रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 11

  • 12.2k
  • 2.2k

अध्याय 11 श्रीवसिष्ठरामसंवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विश्वामित्र उवाच –तस्य व्यासतनूजस्य मलमूत्रापमार्जन् ।यथापयुक्तं तद्‌ राम तावदेवोपयुज्यते ॥१॥ श्रीव्यासाच विरक्त पुत्र । सांगितले शुकाचे चरित्र ।जनकें त्याचा विकल्पमात्र । केला निरहंकार द्वारपाळद्वारें ॥१॥सज्ञानाचें कृपावचन । द्वारपाळाद्वारें जाण ।करोनि विकल्पाचें दहन । पूर्ण समाधान श्रीशुकासी ॥२॥जैसी विरक्ती शुकासी । तैसी विरक्ती श्रीरामासी ।राज्यवैभव नावडे त्यासी ।त्वांही करावा शिगुरू साचार । विश्रांतीचें घर विवेकापासीं ॥४॥ वासनासंक्षयो नाम मोक्ष इत्युच्यते बुधैः ।पदार्थवासनासक्तिर्बंध इत्याभिधीयते ॥२॥ सकळ वासनेची शांती । या नांव मुख्य मुक्ती ।विषयवासनाउत्पती । बद्धता निश्चितीं या नांव ॥५॥देही असोनि विदेहस्थिती । ज्यासीं नाहीं विषयासक्ती ।त्यासी बोलिजे जीवन्मुक्ती । जाण निश्चितीं रघुनाथा ॥६॥ विश्वामित्र