अध्याय 35
हनुमंताचा प्रताप
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
मागिले प्रसंगी शक्रजितें । मैत्री करोनि सोडिलें इंद्रातें ।
तदनंतरे सीताकांतें । अगस्तीतें विनविलें ॥१॥
श्रीराम दोनी कर जोडून । अगस्तीस विनवी नम्र होऊन ।
म्हणे स्वामी वाळिरावणांचे बळासमान । भूमंडळीं आन असेना ॥२॥
या दोघांच्या बळाहूनि अधिक । वायुपुत्र असे देख ।
तयाचा पराक्रम सम्यक । जम ठाऊक असे जी ॥३॥
श्रीरामांची मारुतीबद्दलची कृतज्ञता :
हनुमंताच्या प्रसादेंकरून । प्राप्र्त लंका सीता लक्ष्मण ।
येणें सुग्रीवेंसी सख्य जाण । अगणित बळ पैं याचें ॥४॥
शुद्धीस जातां सहित वानरेंसीं । समुद्र देखोनि कपि चिंतातुर मानसीं ।
तो शत योजनें येणॆं पराक्रमेंसीं । उतरोनि लंका पावला ॥५॥
सीतेसी करोनि एकांत । व्न उपडोनि किंकरप्रधानपुत्रघात ।
आणि लाडका जो अखया सुत त्याचा निःपात येणें केला ॥६॥
सीताशुद्धी येणे केली । वन उपडोनि राक्षसें मारिलीं ।
ब्रह्मशापें बांधो देवोनि बळी । केली होळी लंकेची ॥७॥
इंद्रजितजनकें शक्ती टाकिली । तेणॆ लक्ष्मण पडिला भूतळीं ।
येणें द्रोणगिरी आणॊनि त्या वेळी । सौमित्रातें वांचविलें ॥८॥
याचेनि सुग्रीवासीं सख्य झालें । अठरा पद्में वानर मेळविले ।
याचेनि मजला रूप येणें वाळीवानर । किंनिमित्त वधिला नाहीं ॥१०॥
ऐसे याचें बळ अद्भुत । देवां दानवा अतुळित ।
परी येणॆं नाहीं मारिला शक्रसुत । काय कारण मुनिवर्या ॥११॥
ऐसी आशंका माझे चित्तीं । वसत आहे गा मुनि अगस्ति ।
सुग्रीवकार्यासी मारुती । कांही नाहीं प्रवर्तला ॥१२॥
ऐसें श्रीरामाचें उत्तर । ऐकोनि अगस्ति चतुर ।
काय बोलिला तें सविस्तर । श्रोतीं सादर ऐकिजे ॥१३॥
मारुतीची जन्मकथा :
अगस्ति म्हणे श्रीरघुपती । बाळपणीं याची अद्भुत ख्याती ।
ते मी सांगेन तुजप्रती । अद्भुत शक्ती हनुमंता ॥१४॥
ब्रह्मचर्याची अति गोमटी । हनुमंतास गर्भकासोटी ।
अंजनीमाता न देखें दृष्टी । कां राम जगजेट्ःई देखेल ॥१५॥
हनुमंताचें लिंगदर्शन । मुख्य माता न देखे जाण ।
मग इतर देखों शके कवण । ब्रह्मचारी पूर्ण वारुकुमर ॥१६॥
हनुमान पुसे बाळभावें । माते म्यां क्षुधेसी काय खावें ।
आरक्त फ़ळ जें देखावें । तें भक्षावें म्हणे माता ॥१७॥
जन्मतांचि हनुमंत । अग्नितेजें देदीप्त ।
बालार्कप्रभासम भासत । दीप्तिमंत मारुति ॥१८॥
सूर्योदय नव्हतां तेथ । सेजे निजवोनि हनुमंत ।
अंजनीं गेली वनांत । फ़ळें त्वरित आणावया ॥१९॥
मातृविहीन हनुमट । रुदा करी अतिक्षुधित ।
देखोनि बालार्क आरक्त । फ़ळ भक्षावयार्थ उडाला ॥२०॥
क्षुधेनें पीडिला प्रबळ । बाळसूर्य अति वर्तुळ ।
भक्षावया स्वयें तत्काळ । उदे चपण स्वभावें ॥२१॥
हनुमंताची उड्डानशक्ती । ते गति न ये खगेश्वराप्रती ।
वायुसुताच्या शीघ्रगतीं । मनोवृत्ती टणकल्या ॥२२॥
भक्षावया बालार्कासी । दुर्धर गति हनुमंतासी ।
देखोनि विस्मय सुरवरांसी । देव ऋषि विस्मित ॥२३॥
धैर्य शौर्य महावीर्य । शीघ्र गमन गतिगांभीर्य ।
हनुमंताचें परमौदार्य । देव ऋषि विस्मित ॥२३॥
धैर्य शौर्य महावीर्य । शीघ्र गमन गतिगांभीर्य ।
