रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 21

  • 5.5k
  • 2.8k

अध्याय 21 दशरथाचे मिथिलेस आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामसीतेचे पाणिग्रहण : सीतेचें रामासीं लग्न । वचन ऐकोनि रावण ।न दाखवीच काळें वदन । गेला निघोन अधोमुखें ॥ १ ॥देखोनि श्रीरामप्रताप । राजे जाले सकंप ।तिहीं सांडोनियां दर्प । गेले नृप निजनगरा ॥ २ ॥यापरी राजे राक्शस अनेक । समप्रतापें केले विमुख ।तेणें जनकासी अत्यंत सुख । परम हरिख लग्नाचा ॥ ३ ॥राजा म्हणे विश्वामित्रासी । शीघ्र आणावया दशरथासी ।मी धाडितों प्रधानासी । परी तो त्यासी मानीना ॥ ४ ॥ जनक उवाच –भवतोऽनुमतेर्ब्रह्मन् शीघ्रं गच्छंतु मंत्रिणं ।मम कौशिक भद्रं ते त्वयोध्यां त्वरिता रथैः ॥ १ ॥जनकेन समादिष्टा दूतास्ते शीघ्रवाहनाः ।त्रिरात्रमुषिता