अध्याय 15 सीतेचा पूर्वजन्मवृत्तान्त : ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पदकमलरजोभिः मुक्तपाषाणदेहाद्वियमभवदहल्या गौतमे धर्मपत्नी ।त्वयि चरति विशीर्ण ग्रावविंध्याद्रिपादेकति कति भवितारस्तापसा दारवण्त ॥ १ ॥ श्रीरामचरण स्पर्शाचा परिणाम : लागतां श्रीरामपादरजःकण । जावोनियां पाषाणपण ।जाहले अह्ल्योद्धरण । तें दारग्रहण गौतमें केलें ॥ १ ॥चरणरजांचा प्रताप । अहल्या जाहली निष्पाप ।हरून गौतमाचा विकल्प । स्त्री अनुरूप पतिव्रता ॥ २ ॥अगाध पदमहिमा देखोन । विस्मित जाले ऋषिजन ।स्वर्गी सुरवर करिती स्तवन । नाम पावन तिहीं लोकीं ॥ ३ ॥पुढें विंध्याद्रीचे ठायीं । जे पाषाण लागती रामपायीं ।ते निःशेष विरोनि पाहीं । उठतील स्त्रीदेहीं सुंदरत्वें ॥ ४ ॥तयां स्त्रियांचे देखोन । बहुसाल तपस्विजन ।ब्रह्मचर्य विरर्जून