी त्याचा घात । श्रीरघुनाथ क्षोभेल ॥ २ ॥रामें वाहिली असे आण । विंधोनियां निजबाण ।रणीं मारीन रावण । असत्य कोण करूं शके ॥ ३ ॥हांती सांपडला लंकानाथ । मारितां क्षोभेल रघुनाथ ।यालागीं न मारीच हनुमंत । जीवें जीत सोडिला ॥ ४ ॥असत्य ठेवोनि स्वामीचे माथां । म्यां मिरवावी वाढिवता ।जळो ते श्लांघ्यता
अध्याय 21 गजेन्द्राचे आख्यान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकादहनाचा परिणाम : श्रीरामभक्तांचे महिमान । अगाध गहन अति पावन ।हनुमंतें केले लंकादहन । ओंतिली संपूर्ण सुवर्णाची॥ १ ॥रामभक्त करिती कंदन । तें कंदन होय सुखसंपन्न ।ऐसें भक्तीचें महिमान । कृपा ...अजून वाचारामाची ॥ २ ॥हनुमंतें जाळिलें लंकेसीं । नव्हे काळी कोळसा मसी ।सुवर्ण ओतिलें चौपासीं । पीतप्रभेसीं शोभत ॥ ३ ॥करितां लंकेचें दहन । लंका ओतिली सुवर्ण ।याचे मूळ मुख्य कारण । गजोपाख्यान अवधारा ॥ ४ ॥ गजेन्द्र उद्धाराचे आख्यान : भगवंताचें कृपाळुपण । नामस्मरणाचें महिमान ।गजेन्द्राचें उद्धरण । प्रसंगें पूर्ण सुवर्णमय लंका ॥ ५ ॥चालतां कथा रामायण । त्यामाजी गजेंद्रोद्धरण
अध्याय 22 गजेन्द्रउद्धार व हनुमंताचे श्रीरामदर्शनार्थ पुनरागमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ ह्रदयीं अंतरात्मा सर्वज्ञ । त्याचेनि बुद्धिंद्रिये सज्ञान ।तेणें काया वाचा मनें नमन । अनन्य शरण गजेंद्र ॥ १ ॥भगवंतासी अनन्य शरण । होतां पालटे देहचिन्ह ।इंद्रियांचे विपरीतज्ञान । ...अजून वाचालक्षण अवधारा ॥ २ ॥अनन्यत्वीं मन उन्मन । चित्त होय चैतन्यघन ।बुद्धि होय समाधान । अहंता संपूर्ण सोहंत्वी विरे ॥ ३ ॥तेव्हां भूतें होती चिदाकार । विषय होती तन्मात्र ।अनन्यशरणत्वाचें सूत्र । संसारचरित्र परब्रह्म ॥ ४ ॥होवावया अनन्य शरण । पाहिजे भाग्य सत्त्वसंपन्न ।तेणें भाग्यें गजेंद्र गहन । करितो नमन भगवंता ॥ ५ ॥ओंकार ब्रह्मरूप पूर्ण । त्यासी प्रकाशी चैतन्यघन
अध्याय 23 सीतेचा शोध करून हनुमंताचे आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकादहन झाल्यावर सीतेची आज्ञा घेऊन मारूती परत येण्यास निघाला : आश्वासोनि श्रीरामकांता । भेटावया श्रीरघुनाथा ।हनुमंत होय निघता । तेचि कथा अवधारा ॥ १ ॥लंकादहन करोनि संपूर्ण । ...अजून वाचाकरितां गमन ।घ्यावया सीतेंचें दर्शन । आला परतोन तीपासीं ॥ २ ॥सीता सर्वांगीं अक्षत । पाहोनियां सावचित्त ।हनुमंत हर्षयुक्त । निघे त्वरित तें ऐका ॥ ३ ॥घ्यावया श्रीरामाची भेटी । हनुमंतासीं त्वरा मोठी ।वंदोनि सीता गोरटी । उठाउठीं निघाला ॥ ४ ॥वेगीं उल्लंघावया सागर । चौफेर अवलोकी वानर ।देखिला अरिष्ट गिरिवर । तेथे सत्वर वळंघला ॥ ५ ॥सकळ असिष्टां आधार
अध्याय 24 वानरांकडून मधुवनाचा विध्वंस ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताने सांगितले की सीतेच्या तेजाने रावण भस्मप्रायच झालेला आहे हनुमंत सांगे वीरांप्रती । सीता तपस्विनी श्रीरामसती ।तिनें राक्षसांची वीर्यशक्ती । नेली भस्मांतीं कोपाग्नीं ॥ १ ॥रावणाची शक्ति तेजोराशी । सीतेनें ...अजून वाचाकेले त्यासी ।राम निमित्त मारावयासी । रावणासी रणरंगीं ॥ २ ॥सीताक्षोभे दशानन । जळोन भस्म जाहला जाण ।पतीस यश दिधलें पूर्ण । रामें रावण मारिला ॥ ३ ॥सीता जाळी श्रीराम मारी । ऐसेनि राक्षसांची बोहरी ।क्षणें होईल लंकेमाझारी । सांगे वानरीं हनुमंत ॥ ४ ॥ ते ऐकून अंगदास स्फुरण चढले व स्वतःचसर्वांचा संहार करून यावे असे तो सुचवितो एकोनि हनुमंताचें
अध्याय 25 श्रीराम – अंगद संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ दक्षिण दिशेला गेलेले वानर कालमर्यादा संपल्यावरही परतले नाहीतम्हणून श्रीरामास चिंता वाटेल तेव्हा हनुमंत आधीच येऊन श्रीरामांना भेटला वानर गेले दक्षिणेसी । मर्यादा लोटली तयांसी ।कोणी नाणिती सीताशुद्धीसी । श्रीरामासीं ...अजून वाचाचिंता ॥ १ ॥मजसीं करूनि एकांत । मुद्रा घेवोनि गेला हनुमंत ।तो कां नयेचि पां त्वरित । अति संचित श्रीराम ॥ २ ॥हनुमंत कार्यकर्ता । मजही हा भरंवसा होता ।तोहि न येचि वाट पाहातां । परम चिंता लागली ॥ ३ ॥ऐसी श्रीरामाची चिंता । कळों सरली त्या हनुमंता ।शुद्धि सांगावया सीता । होय निघता अति शीघ्र ॥ ४ ॥श्रीरामाची परम