हनुमंताचें परमौदार्य । सुरासुर वनिती ॥२४॥
हनुमंताच्या समान शक्ती । कोणा नाहीं त्रिजगतीं ।
बाळभावें शीघ्रगती । सूर्यभक्षार्थीं धांवत ॥२५॥
मनोगती सांडोनि मागें । हनुमान चालिला वेगें ।
सूर्यकिरणाचेनि योगें । होईल सर्वांग भस्मांत ॥२६॥
ऐसें जाणॊनि वायुपिता । निजपुत्रातें संरक्षिता ।
किमांबुकणी निवविता । होय चालता शिशूमागें ॥२७॥
वायु धरूं पांहे हनुमंतासी । तंव तो नाटोपे वायूसी ।
वेगें जातां सूर्यापासीं । फ़ळभावेंसीं भक्षावया ॥२८॥
हनुमंत आला बिंबापासीं । रविराहुग्रहण ते दिवसीं ।
राहु ग्रासितां सूर्यासी । हनुमंतासी कोप आला ॥२९॥
माझ्या गोड ग्रासाआड । तेथें कोण आला मूढ ।
राहूचें फ़ोडिलें जाभाड । पुच्छें सदृढ गांजिला ॥३०॥
पुच्छें हाणतां वानरा । घायें राहु झाला घाबरा ।
नाकीं मुखीं रुधिरधारा । थरथरा कांपत ॥३२॥
धांकें थरथरा कांओअत । गगनीं गरगरां भोंवत ।
राहू पडतां अति मूर्च्छित । तरी धांवोन केत धरी त्यासी ॥३२॥
राहू केतू अति आप्तता । दोघां देहीं एकात्मता ।
केतु येवोनि राहुसाह्यार्था । कोपें हनुमंताकडे पाहे ॥३३॥
कोप राहू देखोनि दृष्टीं । रागें हनुमान हाणी मुष्टी ।
दोघां पळतां पाय पोटीं । बोंब उठी ग्रहचक्रीं ॥३४॥
ग्रह सांगती सिंहिकासुता । पृच्छकेतु आला तुम्हांभोवतां ।
इंद्र अधिकारी नियंता । त्यासि तत्वतां तुम्ही सांगा ॥३५॥
राहु जो कां सिंहिकासुत । वनरघायें रुधिरोक्षित ।
इंद्रापासीं आला त्वरित । शंख करीत सांगावया ॥3६॥
माझी जीविका जीवनवृत्ती । चंद्रसूर्यग्रहणस्थिती ।
आजिचे ग्रहणकाळाप्रती । रविग्रहणार्थी मी गेलों ॥३७॥
तंव मजहूनी बळवंत । पुच्छराहु येवोनि तेथ ।
घायें करोनि रुधिरोक्षित । धाडिलों येथ बोंबेसीं ॥३८॥
तूं नियंता देवाधिदेवो । माझा न देखतां अन्यावो ।
तुंवा धाडिला पुच्छरावो । तेणॆं मज पहाहो गांजिलें ॥३९॥
शेखीं मजही न सांगता । त्वां करणी केली गुप्त घाता ।
म्यां काय करावें आतां । मज तत्वतां तूं सांगें ॥४०॥
पुच्छराहु येवोनि तेथ । सूर्य आकळिल समस्त ।
माझा करूं धावें घात । आलों रडत सांगावया ॥४१॥
ऐकोनि राहूचा वचनार्थ । इंद्रादि देव झाले विस्मित ।
ग्रहचक्रांत म्हणती हें विपरित । कर्ता येथे तो कोण ॥४२॥
कोणें केला नवा राहो । त्यासि निर्दळावया पहाहो ।
घेवोनि सुरसेनासमुदावो । इंद्र स्वयमेवो पैं आला ॥४३॥
इंद्रें राहु पुढें करून । नवा राहु दाखवीम् म्हणॊन ।
जेणें तुज गांजिलें संपूर्ण । त्याचें निर्दळण करीन मी ॥४४॥
दाखवितां हनुमंतासी । थरथरां कंप सुटला राहूसी ।
दडोनि ऐरावतींचे पाठीसीं । दावी इंद्ररासी दुरोनि ॥४५॥
येरीकडे हनुमंत । धांवला रवि ग्रासावया क्षुधित ।
तेणें सूर्य चळीं कांपत । अति अनर्थ ओढवला ॥४६॥
दिनमान साडोनि नभःपथा । पहों न लाहे सविता ।
निवारूं न शके हनुमंता । अति आकांता पावला ॥४७॥
तेचि संधी इंद्रापासीं । वानर देखोनि राहूसी ।
रागें निर्दळावया त्यासी । अति आवेशीं धावला ॥४८॥
मज क्षुधिताच्या आहारासी । राहू ओढविला विवसी ।
धरोनि इंद्राच्या बळासी । माझ्या ग्रासासी घेऊं आला ॥४९॥
ऐसें बोलोनि हनुमंत । सूर्याग्रासाची सांडोनि मात ।
