रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 12

  • 3.1k
  • 1.2k

अध्याय 12 शूर्पणखा-रावण संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पंचवटीतील राक्षससंहारामुळे राक्षसस्त्रियांचा विलाप : खरत्रिशिरादि बळांवर्ती । राक्षसांची जातिव्यक्ती ।रामें रणीं पाडिले क्षितीं । शरसंपातीं निवटोनियां ॥ १ ॥ ततःशूर्पणखा दृष्ट्वा सहस्त्राणि चतुर्दश ।हतानि रामेणैकेन मानुषेण पदातिना ॥ १ ॥ एकला श्रीराम धनुष्यपाणी । युद्धीं विचरतां चरणीं ।चवदा सहस्त्र वीरश्रेणीं । पाडिले रणीं शरघातें ॥ २ ॥बोंब सांगावया पुरती । राक्षसांची पुरुषव्यक्ती ।नाहीं उरली रणाप्रती । बाणावर्ती निवर्तले ॥ ३ ॥बोंब सांगावया देख । उरली शूर्पणखा एक ।घेवोनि लक्ष्मणाचा धाक । मारोनि हाक पळाली ॥ ४ ॥रणीं विमर्दाची धुकधुक । अति आक्रोशें करी शंख ।जनस्थान आली देख । नकटें मुख घेवोनी