अध्याय 26 हनुमंतप्रतापवर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मदेवलिखित हनुमंताचा लंकेतील पराक्रम स्वमुखें निजकीर्ती । सर्वथा न सांगे मारूती ।हें जाणोनि श्रीरघुपती । स्वयें प्रश्नोक्तीं चालवित ॥ १ ॥आदरें पुसें श्रीरामचंद्र । हनुमंता तूं वनचर ।कैसेनि तरलासी सागर । सत्य ...अजून वाचामज सांगें ॥ २ ॥ऐकोनि श्रीरामांचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।श्रीरामप्रतापमहिमान । सनुद्रतरण वानरा ॥ ३ ॥श्रीरामनामाच्या उच्चारें । जड मूढ तरती भवसागर ।राममुद्रांकित वानर । तेणें परपार पावलों ॥ ४ ॥रामनामाचा कडकडाट । भवसमुद्रीं पायवाट ।पायरी करोनि वैकुंठ । होती प्रविष्ठ परब्रह्मीं ॥ ५ ॥जे रामनामांकित नर । त्यांतें बुडवूं न शके सागर ।श्रीराममुद्रांकित वानर । परपार पावलों
अध्याय 27 हनुमंतपराक्रमवर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मदेवाने लिहिलेल्या पत्राचे वाचन धन्य धन्य तें ब्रह्मलिखित । धन्य धन्य आणिता हनुमंत ।सौमित्र वाची सावचित्त । अर्थें रघुनाथ सुखावे ॥ १ ॥सौमित्र वाची ब्रह्मलिक्जित । ऐकतां पत्रिकेचा अर्थ ।श्रीराम स्वानंदे डुल्लत ...अजून वाचाहनुमंतचरित्र परिसोनी ॥ २ ॥शुद्धि न लभे सीता सती । कळी लाविली लंकेप्रती ।सभा नागविली रात्रीं । हनुमंत ख्याती तें ऐका ॥ ३ ॥हनुमंताचें आचारित । अचळ समूळ समस्त ।ब्रह्मयानें लिहिलें ब्रह्मलिखित । सावचित्त अवधारा ॥ ४ ॥ गुप्त राहून हनुमंताने नगराता केलेला हलकल्लोळ गुप्त राहोनि नगरद्वारीं । वानरचेष्टा नानापरी ।कलहो लाविला निशाचरीं । कपिकुसरी ते ऐका ॥ ५ ॥पुच्छीं
अध्याय 28 ब्रह्मलिखित सीता-मारूती संवादकथन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पुढील वृत्तांत वाचन मागील प्रसंग संपतां । अंगदसुग्रीवजांबवंतां ।लक्ष्मणेंसीं श्रीरघुनाथा । घेवोनि उडतां हनुमंत ॥ १ ॥हनुमंताची परम कीर्ती । गगनीं सुरवर वानिती ।भूतळीं वाखाणिती जुत्पती । वानीं कपिकिर्तीं श्रीराम ...अजून वाचा२ ॥आवडीं म्हणे श्रीरघुनाथ । सौमित्रां वाचीं ब्रह्मलिखित ।मुद्रिका देवोनि हनुमंत । करी एकांत सीतेसीं ॥ ३ ॥धन्य ब्रह्मयाचें ब्रह्मपत्र । धन्य श्रवणार्थी श्रीरामचंद्र ।धन्य वाचक सौमित्र । धन्य कपींद्र कपिकुळीं ॥ ४ ॥ श्रीराममुद्रेमुळे झालेली सीतेची अवस्था मुद्रिकातेजदेदीप्यता । श्रीराम आला मानी सीता ।तेणें होवोनि सलज्जता । सप्रेमता घाबरी ॥ ५ ॥सावधान पाहतां देखा । पुढें देखे आंगोळिका ।जाणोनि
अध्याय 29 हनुमंतप्रतापाचे ब्रह्मलिखित वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताने केलेले श्रीरामलक्ष्मण वर्णन सीता पुसे श्रीरामज्ञान । ते सांगावया हनुमान जाण ।गिळोनियां ज्ञानाज्ञान । जाला सावधान श्रीरामें ॥ १ ॥सीतेनें पुसिली श्रीरामकथा । तेचि सांगावया स्वरूपता ।उल्हास हनुमंताचे चित्ता ...अजून वाचायथार्थता सांगत ॥ २ ॥लक्ष्मणाचें निजलक्षण । ठाणमाण सगुणगुण ।समूळ सांगेल आपण । सावधान अवधारा ॥ ३ ॥सादर श्रवणार्थी स्वयें सीता । तेणें आल्हाद हनुमंता ।सावधान मिळाल्या श्रोता । वदे वक्ता आल्हादें ॥ ४ ॥श्रीरामरूप अति स्वरूप । रूपें जिंतला कंदर्प ।परी तो रूपेंचि अरूप । चित्स्वरूप श्रीराम ॥ ५ ॥राम राजीवलोचन । जगाचे नयना सादृश्य तें नयन ।परी देखणा
अध्याय 30 असाळीवधाचे वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेच्या आज्ञेला प्रमाण मानून त्याप्रमाणे वर्तन हनुमंताचें युद्धकंदन । मुख्यत्वें वनविध्वंसन ।घेवोनि सीतेचें आज्ञापन । फळभोजन मांडिलें ॥ १ ॥जोंवरी होय क्षुधाहरण । पडलीं फळें खाय वेंचोन ।घातली श्रीरामाची आण । ...अजून वाचातोडोन न खावीं ॥ २ ॥जानकीआज्ञा वंदोनि शिरीं । वनाची करावया बोहरी ।हनुमान जाऊनियां दूरी । फळाहारीं बैसला ॥ ३ ॥काळाग्नि आव्हाहूनि जठरीं । मग बैसला फळाहारी ।वना आली महामारीं । वन संहारीं कपिपुच्छ ॥ ४ ॥सीतेची आज्ञा प्रमाण । घातली श्रीरामाची आण ।पुच्छें वृक्ष उपडोन । तळीं झाडोन फळें खाय ॥ ५ ॥पहिलें साकरेंचें टेंक । सव्यें सेवी पित्तशामक
