रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 8

  • 3.5k
  • 1.4k

अध्याय 8 शूर्पणखेला विद्रूप करतात ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स तां पंचवटीं गत्वा नानाशकुनिनादिताम् ।उवाच भ्रातरं रामो लक्ष्मणं शुभलक्ष्मणम् ॥१॥अयं देशः समः श्रीरान्तुप्पितस्तरुभिर्वृतः ।इहाश्रमपदं रम्यं यथावत्कर्तमर्हसि ॥ २ ॥ पंचवटीत आगमन व वनसौंदर्याने सर्वांना संतोष : पंचवटीं । श्रीराम सुखावे देखोनि दृष्टीं ।सुखावली सीता गोरटी । आल्हाद पोटीं सौमित्रा ॥ १ ॥श्रीरामा देखोनि आल्हादें । कोकिळा कूजती पंचमशब्दें ।घुमरी घुमघुमती स्वानंदें । सुखानुवाद अति मधुर ॥ २ ॥श्रीरामां तूं तूं सीते तूं तूं । धन्य धन्य सुमित्रा तूं तूं ।ऐसें कपोत कूजतू । पुण्यपुरुषार्थी ये वनीं ॥ ३ ॥स्वतःप्रमाण कीं परतःप्रमाण । प्रयोगोपाधीनें व्यावर्तित कोण ।जहदजहल्लक्षणेचें काय प्रयोजन । शुक