रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 4

  • 3.8k
  • 1.5k

अध्याय 4 मंदकर्णी ऋषींचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मंदकर्णी ऋषींचा उद्धार शरभंगे दिवं प्राप्ते मुनिसंघाः समंततः ।अभ्यगच्छंत ककुत्स्थं रामं ज्वलिततेजसम् ॥ १ ॥ ब्राह्मण आश्रयार्थ श्रीरामांकडे येतात : विराध वधिला अति दारुण । केलें शरभंगोद्धरण ।तें देखोनि मुनिगण । आले ठाकून श्रीरामा ॥ १ ॥वैखानस वालखिल्य । अग्निहोत्री शुद्धशीळ ।राक्षसभयें अति व्याकुळ । आले सकळ श्रीरमापासीं ॥ २ ॥जळाहारी फळाहारी । जताधारी ब्रह्मचारी ।पत्राहारी वायुआहारी । निरहारी ऋषी आले ॥ ३ ॥एक भगवे एक नागवे । वल्कलधारी मळिन लेवे ।राक्षसभयें आले आघवे । आम्हां राघवें रक्षावें ॥ ४ ॥एकांगुष्ठाव्रत एकांसी । एक ते वृक्षाग्रनिवासी ।एक ते एकपाद तापसी ।