अध्याय 31 इंद्रजिताचा अपमान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण पुढील वर्णन वाचतो इंद्रजित युद्धा निघतां आवेशीं । असाळी उठिली विवशी ।श्रीरामें निरसिलें तियेसी । अति उल्हासीं हनुमंत ॥ १ ॥गजदळेंसीं अति उन्नद्ध । सैन्य देखोनियां सन्नद्ध ।हनुमंतासी अति आल्हाद ...अजून वाचाश्रीराम गोविंद तुष्टला ॥ २ ॥राक्षस मारावया अति अद्भुत । वनउपाडा पाहे सुमूहूर्त ।इंद्रजित गांजोनियां तेथ । गर्वहत करीन मी ॥ ३ ॥माझें पुरावावया मनोरथ । आजि तुष्टला श्रीरघुनाथ ।इंद्रजित आला सैन्यासमवेत । हनुमान नाचत स्वानंदें ॥ ४ ॥पुच्छ नाचतें पैं रणीं । मारोनियां वीरश्रेणी ।पूजूं चामुंडा चवंडायणी । भूतां देऊं धणीं मांसाचीं ॥ ५ ॥अखया कुमराची बोहणी । प्रथम
अध्याय 32 हनुमंताकडून रावणाचे गर्वहरण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाकडून पुढील वर्णनाचे वाचन श्रीराम होवोनि सावचित । लक्ष्मणासीं स्वयें सांगत ।पुढारां वाचीं ब्रह्मलिखित । अनुचरित कपीचें ॥ १ ॥राक्षसदांतांचिया रासी । पाडोनि केलिया रणभूमीसीं ।पुढें काय केलें लंकेसीं । ...अजून वाचामजपासी परिसवीं ॥ २ ॥ऐकोनि श्रीरामाची गोष्टी । सुग्रीवासी आल्हाद पोटीं ।हर्षल्या वानरांच्या कोटी । कथाकसवटी ऐकावया ॥ ३ ॥वानरांच्या निजकोडी । सभा बैसली परवडी ।हनुमंताची प्रतापप्रौढी । अति आवडीं ऐकावया ॥ ४ ॥हनुमंताची प्रतापकीर्ती । वाचितां लक्ष्मणा परम प्रीती ।अनुलक्षोनि श्रीराममूर्ती । पत्र प्रयुक्ती वाचित ॥ ५ ॥ इंद्रजिताचा पाडाव करून हनुमंत आपली शेपटी आवरून बसला झाडोनि इंद्रजिताचा पादाडा
अध्याय 33 हनुमंतप्रतापवर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणासमोर मारुती पुच्छासन मांडून बसतो त्यामुळे रावण भयभीत होतो रावणसिंहासनासमान । घालोनियां पुच्छासन ।हनुमान बैसला सावधान । दशानन लक्षोनी ॥ १ ॥जैसा सिंहापुढें गजाचा दर्प । कीं गरूडापुढें कांपती सर्प ।तैसा देखोनि ...अजून वाचा। महाकंप रावणा ॥ २ ॥ बिभीषण व इंद्रजित रावणास सूचना करितात जंव रावण देखे भयभीत । तंव बिभीषण इंद्रजित संयुक्त ।लंकेशासी बुद्धि सांगत । कीं अवध्य हनुमंत सर्वथा ॥ ३ ॥मारूं जातां हनुमंतासी । तेणें गांजिलें महावीरांसी ।पुच्छें निर्दळिलें सैन्यासी । तो कपि कोणासी नाटोपे ॥ ४ ॥तरी बुझवावया हनुमंता । श्रीरामा अर्पावी सीता ।आणि शरण रिघालिया रघुनाथा ।
अध्याय 34 श्रीरामांचे समुद्रतीरावर आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकेतील हनुमंताच्या विक्रमाचे सिंहावलोकन ब्रह्मा म्हणे ब्रह्मलिखितीं । कपीची लिहिली अल्पकीर्ती ।त्याहून अगाध हनुमंताची ख्याती । किर्ती किती लिहावी ॥ १ ॥श्रीरामा तुझें हें वानर । लंके आलें पालेखाइर ।त्याची ...अजून वाचाअति दुर्धर । मज साचार लिहवेना ॥ २ ॥अठरा लक्ष दीपिका पूर्ण । कपीनें पुच्छें विझवोन ।रावणसभा करोनि नग्न । दशानन गांजिला ॥ ३ ॥रिघोन रावण शयनस्थाना । परिसोनि मंदोदरीचें स्वप्ना ।सीता शुद्धी आणी मना । अशोकवना कपि आला ॥ ४ ॥देवोनियां श्रीराममुद्रा । सुखी करोनि सीता सुंदरा ।गांजावया राक्षसेंद्रा । केला तरूवरा नवभंग ॥ ५ ॥मारिलें वनकरां किंकरां ।
अध्याय 35 बिभीषणाकडून रावण व प्रधानांची निर्भर्त्सना ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम व वानरसैन्य समुद्रतीरावर आले श्रीराम जगदानंदकंद । श्रीराम सच्चिदानंद ।श्रीरघुपति नित्यशुद्ध । नाहीं भवबंध स्मरणें तुझ्या ॥ १ ॥वानरसेनासंभार । पावोनियां समुद्रतीर ।कटक उतरलें समग्र । श्रीरामचंद्रासमवेत ...अजून वाचा२ ॥ रावणमाता कैकसीची चिंता : येरीकडेलंकेआंत । नगर जाळोनि गेला हनुमंत ।तेणें कैकसीस आकांत । राक्षसां अंत दृढ आला ॥ ३ ॥कैकसी रावणाची जननी । लंकागडदाहो देखोनि ।परम दुःखित होय मनीं । स्त्रवतीं नयनीं अश्रुधारा ॥ ४ ॥ कैकसी बिभीषणाकडे जाऊन रावणाचीअपकृत्ये व त्याचे घोर परिणाम त्याला सांगते येवोनियां बिभीषणापासीं । निजदुःख सांगें त्यासी ।मरण आलें रावणासी । राक्षसांसी
