रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 14

  • 3.3k
  • 1.4k

अध्याय 14 हरिणरुपी मारीचाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचे पंचवटीत आगमन, तेथील विध्वंस पाहून त्याची बिकट अवस्था : श्रीरामाश्रम पंचवटीं । रावण देखोनि आपुल्या दृष्टीं ।मारिल्या राक्षसांच्या कोटी । तेणें पोटीं दचकला ॥ १ ॥राक्षसांचीं दीर्घ मढीं । पडलीं देखोनि करवंडी ।मारीच अत्यंत हडबडी । खाजवी शेंडी भयभीत ॥ २ ॥आधींच श्रीरामभयें भीत । त्यावरी देखोनि राक्षसघात ।मारीच चळचळां कांपत । जे राक्षसां अंतक श्रीराम ॥ ३ ॥ मारीचाचा अनुनय : देखोनि राक्षसांचे कंदन । मारीचास स्वयें रावण ।अत्यंत देऊन सन्मान । त्याचे चरण दृढ धरिलें ॥ ४ ॥सीताहरण अति निर्वाण । खुंटलें स्वामिसेवकपण ।कृपा करोनि आपण । जानकीहरण