रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 14

  • 3.9k
  • 1.6k

अध्याय 14 अहल्योद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ एवमुक्ते तयोर्वाक्य सर्व एव महर्षय: ।विश्वामित्रं पुरस्कृत्य राघवं वाक्यमब्रुवन् ॥१॥मैथिलस्य नरश्रेष्ठ जनकस्य भविष्यति ।यज्ञः परमधर्मिष्ठो यास्यामस्तत्र वै वयम् ॥२॥त्वं चापि नरशार्दूल सहास्माभिर्गामिष्यासि ।अद्भुतं च धनूरत्नं तत्र त्वं द्रष्टुमर्हसि ॥३॥ जनकराजाकडून स्वयंवराचे आमंत्रण : ऋषिसभे प्रसन्नोन्मुख । बैसले वर्णिती रघुकुळ टिळक ।तंव जनकाचे दोघे सेवक । पत्र कुंकुमांकित घेवोनि आले ॥१॥विश्वामित्रें निजगायार्थ । ऋषी मेळविले समस्त ।स्वामीनें त्यांसमवेत । यावें यथार्थ स्वयंवरा ॥२॥तंव रामलक्ष्मणांलागुनी । कौशिक बोलावी सन्मानोनी ।दोघीं साष्टांग नमूनी । कर जोडोनी बोलत ॥३॥आम्ही तुझे नित्यांकित । निजसेवक निश्चित ।सिद्धी पावला यज्ञार्थ्स् । पुढील कार्यार्थ सांगावा ॥४॥स्वामी जे तूं आज्ञा देसी ।