अध्याय 36 रावणाकडून बिभीषणाचा अपमान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणकृत हनुमंतप्रतापवर्णनाने सर्व सभा लज्जायमान : कपिपुरूषार्थ अति प्रचंड । राक्षसांचें बळबंड ।प्रताप ऐकतां काळें तोंड । लज्जा वितंड लंकेशा ॥ १ ॥हनुमंताचें अति प्रबळ । बिभीषणें वानिलें बळ ।तेणें ...अजून वाचासकळ । तळमळ पैं करिती ॥ २ ॥राक्षस सेनानी प्रधान । अवघे जाले हीन दीन ।सभा समस्त लज्जायमान । म्लानवदन दशमुख ॥ ३ ॥हें देखोनि इंद्रजित । कोपें जालासें कृतांत ।बिभीषणासीं बोलत । निजपुरूषार्थ वर्णोनी ॥ ४ ॥ इंद्रजिताचा संताप, स्वपराक्रम प्रौढी व बिभीषणाची निंदा : इंद्रजित बोले कोपायमान । काकाजी तूं तंव धर्मसंपन्न ।बुद्धियुक्तिप्रज्ञानपन्न । कनिष्ठ वचन कां वदसी
अध्याय 37 बिभीषणाचे श्रीरामांकडे आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ त्यानंतर काही न बोलतां शांतपणे बिभीषण प्रधानांसह तेथून परतला : बिभीषणासी अपमान । जालिया नव्हे क्रोधायमान ।स्वयें श्रीराम स्मरोन । सावधान बैसला ॥ १ ॥कांही न बोलोनि उपपत्ती । विचारोनि ...अजून वाचा।शरण जावें श्रीरघुपती । निश्चयो चित्तीं दृढ केला ॥ २ ॥ बिभीषणाचे विचार : चौघे घेवोनि प्रधान । स्वयें निघाला बिभीषण ।रावणासी मधुर वचन । काय आपण बोलत ॥ ३ ॥आम्ही तुम्ही सखे बंधु । अणुमात्र नाहीं विरोधु ।सांगतां तुजला हितानुवादु । वृथा क्रोधूं तुवां केला ॥ ४ ॥निंदोनियां लंकानाथा । श्रीरामा वाणिलें स्वपक्षार्था ।तरी मी जाईन अधःपाता । जाण
अध्याय 38 बिभीषणाला लंकाप्रदान व राज्याभिषेक ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मारूतीच्या वचनाने श्रीरामांचा संतोष : बिभीषणाचा वृत्तांत । समूळ सांगे हनुमंत ।तेणें तुष्टला श्रीरघुनाथ । उल्लासत स्वानंदे ॥ १ ॥ऐकोनि हनुमंताचें वचन । संतोषला रघुनंदन ।सुग्रीवादि वानरगण । त्यांप्रति ...अजून वाचाधर्म सांगे ॥ २ ॥सद्भावेंसीं संपूर्ण । अथवा कपटें आलिया शरण ।त्यासीं नाहीं सर्वथा मरण । सत्य भाषण हें माझें ॥ ३ ॥ शरणागताला केव्हांही अभयच, रावण जरी आला तरीही त्याला अभय मिळेल : माझा करावया घात । शरण आलिया लंकानाथ ।त्यासीही माझा अभयहस्त । जाणा निश्चित कपि सर्व ॥ ४ ॥शरणागतापासाव मरण । आम्हांसी सर्वथा नाहीं जाण ।हेंही माझें
अध्याय 39 सागराची श्रीरामांना शरणागती ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणास लंकादान दिल्यावर सर्वांना परमानंद : बिभीषणासी लंकादान । देवोनियां श्रीरघुनंदन ।सभा बैसली सावधान । सुप्रसन्न स्वानंदें ॥ १ ॥वानर करिती गदारोळ । बिभीषणासी सुखकल्लोळ ।सुग्रीवा उल्लास प्रबळ । सकळ ...अजून वाचादेखोनि ॥ २ ॥वानरांचे महाभार । करूं येती नमस्कार ।श्रीरामनामाचा गजर । देती भुभुःकार आल्हादें ॥ ३ ॥ हनुमान व सुग्रीव समुद्र पार करण्याच्या विचारात : तेथें येवोनि हनुमंत । सुग्रीवासी करी एकांत ।सीता सोडावयाचा मुख्यार्थ । लंकानाथ वधावया ॥ ४ ॥समुद्राचिये तीरीं । बैसल्या वानरांच्या हारी ।कैसेनि जाववेल पैलपारीं । ते विचारीं कपिनाथ ॥ ५ ॥नद्द्या पर्जन्यें भरोनि येति
अध्याय 40 सेतुबंधनाची पूर्णता ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ समुद्र निघून गेल्यावर सेतू बांधण्याची तयारी; वानरांना तसा आदेश : नळहस्तें सेतुबंधन । समुद्रें श्रीरामासी सांगोन ।वंदोनियां श्रीरामचरण । आज्ञा पुसोन स्वयें गेला ॥ १ ॥ऐकोनि समुद्राचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ...अजून वाचासंमुख आपण । प्रीतिवचन बोलत ॥ २ ॥प्रीतिप्रेमाचें वचन । नळासी बोले रघुनंदन ।सखा माझा तूं जीवप्राण । सेतु निर्माण करी आतां ॥ ३ ॥समुद्रें सांगितलें आपण । तुझेनि हातें सेतुबंधन ।घेवोनियां वानरगण । सेतु निर्माण करी आतां ॥ ४ ॥स्वयेंची श्रीरघुनाथ । स्वमुखें सुग्रीवासी सांगत ।प्रधान जुत्पती समस्त । मुख्य हनुमंत आदिकरोनी ॥ ५ ॥नळहस्तें सेतुबंधन । समुद्रें सांगितले
अध्याय 41 रामसैन्याचे समुद्रोल्लंघन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सेतू बांधून पूर्ण झाल्यावर श्रीराम लक्ष्मणाला घेऊन लंकेच्या वाटेला लागतात : नळें बांधिला सेतु समाप्त । यालागीं म्हणती नळसेत ।परी तो श्रीरामपुरूषार्थ । जाला विख्यात तिहीं लोकीं ॥ १ ॥सेतु जालिया ...अजून वाचा। सुग्रीव संतोषें डुल्लत ।वंदोनियां श्रीरघुनाथ । स्वयें बोलत स्वानंदें ॥ २ ॥समुद्रीं लाभली पायवाट । आमचे चुकले परम कष्ट ।आता लंका करीन सपाट । दशकंठ वधोनि ॥ ३ ॥प्रधान सेनानी सपरिवार । राक्षसांचे भार संभार ।रणीं मारीन दुर्धर वीर । तरी किंकर मी तुझा ॥ ४ ॥सेतु होतांचि समाप्त । लंका जाली हताहत ।रणीं निमेल लंकानाथ । संदेह येथ
