रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 16

  • 2.2k
  • 969

अध्याय 16 परशुरामांचा प्रताप : ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता स्वयंवरासी जाण । शिवचापासी लावला गुण ।जा जनकें करावया पण । काय कारण तें ऐका ॥ १ ॥ शिवधनुष्याचा पण करण्याचे कारण : पूर्वी परशुराम कैलासीं । धनुर्विद्या शिवापाशीं ।परशुविद्या गणेशापाशीं । लघुलाघवेंशीं शिकला ॥ २ ॥परशुराम कैलासीं । राहिला असे शिवसेवेसी ।तत्परता अहर्निशीं । श्रद्धा गणेशीं समसाम्य ॥ ३ ॥तंव आक्रंदे आत्यंतिक । ऐकिली रेणुकेची महाहाक ।परशुरामें एकाएक । ऐकोनि साशंक तो झाला ॥ ४ ॥येवोनि सांगे शिवापाशीं । रेणुका बोभात आक्रंदेशीं ।आज्ञा पुसतों स्वामींसी । मज मातेपासीं जावया ॥ ५ ॥ रेणुकेची कथा : ऐका रेणुकापुराण । जें