रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 5

  • 3.5k
  • 1.5k

अध्याय 5 दशरथभवनात श्रीरामांचे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रभाते शर्वरीं दृष्टवा चंद्रनक्षत्रमंडिताम् ।ततः सूतो यथाकालं पार्थिवस्य निवेशनम् ॥१॥प्रविवेश प्रबोधार्थं सुमंतो मतिसत्तमः॥२॥ प्रातःकाळी सुमंत दशरथास उठविण्यास गेला : अभिषेकावया श्रीरघुनाथ । प्रातःकाळीं सुमुहुर्त ।चंद्र देखोनि गुरुपुष्ययुक्त । वेगीं सुमंत ऊठिला ॥१॥सुमंत प्रधान बुद्धिमंत । प्रबोधावया श्रीदशरथ ।आला राजभवनांत । कैकेयीयुक्त नृप जेथें ॥२॥ दशरथाची काळजी : अभिषेकावया रघुनंदन । राया होई सावधान ।ऐकोनी प्रधानाचे वचन । मूर्च्छापन्न दशरथ ॥३॥राम जाईल वनांत । कोणते तोंडी बोलूं मात ।हातींचा जाईल रघुनाथ । दुःखे मूर्च्छित दशरथ ॥४॥वना धाडीतो दशरथ । ऐसी ऐकताचि मात ।वचन नुल्लंघीच रघुनाथ । जाईल वनांत तत्काळ ॥५॥रामासी नाहीं राज्यचाड