अध्याय 17 भरताचे समाधान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाने बांधलेल्या पर्णशाळेचे सर्वांनी केलेले कौतुक : श्रीरामें उद्धरिले पितर । ते गगनीं करिती ।वर्षती सुरवर । जगदुद्धार श्रीराम ॥१॥मार्गीं चालतांदेखती डोळां । मनोहर पर्णशाळा ।सौमित्रे रचिल्या विशाळा । जनकबाळा स्वयें सांगे ॥२॥तें देखोनि म्हणती माता । धन्य जीवित्व सुमित्रासुता ।वनीं सुखरूप श्रीरामसीता । जाणा तत्वतां याचेनि ॥३॥याची सेवा अति निर्वाण । श्रीराम चरणी विकिला प्राण ।मस्तकीं जळ वाहे आपण । काष्ठें संपूर्ण हा आणी ॥४॥श्रीरामसीतेचें चरणक्षाळण । स्वादिष्ठ फळें पुरवी संपूर्ण ।नित्य नेमेस्त करी आपण । आणि जागरण अहर्निशीं ॥५॥वनी वसतां श्रीरघुनाथा । येणें विसरविली मातापिता ।विसरविली राज्यभोगता । सुख रघुनाथा