अध्याय 42 अतिकायाकडून रावणाची कानउघाडणी ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ आला ऐकोनि रघुनंदन । भयें भयभीत दशानन ।प्रधान सेना अति उव्दिग्न । लंकाजन सकंपित ॥ १ ॥चाकाटला रावण । तंव भेरी लावोनि निशाण ।स्वयें आला रघुनंदन । वानरसैन्यसंभारीं ॥ २ ...अजून वाचालंकेत सर्वत्र हाहाकार व रावणावर दोषारोप : शंख भेरी टाळ घोळ । काहळा वाजती चिनकाहळ ।ढोळ पटह मांदळ । ध्वनि आगला बुरूंगें ॥ ३ ॥धडैधडै विख्यात वाही । निशाणां लागली एक घाई ।विराणीं वाजती दोहीं बाहीं । गिडबिड ठायीं गर्जती ॥ ४ ॥ऐसा वाजंत्रांचा गजर । घेवोनि कपिकुळसंभार ।लंके आला श्रीरघुवीर । केला भुभुःकार वानरीं ॥ ५ ॥देखोनि श्रीरामाचा यावा
युद्धकांड अध्याय 1 वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ उदार गंभीर सुंद्रकांड । तें संपवूनि अतिशयें गोड ।पुढां उठावलें युद्धकांड । अति प्रचंड प्रतापी ॥ १ ॥ रामायणाचे महत्व त्यातील परमार्थ : वाखाणावया युद्धकांड । माझें ...अजून वाचासरतें तोंड ।तरी जनार्दनकृपा अखंड । जे कांडे कांड अर्थवी ॥ २ ॥रामायणींचा सखोल अर्थ । वक्ता जनार्दन समर्थ ।सबाह्य परिपूर्ण रघुनाथ । ग्रंथ परमार्थ श्रीराम ॥ ३ ॥रामायणींचें निजसार । क्षरीं कोंदलें अक्षर ।पदापदार्थ चिदमिन्मात्र । परम पवित्र रामकथा ॥ ४ ॥कथेजाजील कथार्थ । सबाह्य कोंदला रघुनाथ ।हाचि ग्रंथींचा परमार्थ । निजात्मस्वार्थ साधका ॥ ५ ॥ एकनाथांचे आत्मनिवेदन –
अध्याय 2 श्रीरामांकडून रावण छत्राचा भंग ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ शार्दूळ परत येतो, त्याची बिकट अवस्था व त्याचे कथन : पूर्वप्रसंगवृत्तांत । रडत पडत कुंथत ।शार्दूळ आला रुधिरोक्षित । तयासी पुसत लंकेश ॥ १ ॥ वीक्ष्यमाणो विषण्णं तु शार्दूलं ...अजून वाचा।उवाच प्रहसन्नेव रावणो भीमदर्शनः ॥१॥अयथावच्च ते वर्णो दीनश्चासि निशाचर ।नासि कश्चिदमित्राणां क्रुद्धानां वशमागतः ॥२॥इति तेनानुष्टस्तु वाचं मंदमुदीरयत् ।न ते चारयितुं शक्या राजन्वानरपुंगवाः ॥३॥नापि संभावितुं शक्यं संप्रश्र्नोपि न लभ्यते ॥४॥ शार्दूळ देखोनि अति दुःखीत । त्यासी पुसे लंकानाथ ।वैरिसासी जालासी हस्तगत । रुधिरोक्षित दिसतोसी ॥ २ ॥सादरें पुसतां रावण । शार्दूळ बोले अति कुंथोन ।असंख्यात वानरांचें सैन्य । संख्या कोण करुं
अध्याय 3 रामांच्या मायवी शिराने सीतेचा छळ ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रारंभी झालेल्या अपशकुनाने रावण उद्विग्न : साधावया रणांगण । मुळींच रावणा अपशकुन ।श्रीरामें केलें छत्रभंजन । अति उद्विग्न लंकेश ॥ १ ॥ विसर्जयित्वा सचिवान्प्रविवेश स्वामालयम् ।ततो राक्षसमादाय विद्युज्जिव्हं ...अजून वाचा॥१॥मायाविनं महाघोरमब्रवीद्राक्षसाधिपः ।मोहयिष्यामहे सीतां मायया जनकात्मजाम् ॥२॥शिरो मायामयं गृह्य राघवस्य निशाचर ।मां त्वं समुपतिष्ठस्व महच्च सशरं धनुः ॥३॥एवमुक्तस्तथेत्याह विद्युज्जिह्वो निशाचरः ।तस्य तुष्टोऽभवद्राजा प्रददौ चास्य भूषणम् ॥४॥ छत्रभंगाचा अपशकुन । तेणें उद्विग्न रावण ।विसर्जूनियां प्रधान । आला आपण निजधामा ॥ २ ॥सबळ बळें श्रीरघुनाथा । वानरसैन्य असंख्यातता ।काय म्यां करावें आतां । प्रबळ चिंता लंकेशा ॥ ३ ॥ रावणाचे विचार :
अध्याय 4 राक्षस – वानरांचे युद्ध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लगबगीने रावण सभेत येतो; त्याची बिकट अवस्था : प्रबळ बळें रघुनंदन । आला ऐकोनि रावण ।अतिशयें चितानिमग्न । म्लानवदन सभेसी ॥ १ ॥ तेन शंखविमिश्रेण भेरीशब्देन रावणः ।मुहूर्तं ध्यानमास्थाय ...अजून वाचा॥१॥ततस्तु सुमहाप्राज्ञो माल्यवान्नाम राक्षसः ।उवाच रावणं मंत्री कृतबुद्धिर्बहुश्रुतः ॥२॥तन्मह्यं रोचते संधिः सह रामेण रावण ।यदर्थमभियुक्तोसि सीता तस्मै प्रदीयताम् ॥३॥तस्य देवर्षयः सर्वे गंधर्वाश्च जयैषिणः ।विरोधं मा गमस्तेन रामेणाभिततेजसा ॥४॥ सभे संचित दशानन । तंव शंख भेरी ढोल निशाण ।श्रीरामकटकीं त्राहाटिले पूर्ण । तेणें रावण गजबजिला ॥ २ ॥ऐकोनि वाजंत्रांचा गजर । त्यामाजी वानरांचा भुभुःकार ।तेणें दचकला दशशिर । मुहूर्तमात्र तटस्थ ॥
