रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 9

  • 3.1k
  • 1.2k

अध्याय 9 श्रीरामांचे चित्रकूटावर गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांच्या प्रयाणानंतर दशरथ व राण्या त्यांच्या मागून धावत जातातः वना निघतां श्रीरघुनाथ । राजा महामोहें मूर्च्छित ।तो होवोनियां सावचित्त । पुसे दशरथ राम कोठें ॥१॥त्यासी स्त्रिया सांगती मात । तुम्हीं दिधला निजरथ ।त्यावरी बैसोनि रघुनाथ । गेला निश्चित वनवासा ॥२॥एक सांगती रायासी । राम आश्वासीत जनांसी ।आहे नगरद्वारापासीं । तंव राव वेगेंसी धाविंनला ॥३॥ अथ राजा वृतः स्त्रीभिः सद्विजो दीनमानसः ।निर्जगाम प्रियं पुत्रं द्रक्ष्यामि च वनं गतम् ॥१॥ सातशें राणियांसमवेत । धाविंनला दशरथ ।कोठें कोठे माझा रघुनाथ । स्वयें पुसत सर्वांतें ॥४॥मग आक्रंदे दिधली हाक । श्रीरामा दाखवीरे निजमुख ।तुज जालिया