रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 3

  • 2.5k
  • 954

अध्याय 3 दुष्ट मंथरेचा कैकेयीवर प्रभाव ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामराज्याभिषेक निश्चितीमुळे इंद्रादिकास चिंता, त्या देवांची ब्रह्मदेवाला विनंती : श्रीरामराज्यभिषिंचन । तेणें इंद्रादिकां चिंता गहन ।समस्त देवीं मिळॊनि जाण । चतुरानन विनविला ॥१॥देव म्हणती ब्रह्मयासी । तुझें आश्वासन आम्हांसी ।राम अवतरला सूर्यवंशी । तो रावणासी वधील ॥२॥सपुत्र सबंधु सप्रधान । राम करील राक्षसकंदन ।तेणें देवांस बंधमोचन । ते मिथ्या वचन होऊ पाहे ॥३॥सत्य करीं आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन ।आमचे आपत्तीचें विंदान । सावधान अवधारीं ॥४॥इंद्र बारी चंद्र छत्रधारी । यम पाणी वाहे घरीं ।वायु सर्वदा पूजे ओसरी । विधि तेथें दळकांडा ॥५॥अश्विनी सूनू दोनी । तिही परिमळ द्यावे