रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 7

  • 3.8k
  • 1.5k

अध्याय 7 सीता-लक्ष्मण वनगमननिर्धर ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा दृढ निश्चय ओळखून कौसल्या त्यांचे स्वस्तयन करते : झाली कौसल्या सप्रसन्न । श्रीरामासी वनाभिगमन ।करावया करि पुण्याहवाचन । स्वस्त्ययन अवधारा ॥१॥ निश्चितं तं तथा रामं विज्ञाय गमनोत्सुकम् ।प्रास्थानिकं स्वस्त्ययनं कर्तृमेवोपचक्रमे ॥१॥सा विनिय तमायासमुपस्पृश्य जलं शुचि ।चकार माता रामस्यं मंगलानि मनस्विनी ॥२॥गधैश्चापि समालभ्य राममायतलोचना ।ओषधीं च सुसिद्धार्थां विशल्य करणीं शुभाम् ॥३॥चकार रक्षां कौसल्या मंत्रैरभिजजाप च ।देवानभ्यर्च्य विधिवत्पणम्य च शुभव्रता ॥४॥ वनीं व्हायया वनवासी । अति उल्हास श्रीरामासी ।कौसल्या जाणोनि निश्चयेसीं । धाडी वनासी स्वस्तयनें ॥२॥करोनि करचरणक्षाळण । कौसल्या करी शुद्धाचमन ।करविलें देवतार्चन । रघुनंदननिजविजया ॥३॥सुमनचंदनीं अति ओजा । पूजा केली अधोक्षजा ।लोटांगणीं