रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 11

  • 3k
  • 1.2k

अध्याय 11   श्रीरामपादुकांना पट्टाभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांची त्यागबुद्धी पाहून सुमंताची अवस्था : श्रीरामाचें वनप्रयाण । ते काळींचे निर्लोभपण ।सुमंत आठवी आपण । श्रीरामीं मन दृढ जडलें ॥१॥त्या त्यागाची निजगती । दावोनी गेला श्रीरघुपती ।ते सुमंत स्मरे अति प्रीतीं । त्यागस्थिती ते ऐसी ॥२॥असत्य त्यजिजे जेंवी पवित्रें । तेंवी त्यागी राज्यालंकार वस्त्रें ।वना निघतां श्रीरामचंद्रे । केलें वल्कलांबर परिधान ॥३॥जेवीं निंदा त्यजिजे साधुसंतीं । तेंवी राज्यवैभवसंपत्ती ।सर्वही त्यजोनि रघुपती । निघे वनाप्रती वल्कलांबरीं ॥४॥रजकस्पर्शाचें जीवन । जेंवी नातळती साधुजन ।तेंवी सांडोनि राज्यादि धनमान । निघे रघुनंदन वनवासा ॥५॥राज्यातील अणुप्रमाण । श्रीराम काहीच नेघे जाण ।त्यजोनियां पादत्राण । निघाला