रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 9

  • 2.7k
  • 1.1k

अध्याय 9 खर – दूषणांशी युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विद्रूप शूर्पणखा पद्मपुरीला जाते : घेवोनि लक्ष्मणाचा दरारा । शूर्पणखा आली पद्मपुरा ।निर्नासिकी विरुपाकारा । रुधिरधारा लागलिया ॥ १ ॥राक्षससभेचिये मेळीं । शूर्पणखा अतुर्बळी ।ते सरकटली समूळीं । राक्षसकुळीं गाजिली ॥ २ ॥शूर्पणखा अती दुर्धर । तीतें विटंबिलें तो महावीर ।राक्षसां धाक लागला थोर । निशाचर चळीं कांपती ॥ ३ ॥शूर्पणखेचें विरुपकरण । देखोनिय़ां खर दूषण ।कोपा चढले अति दारुण । क्रोधें गर्जोन पूसत ॥ ४ ॥ तां तथा पतितां दृष्टवा विरुपां शोणितोक्षिताम् ।भगिनीं क्रोधसंतप्तः खरः पप्रच्छ राक्षसः ॥१॥बलविक्रमसंपन्ना कामगा कामरुपिणी ।इमामवस्थां नीता त्वं केनांतकसमागता ॥२॥ खर-दूषण राक्षसास निवेदन व