रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 25

  • 6.4k
  • 3.6k

अध्याय 25 जानकीचे पाणिग्रहण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीचे पाणिग्रहण – श्रीराममंडपाआंत । आला चहूं वरांसमवेत ।जनकासी आल्हाद बहुत । आला दशरथ ऋषियुक्त ॥ १ ॥जनकें दिधला सन्मान । गाद्या पडगद्या वरासन ।मृदुलिया लोटांगण । ऋषिससंपन्न सभेसीं ॥ २ ॥ मधुपर्क : मधुपराचें विधिविधान । चारी पुरुषार्थ चवाई पूर्ण ।त्यावरी समाधि सुखासन । वरासन चौघांसी ॥ ३ ॥सदोदिता आवाहन । अधिष्ठानासी आसन ।कर्मरहितासी आचमन । चरणक्षाळण अचरणा ॥ ४ ॥श्रीराम भूषणां भूषण । त्यासी अलंकार आभरण ।निरावरनासी प्रावरण । सर्वगता आगमना वाहनादिक ॥ ५ ॥सहजासी पाठीपोट । अखंडासी वस्तिपीठ ।निःशब्दा शब्द स्पष्ट । निरंतरा अंतःपट लग्नार्थ धरिती ॥ ६ ॥श्रीराम