रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 8

  • 3.7k
  • 1.9k

अध्याय 8 विश्वामित्रांचे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम सच्चिदानंदघन । तोही वैराग्यलक्षण ।लोकलक्षणार्थ दावी आपण । दीन जन तारावया ॥१॥सकळ वैराग्याचे फळ । स्वयें श्रीराम केवळ ।तोही वैराग्याचें शीळ । दावी प्रबळ लोकोपकारा ॥२॥ श्रीरामांची अनासक्ती : तीर्थाहूनि आलिया रघुनाथ । नावडे राज्य राज्यार्थ ।नावडे लोक लोकार्थ । विषयस्वार्थ नावडे ॥३॥नावडे इंद्रियांचा संग । नावडे इंद्रियांचा भोग ।नावडे देहादि देहधर्म ।नावडे विलाससंभ्रम । वैराग्य परम अनुतापी ॥५॥नावडे स्त्रियांची भेटी । नावडे स्त्रियांसीं गोष्टी ।नावडे स्त्रियां पाहों दृष्टी । वैराग्य पोटीं विषयांचें ॥६॥नावडे शाब्दिक चावट । नावडे चातुर्य वटवट ।नावडे अतिवाद खटपट । मौननिष्ठ अनुतापी ॥७॥नावडे कळा कौतुक चांग ।