रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 24

  • 4.6k
  • 2.5k

अध्याय 24 श्रीराममंडपागमनं ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचे लग्नमंडपात आगमन – श्रीरामप्रसाद सेवितां । समाधिसुख फिकें आतां ।ऐसी उल्लासली सीता । श्रीरघुनाथाचेनि शेषें ॥ १ ॥सद्गुारूपरात्पर उपरी । सर्वातें सावधान करी ।घटिका प्रतिष्ठिली अंतरीं । जीवनावरी संख्येची ॥ २ ॥अक्षरें अक्षर पळेंपळ । घडी भरता न लगे वेळ ।लोकव्यापारें विकळ । काळ गेला नेणती ॥ ३ ॥घडी झेंगटातें हाणित । काळ जावो न द्यावा व्यर्थ ।तेणें काळें काळ अंत आणित । मुद्दल तेथें बुडालें ॥ ४ ॥नवल लोकांची नवाई । काळें गिळिलें न पडे ठायीं ।दुमाही चौमाही गणिता वही । तेणें पाही नागवले ॥ ५ ॥सद्गुीरू सांगे भरली घडी ।