अध्याय 5 रावण – सुग्रीव यांचे युद्ध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सुवेळेवरुन सुग्रीव लंकेत उडून गेला : सुवेळे बैसल्या रघुकुळटिळका । मनोहर दिसताहे लंका ।संमुख देखोनि दशमुखा । केला आवांका सुग्रीवें ॥ १ ॥ ततो रामः सुवेलाग्रं योजनद्वयमंडलम् ।आरुरोह ...अजून वाचाहरियूथैः समन्वितः ॥१॥ददर्श लंका सुव्यक्तां रम्यकाननशोभिताम् ।तस्यां गोपुरशृंगस्थं राक्षसेंद्रं दुरासदम् ॥२॥श्वेतचामरपर्यस्तं विजयच्छत्रशोभितम् ।पश्यतां वानरेंद्राणां राघवस्थापि पश्यतः ॥३॥दर्शनादाक्षसेंद्रस्य सुग्रीवः सहसोत्थितः ।अचलाग्रादथोत्थाय पुष्लुवे गोपुरस्थले ॥४॥ श्रीराम चढला सुवेळेवरी । सहित सुग्रीव कपिसंभारीं ।दोनी योजनें सुवेळाग्री । सभा वानरीं शोभत ॥ २ ॥तंव देखिलें लंकानगर । वनीं काननीं अति सुंदर ।त्यामाजी रावणाचें गोपुर । दीर्घ मनोहर रमणीय ॥ ३ ॥श्रीरामसेना वानरसंभार । आले
अध्याय 6 शिष्टाईसाठी अंगदाचे जाणे ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रक्ताचे पाट पाहून श्रीरामांचा कळवळा : पूर्वप्रसंगीं रणांगणीं । वानरीं मारिल्या वीरश्रेणी ।रुधिर प्रवाह देखोनि धरणीं । श्रीराम मनीं कळवळला ॥ १ ॥ सर्व बंदोबस्त करुन नंतर पुढील योजनेचा बेत ...अजून वाचाकृपा उपजली रघुनाथा । एकाचिया अपकारता ।करुं नये सकळांच्या घाता । राजधर्मता हे नव्हे ॥ २ ॥सुग्रीवराजा आणि जांबवंत । अंगदादि वानर समस्त ।नळनीळादि हनुमंत । शरणागत बिभिषण ॥ ३ ॥ राघवः सन्निवेश्यैवं स्वसैन्यं रक्षसां वधे ।संमंत्र्य मंत्रिभिः सार्धं निश्चित्य च पुनःपुनः ॥१॥आनंतर्यमभिप्रेप्सुः क्रमयोगार्थतत्ववित् ।बिभीषणस्यानुमते राजधर्मनुस्मरन् ॥२॥ दुर्गपरिधी द्वाबंध । करावया राक्षसांचा वध ।सैन्य ठेविलें सन्नद्ध । वीर विविध आतुर्बळी
अध्याय 7 अंगदाकडून रावणाची निंदा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ अंगदाचे रावणाच्या सभेत उड्डाण : अंगद आकाशमार्गेंसीं । शीघ्र आला तो लंकेसीं ।प्रवेशला रावणसभेसीं । अति विन्यासीं ते ऐका ॥ १ ॥ सोऽभिपत्य मुहूर्तेन श्रीमद्रावणमंदिरम् ।ददर्शासीनमव्यग्रं रावणं सचिवैःसह ॥१॥ततस्तस्याविदूरेण निपत्य ...अजून वाचा॥२॥ सभासद व रावणावर त्याचा परिणामः रावणसभेपुढें जाण । आलें अंगदाचें उड्डाण ।तेणें दचकला दशानन । कंपायमान भयभीत ॥ २ ॥पडतां अंगदाची उडी । लंका अत्यंत हडबडी ।दडाल्या वीरांचिया कोडी । जालीं बापुडीं राक्षसें ॥ ३ ॥कराव्या अवघ्यांचा घात । पुढतीं आला रें हनुमंत ।ऐसा वळसा लंकेआंत । अति आकांत राक्षसां ॥ ४ ॥कपिभयें भयभीत । रावणसभा पैं समस्त ।जैसें
अध्याय 8 अंगद – शिष्टाई वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची दुर्दशा : मागिले प्रसंगीं जाण । वामनें गांजिला रावण ।तिज्या रावणाचें प्रकरण । सांगें आपण अंगद ॥ १ ॥पूर्वप्रसंगीं स्वभावतां । जाली दों रावणांची कथा ।तिज्या रावणाची प्रौढता ...अजून वाचाऐक तत्वता लंकेशा ॥ २ ॥परिसतां अंगदवचन । रावणा हृदयीं खोंचती बाण ।कांही न चले आंगवण । ऐके आपण कुसमुसित ॥ ३ ॥ श्वेतद्विपातील फाजिती : एक रावण मूर्खावेशीं । स्वयें निधाला श्वेतद्वपासी ।तेथें गति न चले विमानासीं । सेवकांसीं अगम्य ॥ ४ ॥मागे सांडोनि विमान । राहवोनियां सेवकजन ।एकला निघे रावण । मूर्खाभिमान । आक्रोशीं ॥ ५ ॥श्वेतद्विपीचें राज्य
अध्याय 9 द्वंद्वंयुद्ध वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणाला अंगदाने आणलेल्या मुकुटाचे अर्पण : सभेंत गांजूनि रावणातें । अंगदे आणिल्या मुकुटातें ।श्रीरामें आपुल्या निजहातें । बिभीषणातें वाहिला ॥ १ ॥मुकुट बाणतां बिभीषणासीं । देखोनि उल्लास वानरांसी ।राजशोभा शोभली त्यासीं ...अजून वाचाश्रीरामासीं आल्हाद ॥ २ ॥ ददृशुर्वानरा वीरा भीषणं च बिभीषणम् ।मुकुटेन प्रभासंतं त्रिकूटमिव मंदरम् ॥१॥रामस्तु बहुभिर्हृष्टैर्विनदद्भिः प्लवंगमैः ।वृतो रिपुवधाकाक्षी युद्धायैव प्रवर्तत ॥२॥ मुकुट बाणतां बिभीषणासीं । कैसी शोभा आली त्यासी ।जेंवी मंदराद्रि रत्नशिखरेंसीं । शोभा तैसी बिभिषणा ॥ ३ ॥मस्तकीं बाणतांचि मुकुट । जैसा जाला राज्यपट ।तैसा दिसताहे तेजिष्ठ । अति वरिष्ठ बिभीषण ॥ ४ ॥बिभीषण आज्ञेचें भय भारी ।
