रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 14

  • 3.8k
  • 1.5k

अध्याय 14 श्रीरामांकडून दुष्ट कावळ्याला शिक्षा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ चित्रकूटावर श्रीरामांची दैनंदिन चर्या, लक्ष्मणाची सेवा : येरीकडे श्रीरघुनाथ । चित्रकूट पर्वताआंत ।अग्निहोत्र सीता समवेत । नित्य वेदोक्त प्रतिपाळी ॥१॥श्रीरामसेवेसी सौमित्र । पर्णशाळा केली विचित्र ।श्रीरामाचें अग्निहोत्र । अहोरात्र संरक्षी ॥२॥विचित्र आणी फळें मुळें । नित्य निर्वाह पुरवी जळें ।काष्ठें आणोनियां प्रबळें । अग्नि सोज्ज्वळ स्वयें रक्षी ॥३॥रामसीतेचें चरणक्षाळण । नित्या नेमें करी लक्ष्मण ।जैसीं लक्ष्मीनारायण । या बुद्धीं पूर्ण पूजित ॥४॥विधिविधान जाणे श्रीराम । दर्शपौर्णमासिक होम ।मृगमांसें होमसंभ्रम । चालवी नेम सौमित्र ॥५॥श्रीरामाचे सेवेवरी । शरीर वंचीना तिळभरीधनुष्यबाण घेवोनि करीं । मृगें मारी होमार्थ ॥६॥धन्य त्या मृगांचें जीवित ।