राहूचा करूं धांवे घात । येरू बोभात इंद्रासी ॥५०॥
राहु पळे इंद्राकडे । तंव हनुमंताची उडी पडे ।
येरू अति आक्रोशें रडे । इंद्रापुढें सांगत ॥५१॥
राहु म्हणे मातें मर्दित । इंद्र इंद्र नामें आक्रदंत ।
वानरें पुरविला अंत । आरंबळत आक्रोशें ॥५२॥
ऐकोनि राहूचा आकांत । इंद्र नाभिकार देत ।
भिवों नको धरीं पुरुषार्थ । याचा घात मी करीन ॥५३॥
इंद्र व बालहनुमंताचे युद्ध :
ऐसें बोलोनि अमरपती । वेगीं प्रेरिला ऐरावती ।
त्यावरी धांवला मारुती । हस्ते हस्ती उपटावया ॥५४॥
वानर ऐरावती आकळी । त्यातें पुच्छें ठोकिला कुंभस्थळीं ।
गज आक्रंदोनि किंकाळीं । चळचळीं कांपत ॥५५॥
पुच्छ नव्हे तो व्रजांघात । घायें विमुख ऐरावत ।
इंद्र बळे आंवरित । तरी युद्धाआंत परतेना ॥५६॥
पुच्छा हाणितां वानरें । गजें घेतलें घायवारें ।
शक्रशक्तीतें नावरे । केलें घाबरें इंद्रासी ॥५७॥
इंद्र देवांमाजी बळी । करितां हनुमंतासीं कळी ।
वानरें मुकुट पाडिला तळीं । झोंटी मोकळी सुटली ॥५८॥
मुकुट घ्यावया आपणासी । बाळभावें न कळे त्यासी ।
इंद्र केला कासाविसी । मरुद्गणेंसी मर्दूनी ॥५९॥
इंद्र गांजिला कपींद्रें । यम धांविन्नला कैवारें ।
दंडे हाणी सत्वरें । केलें वानरें विपरीत ॥६०॥
यम जंव हाणी दंडासी । हनुमान आदळला अंगासीं ।
थापा हाणोनियां त्यासी । तोंडघसीं पाडिला ॥६१॥
घाय हाणोनी प्रचंद । सांडवोनि दंडबंड ।
यमाचें ठेचिलें तोड । बळ वितंड वानरा ॥६२॥
यमें गाजिलें जगासी । हनुमंते अर्धक्षणीं ।
सुरवरसैन्य केली भंगाणी । अवघ्यां केली दाणादाणी ।
महापळणी देवांसी ॥६५॥
हनुमंताच्या वेगापुढें । आम्हीं पळावें कोणीकडे ।
येरामागें येरू दडे । जीवा सांकडें देवांसी ॥६६॥
सगज उपटावया इंद्रासी । ऐरावत धरोनि पुच्छासीं ।
वानरें भोवंडिला आकाशीं । सदेव ऋषी गजबजिले ॥६७॥
हनुमंतें देखोनियां दृष्टीं । इंद्र उपडिला सृष्टीं ।
जगीं एकचि बोंब उठी । महाहटी वानर ॥६८॥
लघु लाघवें सुरपतीं । वज्रें हाणितला मारुती ।
घाव लागला हनुमंताप्रती । पडियेला क्षितीं मूर्च्छित ॥६९॥
हनुमंत मूर्च्छित वायूच्या क्षोभाने प्राणवायूचा नोरोध :
मेरुशिखरपाठारांत । हनुमान पडिला मूर्च्छित ।
वायु पिता येवोनि त्वरित । निजसुत उचलिला ॥७०॥
क्षुधिता माझिया तान्हयासी । इंद्रें हाणोनि वज्रासीं ।
मूर्च्छित पाडिलें भूमीसीं । वायु मानसीं क्षोभला संपूर्ण ।
आकर्षिला जगाचा प्राण । ब्रह्मादिकां संकट पूर्ण ।
ऋषिभूतगण तळमळती ॥७२॥
वायु क्षोभोनि सक्रोध । अंतरी केला प्राणरोध ।
प्राणापान ठेलें स्तब्ध । अति विरुद्ध देवांसी ॥७३॥
प्राणनिरोधाची स्थिती । ठेली भूतांची नित्यगती ।
कोणा नाहीं सुखप्राप्ती । तळमळ करिती अति दुःखे ॥७४॥
यक्षराक्षसगणगंधर्व । सिद्धचारणादि मानव ।
सत्यलोका येवोनि सर्व । पितामह वंदिला ॥७५॥
एका जनार्दना शरण । शरण देवांचा वर लाहोन ।
वज्रदेही होईल हनुमान पूर्ण । सावधान अवधारा ॥७६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
हनुमंतप्रतापवर्णनं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ॥३५॥ ओव्यां ॥७६॥