रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 15

  • 3.8k
  • 1.4k

अध्याय 15 लक्ष्मणाचे सांत्वन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांची हाक ऐकून सीता घाबरते : श्रीरामस्वरासमान । मारीचानें केलें आक्रंदन ।ऐकोनि सीता करी रुदन । श्रीराम आपण सांपडला ॥ १ ॥राम रणरंगधीर संपूर्ण । विकट योद्धा अति दारुण ।तरी तो आक्रंदे दीनवदन । पाव लक्ष्मणा म्हणोनि ॥ २ ॥श्रीरामाचें आक्रंदन । ऐकोनियां दीनवदन ।उगाचि राहिला लक्ष्मण । याचें का मन द्रवेना ॥ ३ ॥ अतृस्वरं तु तुं भर्तुर्विज्ञाय सद्दशं वने ।उवाच लक्ष्मणं सीता गच्छ जानीहि राघवम् ॥ १ ॥सखायं भ्रातरं ज्येष्ठं रामं पंथानमागतम् ।काक्रंदमान तु वने भ्रातरं त्रातुमर्हसि ॥ २ ॥तं क्षिप्रमभिधावं त्वं भ्रातरं शरणैषिणम् ।रक्षसां वशमापन्नं सिहानामिव गोवृषम् ॥ ३