अध्याय 10 इंद्रजिताला मांत्रिक रथाची प्राप्ती ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ युद्ध चालू असता रात्र झाली : रणीं करितां द्वंद्वयुद्ध । इंद्रजित गांगिला सुबद्ध ।त्याचे पोटीं अति विरुद्ध । रात्रीं शरबंध करावया ॥ १ ॥प्रथम गांजिलें हनुमंते । तें बहु ...अजून वाचाइंद्रजितातें ।अंगदें गांजितां येथें । अति लज्जेतें पावला ॥ २ ॥अपमानाचें अति विरुद्ध । रामलक्ष्मणादि वीर विविध ।रणीं करावया शरबंध । रात्रीं युद्ध मांडिलें ॥ ३ ॥ युद्ध्यतामेव तेषां तु तदा वानररक्षसाम् ।रविरस्तंगतो रात्रिः प्रवृत्ता प्राणहारिणी ॥१॥अन्योन्यं बद्धवैराणां घोराणां जयमिच्छताम् ।संग्रवृत्तं निशायुद्धं तदा वानररक्षसाम् ॥२॥राक्षसोऽसीति हरयो वानरोऽसीति राक्षसाः ।अन्योन्यं समरे जघ्नुस्तस्मिंस्तमसि दारुणे ॥३॥हत दास्य चैहीति कथं विद्रवसीति च ।एवं सुतुमुलः
अध्याय 11 इंद्रजिताकडून श्रीरामांना शरबंधन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताचा मांत्रिक रथ अग्नीतून बाहेर आल्यवर रणामध्ये आगमन : पूर्वप्रसंगी इंद्रजित वीर । होम करुनी अभिचार ।शस्त्रें पावला रहंवर । तेणें तो दुर्धर खवळला ॥ १ ॥अभंग रथ अश्व अमर ...अजून वाचारथीं दिव्यास्त्रसंभार ।ऐसा पावोनि रहंवर । रणीं जावया निघाला ॥ २ ॥बैसोनि तया रथावरी । अदृश्य इंद्रजित गगनांतरीं ।येतां रणभूमीवरी । देख जुंझारी नरवानर ॥ ३ ॥ स ददर्श महावीर्यस्तावुभौ रामलक्ष्मणौ ।क्षिपंतौ शर जालानि कपिमध्ये व्यवस्थितौ ॥१॥स तु वैहायसं प्राप्य रथं तौ रामलक्ष्मणौ ।आचचक्ष रणे तस्मिन्विव्याध निशितैः शरैः ॥२॥तौ तस्य शरवेगेन पतितौ भ्रातरावुभौ ।गृहित्वा धनुशी व्योम्नि घोरान्मुमुचतुः शरान् ॥३॥ देखिले
अध्याय 12 सीतेला श्रीरामांचे दर्शन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामलक्ष्मणांना शरबंदी पडलेले पाहून इंद्रजिताची वल्गना : शरबंधनीं बांधोनि रघुनाथ । इंद्रजित अतिशयें श्लाघत ।तेचि अर्थींचा श्लोकार्थ । स्वयें वदत तें ऐका ॥ १ ॥ इन्द्रजित्वात्मनः कर्म तौ शयानौ निरिक्ष्य ...अजून वाचा।उवाच परमप्रीतो हर्षयन्सर्वनैर्ऋतान् ॥१॥दूषणस्य च हन्तारौ खारस्य च महाबलौ ।सादितौ मामकैर्बाणैर्भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥२॥नैतौ मोक्षयितुं शक्यो चैतस्मादिषुबन्धानात् ।सर्वैरपि समागम्य सर्पसंघैः सुरासुरैः ॥३॥यत्कृते चिन्तयानस्य शोकार्तस्य पितुर्मम ।अयं मूलमनर्थस्य सर्वेषां निहतो मया ॥४॥ शरबंधीं राम लक्ष्मण । दिर्घशयन अचेतन ।पडिले देखोनि दोघे जण । इंद्रजितें आपण वाल्गिजे ॥ २ ॥जिहीं मारिले खर दुषण । त्रिशिर्याचा घेतला प्राण ।चौदा सहस्र राक्षसगण । विंधोनि बाण
अध्याय 13 श्रीरामांची शरबंधनातून मुक्तता ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता अशोकवनात परत्ल्यावर श्रीराम शरबंधानातून शुद्धीवरआले व लक्ष्मणाची अचेतन स्थिती पाहून विलाप करु लागले : सीता नेलिया अशोकवना । मागें शरबंधीं रघुनंदना ।पावोनि लब्धचेतना । आपअपणा अवलोकी ॥ १ ॥ ...अजून वाचादीर्घेण कालेन संज्ञां लेभे नरोत्तमः ।प्रत्यवेक्षत मात्मानं शोणितेन परिप्लुतम् ॥१॥अदीनो दीनया वाचा रामः परमसत्ववान् ।अभ्यभाषत दीनात्मा हरिभिः परिवारितः ॥२॥लक्ष्मणं पतितं दृष्ट्वा दुःखशोकसमान्वितः ।विललाप ततो रामो मंदभश्रूण्यवर्जयन् ॥३॥किं नु मे सीतया कार्यं लब्धया जीवितेन वा।शयानं योऽद्य पश्यामि लक्ष्मणं शुभलक्षणम्॥४॥यत्र क्वचिल्लभेद्भार्यां पुत्रान्मित्रांश्च बांधवान् ।न लक्ष्मणसमो भ्राता सचिवः सांपरायिकः ॥५॥ शरबंधनीं रघुनंदन । स्वयें होवोनि सावधान ।निजांगीं खडतरले बाण । रुधिरें क्लिन्न भूमिशायी
