अध्याय 4 ॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : ऐकोनियां कथाश्रवण । ज्ञाते म्हणती अप्रमाण ।नव्हे हें मूळीचें निरूपण । तिहीं शिवरामायण पहावें ॥ १ ॥स्कंड पुसे अगस्तीप्रती । शिवभवानी राम जपती ।राम कोण तो त्रिजगतीं । यथास्थिती मज सांगा ॥ २ ॥तो म्हणे श्रीराममहिमान । सांगावया मी अति दीन ।जेथें वेदां पडे मौन । तें वदावया वदन मज नाहीं ॥ ३ ॥तुझ्याचिं ऐसा प्रश्न । सदाशिवाप्रति जाण ।पार्वती पुसे आपण । श्रीराम कवण मज सांगा ॥ ४ ॥श्रीरामाची कोण स्थिती । कोण श्रीरामाची कीर्ती ।समूळ सांगा मजप्रती । पुसे अति प्रीती जगदंबा ॥ ५ ॥कोण श्रीरामाची ख्याती ।