रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 11

  • 3.6k
  • 1.3k

अध्याय 11 त्रिशिरा व खर राक्षसांचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूषणाच्या वधानंतर खर व त्रिशिरा हे पुढे येतात; त्यांच्या वल्गना : श्रीरामें मारिल्या सैन्य धुरा । तेणें दुर्धर कोप आला खरा ।त्यासी पुसोनियां त्रिशिरा । श्रीरामचंद्रावरी आला ॥ १ ॥खर म्हणे त्रिशिर्‍यासी । रणीं मर्दिलें दूषणासी ।म्हणोनि भिवो नको रामासी । तुझे पाठीसीं मी आहें ॥ २ ॥मनुष्य खाजें राक्षसांसी ।त्याचें भय काय आम्हांसी ।काटें देखोनि फणसासी । खाणारासी भय नाहीं ॥ ३ ॥चिरोनि फणसाचे कांटे । काढोनि अमृताचे सांठे ।मग सेविती घटघटें । युद्धसंकटें तेंवि श्रीराम ॥ ४ ॥श्रीराम बाणकटकेंसीं । अति दुर्धर राक्षसांसी ।तो गोड भखितां आम्हांसी