अध्याय 14 धूम्राक्षाचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सर्पशरबंधातून सावध झाल्यावर श्रीरामाचे सैनिकांना आलिंगन : सर्पशरबंधापासून । सुटले राम लक्ष्मण ।दोघीं सज्जिलें धनुष्यबाण । ठाणमाणसाटोपें ॥ १ ॥सावध होवोनि रघुनाथ । सुग्रीव अंगद जांबवंत ।बिभीषण हनुमंत । कपि समस्त ...अजून वाचा॥ २ ॥एक एक वानरवीर । स्वयें आलिंगी रामचंद्र ।वानरीं केला भुभुःकार । जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥ वानरसैन्याच्या रामनामाच्या गजराने रावाण भयभीत, दूतांकरवी शोध आणतो : रामनामाचा गजर । वानरीं केला अति सधर ।नामें दुमदुमिलें अंबर । दशशिर दचकला ॥ ४ ॥ तेषां तु तुमुलं शब्दं वानराणां तरस्विनाम् ।नर्दतां राक्षसैः सार्द्धं तदा शुश्राव रावणः ॥१॥उवाच रक्षसां श्रेष्ठः समीपपरिवर्तिनः ।ज्ञायतां
अध्याय 15 अकंपन व वज्रदंष्ट्र यांचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ धूम्राक्षं निहतं श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।क्रोधेन महताविष्टो निःश्वसन्नुरगो यथा ॥१॥दीर्घमुष्णं च निःश्वस्य क्रोधेन कलुषीकृतः ।अब्रवीद्राक्षसं क्रूरं वज्रदंष्ट्रं महाबलम् ॥२॥गच्छ त्वं वीर निर्याहि राक्षसैः परिवारितः ।जहि दाशरर्थि रामं सुग्रीवं ...अजून वाचासह ॥३॥तथे त्युक्त्वा द्रुततरं मायावी राक्षसेश्वरः ।निर्जगाम बलैः सार्धं बहुभिः परिवारितः ॥४॥ धूम्राक्ष राक्षस बळवंत । त्याचा हनुंमतें केला घात ।तें ऐकोनि लंकानाथ । क्रोधान्वित अति दुःखें ॥ १ ॥धूम्राक्षाचें युद्धमरण । ऐकोनि स्वयें रावण ।सर्पप्राय फुंपावे पूर्ण । क्रोधें प्राण त्यजूं पाहे ॥ २ ॥ रावणाने वज्रदंष्ट्रास पाठविले : धीर वीर महाशूर । वज्रदंष्ट्र निशाचर ।त्यासी सांगे दशशिर ।
अध्याय 16 प्रहस्ताचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वील प्रसंगीं हनुमंतें । रणीं मारिलें अकंपनातें ।ऐकोनियां लंकानाथें । क्रोधान्वित उद्वेगी ॥ १ ॥ ततस्तु रावणः क्रुद्ध : श्रुत्वा हतमकंपनम् पूरीं परिययौ लंकां सर्वगुल्मानवेक्षितुम् ॥१॥रुद्धां तु नगरीं दृष्ट्वा रावणो राक्षसेश्वरः ...अजून वाचाकाले प्रहस्तं युद्धकोविदम् ॥२॥पुरस्योपनिरुद्धस्य सहसा पीडितस्य च ।नान्यं समर्थं पश्यामि युद्धे युद्धविशारद ॥३॥अहं वा कुंभकर्णो वा त्वं वा सैन्यपतिर्मम ।इंद्रजिद्वा निकुंभो वा वहेयुर्भारमीदृशम् ॥४॥सर्वं बलमिदं शीघ्रं मायया परिगृह्य च ।विजयायाशु निर्याहि यत्र सर्वे वनौकसः ॥५॥ रावण लंकादुर्गाचा बंदोबस्त करतो : एके हनुमंतें रणागणीं । अकंपन पाडोनियां रणीं ।मारिल्या राक्षसांच्या श्रेणी । त्यापुढें कोणी उरेना ॥ २ ॥अकंपनाचा भरवसा होता ।
अध्याय 17 सुग्रीव मूर्च्छित पडतो ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रहस्त वधाची वार्ता ऐकून रावण स्वतः जाण्याचे ठरवितो : पूर्व प्रसंगीं रणाआंत । नीळे मारिला प्रहस्त ।ऐकोनियां लंकानाथ । अति आकांत पावला ॥ १ ॥रावणाचा अति आप्त । प्रधान सेनानी ...अजून वाचा।त्याचा नीळें केला घात । लंकेआंत आकांत ॥ २ ॥ प्रहस्तस्य वधं श्रुत्वा रावणो भ्रांतमानसः ।राक्षसानादिदेशाथ राक्षसेद्रो महाबलः ॥१॥कार्या शत्रुषु नावज्ञा यैरिंद्रबलसूदनः ।सूदितः सैन्यपालो मे सानुयात्रः सकुंजरः ॥२॥सोऽहं रिपुविनाशाय विजयाया विचारयत् ।स्वयमेव गमिष्यामि रणशीर्ष तदद्भुतम् ॥३॥अथ तद्वानरानीकं रामं च सहलक्ष्मणम् ।निर्दहिष्यामि बाणौघैः शुष्कं वनमिवानलः ॥४॥ नीळें मारिला प्रहस्त । बोंब उठली लंकेआंत ।तें ऐकोनि लंकानाथ । जाला भ्रांत सक्रोधी ॥
अध्याय 18 नील व रावणाचे युद्ध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाचे रामांस वंदन करुन प्रयाण : श्रीरामें निरुपण सांगून । बंधूसी पावली मूळींची खूण ।घालोनियां लोटांगण । श्रीरामाचरण वंदिले ॥ १ ॥वंदितां श्रीरामचरण । लक्ष्मणासीं आलें स्फुरण ।श्रीरामें देवोनी ...अजून वाचा। धाडिला आपण संग्रामा ॥ २ ॥ स रावणं वारणहस्तबाहुं ददर्श भीमोद्यतदीप्तचापम् ।प्रच्छादयंतं शरवृष्टिजालैस्तान्वानरान्बाणविकीर्णदेहन् ॥१॥तमालौक्य महातेजा हनुमान्मरुतात्मजः ।निवार्य शरजालानि विदुद्राव स रावणम् ॥२॥रथं तस्य समासाद्य तोदमाक्षिप्य सारथेः ।त्रासयन्रावणं धीमान्हनुन्मान्वाक्यमव्रवीत ॥३॥एष मे दक्षिणो बाहुः पंचशाखः समुद्यतः ।विधमिष्यति हे देहे भूतात्मानं चिरोषितम् ॥४॥ वानरसैन्याला रावणापांसून पीडा : रावणाचें उग्र स्वरुप । अत्युग्र वाहोनिया चाप ।अनिवार शरप्रताप । वानरदर्प भंगिला ॥ ३ ॥रावणाच्या