रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 13

  • 2.8k
  • 1.3k

अध्याय 13 भरताचे चित्रकूटावर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स्नानसंध्या व त्रिवेणीला साष्टांग प्रणिपात : भरतें गंगा उतरोन । केलें स्नान संध्या तर्पण ।आजींची वस्ती प्रयागस्थान । म्हणोनि निशाणें त्राहाटिलीं ॥१॥रथ गज वाजी वीरश्रेणी । चालातां मार्ग न पुरें धरणीं ।पुढे देखिली त्रिवेणी । दूत गर्जोनी सांगती ॥२॥देखोनी त्रिवेणी भरत शत्रुघ्न । दोघी घातले लोटांगणा ।त्यजोनियां पादत्राण । चरणचालीं निघालें ॥३॥वसिष्ठादि ऋषीश्वर । चरणीं चालती सत्वर ।देखोनि त्रिवेणींचे तीर । जयजयकार तिहीं केला ॥४॥ गोदान, पिंड्दान, धनदान : देवोनि लक्षानुलक्ष गोदानें । भरतशत्रुघ्नें केलीं स्नानें ।तीर्थश्राद्ध पिंडदानें । पितृर्पणें तिहीं केली ॥५॥तीर्थ उअपवास मुंडन । रायासी नाही हे बंभन ।वसिष्ठ